AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुप्रिया सुळे अमित शाहांच्या भेटीला, पवार गट थेट एनडीएत…राजकारणात मोठी खळबळ!

समोर आलेल्या माहितीनुसार सुप्रिया सुळे यांनी अमित शाहांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान खासदार बजरंग सोनवणे हेदेखील सोबत होते. यावेळी सुप्रिया सुळे आणि अमित शाहा यांच्यात वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे.

सुप्रिया सुळे अमित शाहांच्या भेटीला, पवार गट थेट एनडीएत...राजकारणात मोठी खळबळ!
supriya sule and amit shah meetingImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 27, 2026 | 7:06 PM
Share

Supriya Sule Meets Amit Shah : गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये सामील होणार आहे, असे बोलले जात आहे. त्यासाठी पडद्यामागे मोठ्या हलाचाली सुरू आहेत, असं बोललं जातंय. विशेष म्हणजे एकीकडे ही चर्चा सुरू असताना दुसरीकडे राज्यातील भाजपा, शिंदे गट आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची दिल्लीवारी वाढलेली आहे. असतानाच आता राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पवार गटाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली आहे.

नेमकं काय घडतंय?

समोर आलेल्या माहितीनुसार सुप्रिया सुळे यांनी अमित शाहांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान खासदार बजरंग सोनवणे हेदेखील सोबत होते. यावेळी सुप्रिया सुळे आणि अमित शाहा यांच्यात वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. परंतु चर्चेचे मुद्दे नेमके कोणते होते, हे अद्याप समोर आलेले नाही.

याआधी मोदी यांची भेट

सुप्रिया सुळे आणि खासदार शरद पवार यांनी याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. एकीकडे कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे ही भेट घडून आली होती. या भेटीचीही तेव्हा सगळीकडे चर्चा झाली होती. त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी अमित शाहांची भेट घेतली.

दिल्लीतून संदेश आला, पवार एनडीएसोबत?

दरम्यान, एकीकडे या घडामोडी घडत असताना दुसरीकडे दिल्लीतील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना संदेश पाठवल्याचे बोलले जात आहे. शरद पवार यांचा पक्ष एनडीएत सहभागी होणार आहे, त्यासाठी तयार राहा, अशाआशयाची ही सूचना असल्याचे संगितले जातेय. त्यामुळे ही माहिती खरी ठरली तर लवकरच शरद पवार यांची राष्ट्रवादी ही एनडीएत सहभागी होऊ शकते. सुप्रिया सुळे यांनी अमित शाहांची भेट घेण्याआधी राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाचे खासदार सुनिल तटकरे यांनीदेखील शाहांची भेट घेतली होती. त्यामुळे आता भविष्यात काय होणार, ते पाहणे आता रंजक ठरणार आहे.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतः घडवली गणपतीची मूर्ती! पर्यावरणपूरक...
CM Fadnavis | मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतः घडवली गणपतीची मूर्ती! 6,500 विद्यार्थ्यांसमोर दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश
अण्णा हजारे यांना अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज, प्रकृती स्थिर
अण्णा हजारे यांना अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज, प्रकृती स्थिर
आपल्या मुलींना वेद, पुराणे, गीता आणि... अमृता फडणवीसांचं पुन्हा मोठं..
आपल्या मुलींना वेद, पुराणे, गीता आणि... अमृता फडणवीसांचं पुन्हा मोठं विधान, काय म्हणाल्या?
साडीचोळी घेऊन अमृता ताईंकडे जेवायला जाणार, मात्र... मनोज जरांगे
साडीचोळी घेऊन अमृता ताईंकडे जेवायला जाणार, मात्र... मनोज जरांगेंच्या या वक्तव्याने वेधलं लक्ष
संजय राऊत तातडीने घेणार शिंदे गटातील खास मंत्र्याची भेट, मोठं कारण...
संजय राऊत तातडीने घेणार शिंदे गटातील खास मंत्र्याची भेट, मोठं कारण समोर
महिलेनं इतकं हाणलं की फळवाल्याचा जागीच गेला जीव, चक्क ठोसा...
महिलेनं इतकं हाणलं की फळवाल्याचा जागीच गेला जीव, चक्क... चकित करणारं कारण समोर
जरांगे पाटलांच्या उपोषणाचा तेरावा दिवस, सरकारच्या हालचालींना वेग
जरांगे पाटलांच्या उपोषणाचा तेरावा दिवस, सरकारच्या हालचालींना वेग
ठाकरे गटाकडून संपर्कप्रमुखांची यादी जाहीर; 40 मतदारसंघांपैकी हे नाव...
ठाकरे गटाकडून संपर्कप्रमुखांची यादी जाहीर; 40 मतदारसंघांपैकी हे नाव तुफान चर्चेत
दिशा सालियन प्रकरणात सीबीआयचा तपास सुरू, वडिलांचा जबाब...
दिशा सालियन प्रकरणात सीबीआयचा तपास सुरू, तिच्या वडिलांचा जबाब... नेमकं काय घडणार?
राष्ट्रीय चित्रपट सोहळा गुजरातमध्ये, यामागे... आर्थिक उलाढाल झाल्याचा
राष्ट्रीय चित्रपट सोहळा गुजरातमध्ये, यामागे... आर्थिक उलाढाल झाल्याचा 'सामना'त खळबळजनक दावा