AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भाजप शिवसेना ठाकरे गटात जोरदार राडा, फ्री स्टाईल हाणामारी, 80 जणांविरोधात गुन्हा दाखल

मोठी बातमी समोर येत आहे, टिटवळा येथे गणपती विसर्जन मिरवणुकीत जोरदार राडा झाला आहे. भाजप आणि शिवसेना ठाकरे गटा आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं. पोलिसांनी या प्रकरणात 70 ते 80 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मोठी बातमी! भाजप शिवसेना ठाकरे गटात जोरदार राडा, फ्री स्टाईल हाणामारी, 80 जणांविरोधात गुन्हा दाखल
भाजप, शिवसेना ठाकरे गटात राडा Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 20, 2026 | 10:11 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, टिटवळा येथे गणपती विसर्जन मिरवणुकीत जोरदार राडा झाला आहे. भाजप आणि शिवसेना ठाकरे गट आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं. वादाचं रुपांतर धक्काबुक्की आणि मारहाणीत झालं आहे. पोलिसांनी या प्रकरणात 70 ते 80 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत पुढे जाण्याच्या वादातून हा राडा झाला आहे. भाजपच्या माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेविका उपेक्षा भोईर, त्यांचे पती शक्तिवान भोईर तसेच ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुरेश भोईर आणि पदाधिकारी प्रदीप भोईर यांच्यात मिरवणुकीत पुढे जाण्यावरून वाद झाला. त्यानंतर घटनास्थळी जोरदार राडा झाला.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  टिटवाळ्यात गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत पुढे जाण्याच्या वादातून जोरदार राडा झाला आहे, भाजप आणि ठाकरे गट आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं.  त्यानंतर या वादाचं रूपांतर धक्काबुक्की, माहाण आणि गोंधळात झालं. भाजपच्या माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेविका उपेक्षा भोईर, त्यांचे पती शक्तिवान भोईर तसेच ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुरेश भोईर आणि पदाधिकारी प्रदीप भोईर यांच्यामध्ये मिरवणुकीत पुढे जाण्यावरून वाद झाला, आणि या वादानंतर घटनास्थळी धक्काबुक्की झाल्याचं पहायला मिळालं.

दरम्यान या प्रकरणी कल्याण तालुका पोलिसांनी चौघांसह दोन्ही गटातील 70 ते 80 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणणे, दंगल घडवणे, शिवीगाळ, धक्काबुक्की आणि मारहाणीच्या कलमांसह गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच  ध्वनीक्षेपकाची आवश्यक परवानगी न घेता मिरवणूक काढणे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे. विशेष म्हणजे, टिटवाळा परिसरात उपेक्षा भोईर यांच्या पॅनलविरोधात निवडणूक लढवणारे ठाकरे गटाचे प्रदीप भोईर यांचा पराभव झाला होता; त्यानंतर आता गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत दोन्ही गट पुन्हा आमनेसामने आले आहेत. या ठिकाणी जोरदार राडा पहायला मिळाला, पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत, 70 ते 80 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल