AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 Points Table : दिल्लीचा विजयी चौकार, पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप, चेन्नईला धक्का

IPL 2026 Points Table : दिल्ली कॅपिट्ल्सने सलग 3 सामने गमावल्यानंतर जोरदार कमबॅक करत आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील चौथा सामना जिंकला आहे. दिल्लीने या विजयासह चेन्नई सुपर किंग्सला मागे टाकलं आहे.

IPL 2026 Points Table : दिल्लीचा विजयी चौकार, पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप, चेन्नईला धक्का
KL Rahul RR vs DC IPL 2026Image Credit source: Bcci
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 02, 2026 | 9:25 AM
Share

दिल्ली कॅपिट्ल्सने आयपीएल 2026 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स विरुद्ध सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला. दिल्लीने 1 मे रोजी आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 43 व्या सामन्यात राजस्थानवर 7 विकेट्सने विजय मिळवला. या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये बदल झाला आहे. दिल्लीला विजयानंतर फायदा झाला आहे. तर राजस्थानने मोठी संधी गमावली. तर चेन्नई सुपर किंग्सला मुंबई इंडियन्स विरूद्धच्या सामन्याआधी फटका बसला आहे.राजस्थान विरुद्ध दिल्ली या सामन्यानंतर पॉइंट्स टेबलचं चित्र कसं आहे हे जाणून घेऊयात.

दिल्लीला गेल्या सलग 3 सामन्यांत पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे दिल्लीसाठी राजस्थान विरुद्धचा सामना अतिशय महत्त्वाचा होता. दिल्लीने या सामन्यात 226 धावांचा यशस्वी पाठलाग करत सामना जिंकला. दिल्लीचा हा या मोसमातील चौथा विजय ठरला. दिल्लीला या विजयामुळे पॉइंट्स टेबलमध्ये एका स्थानाचा फायदा झाला आहे.

दिल्लीच्या विजयामुळे चेन्नई पिछाडीवर

दिल्लीने राजस्थान विरुद्ध जिंकून प्लेऑफमधील शर्यतीत स्वत:चं आव्हान कायम राखलं आहे. दिल्लीने आतापर्यंत 9 पैकी 4 सामने जिंकले आहेत. दिल्लीच्या खात्यात 8 गुण आहेत. दिल्लीने यासह सातव्या क्रमाकांवरुन सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. दिल्लीच्या या विजयामुळे चेन्नईला फटका बसला आहे. चेन्नई सातव्या स्थानी घसरण झाली आहे. चेन्नईच्या खात्यात 6 गुण आहेत.

राजस्थानने नंबर 1 होण्याची संधी गमावली

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनंतर आता राजस्थानने पॉइंट्स टेबलमध्ये पंजाब किंग्सला मागे टाकून पहिल्या स्थानी पोहचण्याची संधी गमावली. आरसीबीला पराभवामुळे दुसऱ्या स्थानीच समाधान मानावं लागलं. तसेच राजस्थान दिल्ली विरुद्ध जिंकली असती तर ते पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी पोहचले असते. मात्र राजस्थान दिल्लीला पराभूत करण्यात अपयशी ठरली. राजस्थानच्या खात्यात 10 सामन्यांनंतर 12 गुण आहेत. राजस्थान पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी आहे.

शनिवारी महामुकाबला, मुंबई-चेन्नई भिडणार

दरम्यान शनिवारी 2 एप्रिलला महामुकाबला होणार आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने असणार आहेत. हा सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये होणार आहे. दोन्ही संघांची ही या हंगामात आमनेसामने येण्याची दुसरी वेळ असणार आहे. चेन्नईने मुंबईला पहिल्या सामन्यात पराभूत केलं होतं. त्यामुळे आता मुंबई कमबॅक करत चेन्नईचा हिशोब करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल