AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगावर आता मोठं संकट, कोरोनापेक्षाही खरतनाक आजाराचा प्रादुर्भाव, हजारो लोकांचा मृत्यू, WHO कडून हाय अलर्ट

काही वर्षांपूर्वी कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला होता. कोरोनामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला. मात्र आता कोरोनापेक्षाही खरतनाक असलेल्या आजाराने धुमाकूळ घातला आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून सुद्धा चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

जगावर आता मोठं संकट, कोरोनापेक्षाही खरतनाक आजाराचा प्रादुर्भाव, हजारो लोकांचा मृत्यू, WHO कडून हाय अलर्ट
Ebola
| Updated on: Sep 12, 2026 | 4:34 PM
Share

डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगोमध्ये इबोला व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. इबोलाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे चिंता वाढली आहे. कांगोमधील सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत देशातील तब्बल सात हजार लोकांना इबोलाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत या आजारामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांचा आकडा 3398 वर पोहोचला आहे. इबोला व्हायरसचा हा बुंडीबुग्यो नावाचा व्हेरियंट आहे, हा अतिशय वेगाने देशभर पसरत आहे. कांगो देशाच्या इतिहासात आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात एखाद्या आजाराचा प्रादुर्भाव झाला नव्हता. कोरोनाचा देखील एवढा प्रादुर्भाव या ठिकाणी पहायला मिळाला नव्हता. दरम्यान कांगोमध्ये 2018-2020 मध्ये देखील अशाच प्रकारची इबोलाची साथ आली होती. मात्र गेल्यावेळेपेक्षाही यावेळी इबोलाची साथ देशात झपाट्याने पसरली आहे.

सुरुवातीला मे 2026 मध्ये कांगोच्या इटुरी प्रातांमध्ये या आजाराचे काही रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर हा आजार देशभरात झपाट्याने पसरला. तज्ज्ञांच्या मते जानेवारीपासूनच कांगोमध्ये या आजाराची साथ आली होती. आतापर्यंत तब्बल सात राज्यांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. चिंताजनक बाब म्हणजे इबोला व्हायरस आता कांगोच्या दक्षिण उबांगी प्रांतापर्यंत पोहोचला आहे. दक्षिण उबांगी प्रांत हा कांगोच्या उत्तर -पश्चिममध्ये स्थित आहे. सुरुवातीला ज्या प्रांतामध्ये इबोलाचा प्रादुर्भाव झाला त्या प्रांतापासून दक्षिण उबांगी प्रांत हा शेवटच्या टोकाला आहे. यावरून अंदाज येऊ शकतो की सध्या इबोला हा संपूर्ण देशातच पसरला आहे.

इबोलाच्या या नव्या व्हेरियटंचा मृत्यूदर देखील अधिक आहे. आजाराची लागण झालेल्या शंभर लोकांपैकी जवळपास 38 लोकांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे चिंता अधिकच वाढली आहे. विशेष म्हणजे इबोलाच्या या आधीच्या आजारावर जी लस दिली जात होती, ती लस या नव्या व्हेरियंटवर फारशी प्रभावी नसल्याचं देखील समोर आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून कांगोमध्ये इबोलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे, अलर्ट जारी करण्यात आला आहे. इतरही देशात या आजाराची साथ पसरू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे,

Follow Us
कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा...
MLC Election Results 2026: कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा डंका; पाहा A टू Z
मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
Pradip Purnekar Case: मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी,
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी, सतीश चव्हाण पिछाडीवर
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या नेत्याचं विधान
राजकीय मतभेद बाजूला! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार?
राजकीय मतभेद बाजूला! CM फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार? महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण
NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी...
MLC Election Result 2026 Updates : NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी अपडेट समोर
पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच...
Breaking Updates : पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच... अमरावती मतदारसंघात मोठा उलटफेर
अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest...
Marathwada MLC Constituency Election 2026 : अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest अपडेट काय?
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, ST महामंडळ...
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकासमोर...