AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : झाडं तोडणारे कसाबचे बाप; वृक्षतोडीवरून संजय राऊत आक्रमक

Sanjay Raut : झाडं तोडणारे कसाबचे बाप; वृक्षतोडीवरून संजय राऊत आक्रमक

| Updated on: Oct 27, 2026 | 11:17 AM
Share

संजय राऊत यांनी झाडे तोडणाऱ्यांवर तीव्र टीका केली असून, त्यांना कसाबचे बाप असे संबोधले आहे. मुंबईत अडीच हजार, तर चंद्रपुरात ५ हजार झाडे तोडल्याचा आरोप त्यांनी केला. पर्यावरणाचा नाश करणाऱ्या कंपन्यांची बाजू घेतल्याबद्दल त्यांनी ॲड. उज्ज्वल निकम यांच्यावरही कठोर शब्दांत हल्ला चढवला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी झाडांच्या कत्तलीवरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. झाडे तोडणाऱ्यांना त्यांनी दहशतवादी कसाबचा ‘बाप’ असे संबोधले. मुंबईत अडीच हजार झाडे तोडल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच विदर्भातील चंद्रपूर भागात अदानीला खाणी दिल्याने तिथे ५ हजार झाडे तोडण्याची शक्यता वर्तवली. ही झाडे तोडणारे पर्यावरणाचे मारेकरी आहेत असे राऊत म्हणाले.

याच प्रकरणात, टोरंट कंपनीची बाजू घेतल्याबद्दल त्यांनी ॲड. उज्ज्वल निकम यांच्यावरही टीका केली. ‘कसाबसारख्या आरोपींची बाजू घेण्यासारखंच हे पर्यावरण नष्ट करणाऱ्यांची बाजू घेणं आहे,’ असे राऊत म्हणाले. उद्योगांच्या नावाखाली महाराष्ट्रातील पर्यावरण संपवले जात आहे. काळा पैसा गुंतवण्यासाठी हे उद्योग आणले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Published on: Oct 27, 2026 11:17 AM

Follow Us