AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Paper Leak: खळबळजनक! पुन्हा पेपर फुटला, थेट व्हॉटसअपवर; सरकार खडबडून जागे; काय घेतली अ‍ॅक्शन?

Paper Leak: आयुर्वेद विद्यापीठात पेपर लीक झाल्याची बातमी समोर आली आहे. तृतीय वर्षाच्या परीक्षेतील सर्जरी विषयाचा पेपर लीक झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

Paper Leak: खळबळजनक! पुन्हा पेपर फुटला, थेट व्हॉटसअपवर; सरकार खडबडून जागे; काय घेतली अ‍ॅक्शन?
paper-leakImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 27, 2026 | 6:34 PM
Share

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात नीट पेपरफुटी प्रकरणाने खळबळ माजली होती. आता त्यापाठोपाठ गुजरातमध्ये आयुर्वेद विद्यापीठात पेपर लीक झाल्याची बातमी समोर आली आहे. तृतीय वर्षाच्या परीक्षेतील सर्जरी विषयाचा पेपर लीक झाला आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वीच पेपर कथितरीत्या सोशल मीडियावर लीक झाला. प्रश्नपत्रिकेतील १२ पैकी ११ प्रश्न व्हायरल झालेल्या पेपरशी जुळले. कॉलेज प्रशासन संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे.

‘शल्य तंत्र-१’ (सर्जरी) परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वीच कथितरीत्या लीक झाली. परीक्षा सुरू होण्यापूर्वीच सोशल मीडियावर फिरणाऱ्या ‘Important Topics’ संदेशात एक धक्कादायक साम्यता दिसून आली. प्रश्नपत्रिकेत विचारलेल्या एकूण १२ प्रश्नांपैकी ११ प्रश्न व्हायरल संदेशात विचारले गेले होते.

जूनागड आयुर्वेदिक कॉलेजच्या प्रोफेसरने काय म्हटले?

जूनागड आयुर्वेदिक कॉलेजचे प्रोफेसर आणि विद्यापीठ स्क्वॉडचे सदस्य डॉ. अल्पेश जरसानिया म्हणाले, “२० जुलै रोजी मला विद्यापीठाकडून स्क्वॉडची जबाबदारी देण्यात आली होती. जेव्हा मी दुपारी कॉलेजमध्ये तपासणीसाठी गेलो, तेव्हा तिथल्या एका फॅकल्टीने माझे लक्ष याकडे वेधले की परीक्षेच्या प्रश्नांच्या काही डिटेल्स व्हॉट्सअॅप मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांनी लक्ष वेधताच मी ताबडतोब त्या प्रश्नांची पडताळणी केली. त्याचबरोबर मी ताबडतोब आमच्या विद्यापीठाच्या परीक्षा प्राधिकरणाला, म्हणजे ‘कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन’ला कळवले.”

प्रश्नपत्रिकेतील १२ पैकी ११ प्रश्न व्हायरल प्रश्नांशी जुळले?

पुढे त्यांनी सांगितले, “हे आमच्या स्तरावरून पडताळून पाहायचे आहे. पहिल्या दृष्टीक्षेपात असे वाटते की प्रश्नपत्रिकेत दिलेल्या एकूण १२ प्रश्नांपैकी ११ प्रश्न व्हायरल प्रश्नांमधूनच विचारले गेले होते. मात्र, याबाबत अधिक तपशीलवार आणि तांत्रिक माहिती विषय तज्ज्ञ तसेच विद्यापीठ देईल.”

पेपर लीकचे तथ्य आढळल्यास पुढील कारवाई करू – एचपी झाला

परीक्षा प्रश्नपत्रिकेबाबत विचारले असता गुजरात आयुर्वेद विद्यापीठाचे इन्चार्ज एक्झामिनेशन डायरेक्टर एचपी झाला म्हणाले, “सर्जिकल सिस्टमच्या २६ कॉलेजमध्ये १२०० उमेदवारांनी परीक्षा दिली होती. संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पेपर पूर्ण झाल्यानंतर ही बाब आमच्या लक्षात आली आहे. जर पेपर लीकचे तथ्य आढळले तर आम्ही पुढील कारवाई करू.” निष्पक्ष चौकशीसाठी विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Follow Us
84 टेबलवर 84 हजार मतांची मोजणी, भाजप-काँग्रेसमध्ये चुरस
Nagpur MLC Election Result : नागपूर पदवीधर मतमोजणी सुरू; 84 टेबलवर 84 हजार मतांची मोजणी, भाजप-काँग्रेसमध्ये चुरस
शिक्षक-पदवीधर मतदारसंघांमधील मतमोजणीवरून भाजप नेत्याचं मोठं विधान
MLC Election 2026 Result Updates : शिक्षक-पदवीधर मतदारसंघांमधील मतमोजणी प्रक्रियेवरून भाजप नेत्याचं मोठं विधान, थेट म्हणाले...
प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच... अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या.
Amravati MLC Election 2026 Result: प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच... अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेत काय घडतंय?
नागपूर पदवीधर निवडणुकीत 34 पोस्टल मतं बाद; निकालाच्या गणितावर काय....
Nagpur MLC Election 2026 Result : नागपूर पदवीधर निवडणुकीत 34 पोस्टल मतं बाद; निकालाच्या गणितावर काय परिणाम होणार?
एकूण सहा फेऱ्यांनंतर प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात होणार
Maharashtra MLC Election 2026 Result : एकूण सहा फेऱ्यांनंतर प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात होणार
शिवसेनेच्या 6 बंडखोर खासदारांचं भवितव्य आज ठरणार; सुप्रीम कोर्टात....
Shivsena : शिवसेनेच्या 6 बंडखोर खासदारांचं भवितव्य आज ठरणार; सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी
प्रचंड लक्ष्मी दर्शन झालं, पण विजय सरस्वतीचाच; सतेज पाटलांचा....
Satej Patil : प्रचंड लक्ष्मी दर्शन झालं, पण विजय सरस्वतीचाच; सतेज पाटलांचा विरोधकांना टोला
झाडं तोडणारे कसाबचे बाप; वृक्षतोडीवरून संजय राऊत आक्रमक
Sanjay Raut : झाडं तोडणारे कसाबचे बाप; वृक्षतोडीवरून संजय राऊत आक्रमक
छत्रपती शिवरायांच्या सह्याद्रीच्या रांगा नष्ट करतायत! संजय राऊतांचा...
Sanjay Raut : छत्रपती शिवरायांच्या सह्याद्रीच्या रांगा नष्ट करतायत! संजय राऊतांचा सरकारवर घणाघात
आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही...; मतपेटीत सापडली चिठ्ठी; नेमकं काय...
MLC Election 2026 Maharashtra : आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही...; मतपेटीत सापडली चिठ्ठी; नेमकं काय लिहिलंय?