AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : घरात या दिशेला कधीच लावू नका पूर्वजांचा फोटो; घरात येईल गरिबी

घरात आपल्या पूर्वजांचे किंवा पितरांचे फोटो कोणत्या दिशेला लावावेत? याचे देखील काही नियम वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत. जर दिशा चुकली तर त्यामुळे घरात वास्तुदोषासोबतच पितृदोष देखील निर्माण होतो, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे.

Vastu Shastra : घरात या दिशेला कधीच लावू नका पूर्वजांचा फोटो; घरात येईल गरिबी
VASTUSHTRAImage Credit source: AI निर्मित
| Updated on: Mar 13, 2026 | 7:54 PM
Share

जेव्हा घरातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा घरात त्या व्यक्तीचा फोटो लावला जातो. ही हिंदू धर्मातील प्रथा आहे. हिंदू धर्मामध्ये आपल्या पूर्वजांना महत्त्वाचं स्थान असतं. तसेच एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर विशिष्ट धार्मिक विधी जसं की श्राद्ध, पक्ष केले नाहीत तर घरात पितृदोष निर्माण होतो असं देखील मानलं जातं. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर घरात त्याचा फोटो कोणत्या दिशेला लावावा? याबद्दल वास्तुशास्त्रामध्ये अनेक नियम सांगण्यात आले आहेत. जर घरात तुम्ही योग्य दिशेला तुमच्या पूर्वजांचा फोटो लावला, तर त्यांची कृपा कायम तुमच्या घरावर राहते. पुढच्या पिढ्यांचं कल्याण होतं. मात्र जर घरात अयोग्य दिशेला पूर्वजांचा फोटो लावला गेला तर मात्र घरात वास्तुदोषासोबतच पितृदोष देखील निर्माण होतो, त्यामुळे कामात अडचणी येतात असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात पूर्वजांचा फोटो लावण्यासाठी कोणती दिशा ही योग्य असते, कोणत्या दिशेला फोटो लावू नयेत आणि घरात पूर्वजांचा फोटो लावण्याचे नियम काय आहेत? त्याबद्दल माहिती.

या दिशेला लावा फोटो

वास्तुशास्त्रानुसार घरात तुमच्या पूर्वजांचा फोटो हा नेहमी दक्षिण पश्चिम दिशेलाच लावावा. ही दिशा पूर्वजांचा फोटो लावण्यासाठी खूप शुभ मानली जाते. घरात पूर्वजांचा फोटो असा पद्धतीने लावला गेला पाहिजे की, जो व्यक्ती या फोटोला पाहात असेल त्या व्यक्तीचं तोंड हे नेहमी दक्षिण दिशेला असावं. दक्षिण दिशा ही पितर आणि यमराज यांची दिशा मानली जाते. त्यामुळे या दिशेला पूर्वजांचा फोटो लावणं शुभ मानलं जातं. जर या दिशेला पूर्वजांचा फोटो लावला तर घरात कधीही वास्तुदोष निर्माण होत नाही. पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो.

या दिशेला लावू नका फोटो

वास्तुशास्त्रानुसार पूर्वजांचा फोटो हा कधीही उत्तर दिशेला किंवा उत्तर -पूर्व दिशेला लावू नये. या मुळे घरात पितृदोष आणि वास्तुदोष निर्माण होतो. जर तुम्ही या दिशेला पूर्वजांचा फोटो लावला तर मानसिक तणाव, काहीही कारण नसताना घरात सतत भांडणं, अशांत वातावरण आणि आर्थिक समस्या या सारख्या गोष्टींचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. जर तुम्ही चुकीच्या दिशेला पूर्वजांचा फोटो लावला तर घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होतो, ज्याचा तुमच्यावर परिणाम होतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर