AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : अशा लोकांना घरी बोलावणं पडू शकतं महागात, पश्चाताप होईल, चाणक्य काय म्हणतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की समाजात असे काही लोक असतात, ज्यांना कधीही घरी बोलावलं नाही पाहिजे. जर तुम्ही अशा लोकांना घरी बोलावलं तर त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं.

Chanakya Niti : अशा लोकांना घरी बोलावणं पडू शकतं महागात, पश्चाताप होईल, चाणक्य काय म्हणतात?
chanakya nitiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 13, 2026 | 7:46 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, तसेच ते कुटनीतीतज्ज्ञ देखील होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी त्यांना आयुष्यात जे अनुभव आले, त्या अनुभवाचं सार लिहलं आहे. चाणक्य म्हणतात या जगात प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगळा असतो. जगात सगळेच लोक चांगले असतात असं नाही किंवा सगळेच लोक वाईट असतात असं देखील नाही. त्यामुळे आपल्याला व्यक्तीचा स्वभाव आणि नियत ओळखता आली पाहिजे. जर आपण इथे चुकलो तर भविष्यात आपलं फार मोठं नुकसान होऊ शकतं. समाजात असे काही लोक असतात, ज्यांना कधीही घरी बोलावलं नाही पाहिजे. जर अशा लोकांना तुम्ही घरी बोलावलं, तर त्यामुळे तुमचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असते, तुमच्यावर पश्चातापाची वेळ येऊ शकते, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाऊन घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल?

स्वार्थी लोक – चाणक्य म्हणतात जे लोक स्वार्थी असतात, जे लोक केवळ आपल्यापुरताच विचार करतात, अशा लोकांशी कधीही मैत्री करू नये, किंवा त्यांना घरी देखील बोलू नये, अशा लोकांमुळे एक दिवस तुम्ही मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता असते. असे लोक आपल्या स्वार्थासाठी कोणत्याही थरला जाऊ शकतात. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहण्यातच तुमचं हित आहे, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

दुसऱ्याचा आनंद पाहून दु:खी होणारे लोक – चाणक्य म्हणतात असे लोक हे खूप खतरनाक असतात, या लोकांना दुसऱ्याचा आनंद कधीही सहन होत नाही. त्यामुळे अशा लोकांशी मैत्री करू नये, तसेच त्यांना कधीही घरी बोलावू नये. या लोकांना तुमच्या संपत्तीबाबत तसेच पगार आणि इतर गोष्टींबाबत देखील कधीच माहिती देऊ नये, जर तुम्ही अशा लोकांना तुमच्या काही खास गोष्टी सांगितल्या तर तुमच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते.

वाईट संगत असलेले लोक – चाणक्य म्हणतात ज्या लोकांना वाईट संगत आहे, कुठल्याही प्रकारचं वेसन आहे. जे लोक जुगार खेळतात अशा लोकांना कधीही घरी बोलावू नका. एका गोष्ट लक्षात ठेवा चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी खूप वेळ लागतो, मात्र माणसाचा स्वभावच असा असतो तो वाईट गोष्टी लवकर शिकतो. त्यामुळे अशा लोकांपासून तुम्ही नेहमी दूर राहिलं पाहिजे, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
खरात प्रकरणात नवा ट्विस्ट; रोहित पवारांचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा
खरात प्रकरणात नवा ट्विस्ट; रोहित पवारांचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा.
खरात प्रकरणात नवे धागेदोरे समोर; चाकणकर शिर्डी पोलिसांच्या रडारवर
खरात प्रकरणात नवे धागेदोरे समोर; चाकणकर शिर्डी पोलिसांच्या रडारवर.
एकनाथ शिंदें ऐवजी सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होणार? राऊतांचं विधान काय?
एकनाथ शिंदें ऐवजी सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होणार? राऊतांचं विधान काय?.
शरद पवारांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का?; राऊतांचे विधान चर्चेत
शरद पवारांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का?; राऊतांचे विधान चर्चेत.
जळगावात धक्कादायक प्रकार! KYCच्या बहाण्याने महिलेाकडे शरीरसुखाची मागणी
जळगावात धक्कादायक प्रकार! KYCच्या बहाण्याने महिलेाकडे शरीरसुखाची मागणी.
आशा भोसलेंचं निधन, शिवाजी पार्कातील स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
आशा भोसलेंचं निधन, शिवाजी पार्कातील स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार.
संगीत क्षेत्रातल्या युगाचा अस्त, आशा भोसलेंचं 92 व्या वर्षी निधन
संगीत क्षेत्रातल्या युगाचा अस्त, आशा भोसलेंचं 92 व्या वर्षी निधन.
ई केवायसीच्या नावाखाली महिलेकडून शरीर सुखाची मागणी, जळगावातील घटनेने ख
ई केवायसीच्या नावाखाली महिलेकडून शरीर सुखाची मागणी, जळगावातील घटनेने ख.
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पुढील 18 तास काही भागातील पाणी पुरवठा बंद
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पुढील 18 तास काही भागातील पाणी पुरवठा बंद.
आढावा बैठकीत शेजारी बसूनही शिरसाट, सत्तारांचा अबोला, भर मंचावर...
आढावा बैठकीत शेजारी बसूनही शिरसाट, सत्तारांचा अबोला, भर मंचावर....