AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीड पुन्हा हादरलं! कृष्णा आंधळे आणि जयराम चाटे यांच्या टोळीकडून डोळ्यात मिरची पावडर टाकून एकावर लोखंडी रॉडने हल्ला

Beed News : संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे बाहेर येण्याची माहिती मिळताच बीडच्या केज तालुक्यातील तांबवा परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे.

बीड पुन्हा हादरलं! कृष्णा आंधळे आणि जयराम चाटे यांच्या टोळीकडून डोळ्यात मिरची पावडर टाकून एकावर लोखंडी रॉडने हल्ला
Crime BeedImage Credit source: Google
| Updated on: Mar 13, 2026 | 6:19 PM
Share

गेल्या काही काळापासून गुन्हेगारीच्या घटनांमुळे बीड नेहमीच चर्चेत आहे. बीडमध्ये मोठ्या प्रमाणात दादागिरी पहायला मिळत आहे. तसेच गेल्या काही काळात अनेक गुन्हेगारीच्या घटना घडल्या असून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण संपूर्ण राज्यासह देशातही गाजले होते. या प्रकरणी दोषींना अटक करण्यात आलेली आहे, मात्र कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही फरार आहे. अशातच या प्रकरणातील एक आरोपी जयराम चाटे आज (13 मार्च) भावाच्या बाराव्याच्या विधीकरिता तुरूंगातून बाहेर आला होता. अशातच जयराम चाटे बाहेर येण्याची माहिती मिळताच बीडच्या केज तालुक्यातील तांबवा परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पाच जणांचा एका तरूणावर हल्ला

बीडच्या केज तालुक्यातील तांबवा परिसरात काल दुपारी पाच जणांनी संग्राम चाटे नामक तरुणाला अडवून डोळ्यात मिरची पावडर टाकून कत्ती आणि लोखंडी रॉडने हल्ला करत हत्येचा प्रयत्न केला. मारहाण करताना सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी जयराम चाटे आणि कृष्णा आंधळेचे नाव घेत धमकावले. ‘तुमचा बाप जयराम चाटे उद्या येतोय, आमचा किंग पॅटर्न कृष्णा आंधळे-1313 तुला दाखवतो ‘असे म्हणत हल्ला केला.

पाच जणांवर गुन्हा दाखल

या हल्ल्यात तरूण संग्राम चाटे गंभीररित्या जखमी झाला असून केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी केज पोलीसात पाच आरोपींच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी जयराम चाटे आज एक दिवसासाठी जेलच्या बाहेर आलेला असून तांबवा येथे तो भावाच्या बाराव्याच्या विधीसाठी पोहोचला आहे. तो बाहेर येण्यापूर्वीच त्याच्या टोळीतील सदस्यांकडून गाव परिसरात तरुणावर हल्ला करत दहशत माजवल्याचा प्रकार समोर आला आहे.

दरम्यान, तब्बल 14 महिन्यानंतर जयराम चाटे हा काही तासांसाठी तुरूंगाच्या बाहेर आलो होता. सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत पोलिस बंदोबस्तात तो विधीसाठी हजर होता. यानंतर त्याला पुन्हा तुरूंगात नेण्यात आले. संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी वाल्मिक कराडसह अनेकांना अटक करण्यात आलेली आहे.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?