AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता उत्तर प्रदेशच्या बड्या नेत्याचा रियाला पाठिंबा, ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं, ट्विट चर्चेत

22 जुलै 2026 रोजी मुंबईतील दादरमध्ये देखील तरुणांनी आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान रिया अहिर नावाची तरुणी चांगलीच चर्चेत आली होती. मात्र सध्या सोशल मीडियावर या तरुणीला ट्रोल करण्यात येत आहे.

आता उत्तर प्रदेशच्या बड्या नेत्याचा रियाला पाठिंबा, ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं, ट्विट चर्चेत
Riya AhirImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 27, 2026 | 6:52 PM
Share

नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर देशभरात वातावरण चांगलंच तापलं होतं. कॉकरोच जनता पार्टीकडून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीन्याम्याची मागणी करण्यात आली होती. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने महिनाभर दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर आंदोलन सुरू होतं. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलकांनी संसदेवर देखील मोर्चा काढला. दरम्यान या मोर्चावेळी आंदोलक आणि पोलीस आमने-समाने आले, पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज मुळे संपूर्ण देशभरात वातावरण चांगलंच तापलं होतं. संपूर्ण देशभरातून या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळाला. मुंबईमध्ये देखील आंदोलन झालं, तरुण रस्त्यावर उतरल्याचं पाहयला मिळालं.

22 जुलै 2026 रोजी मुंबईतील दादरमध्ये देखील तरुणांनी आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान रिया अहिर नावाची तरुणी चांगलीच चर्चेत आली होती. हे आंदोलन सुरू असताना रिया अहिर हिने एकटीने पोलिसांची व्हॅन रोखली होती. तिचे फोटो सर्वत्र व्हायरल झाले होते. तिचं कौतुक करण्यात येत होतं. मात्र आता रिया अहिरच्या वतीने सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.  आंदोलनातील आपले फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता आपल्याला धमक्या मिळू लागल्या आहेत आपल्या फोटोंवर आणि व्हिडीओंवर अत्यंत वाईट कमेंट केल्या जात आहेत.  सध्या हे ऑनलाईन सुरू आहे, मात्र याचे गंभीर परिणाम होऊ शकतात असं रियाने आपल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान रियायाच्या या तक्रारीनंतर सपाचे प्रमुख अखिलेश यांनी यांनी ट्विट करत रियाला धीर दिला आहे. जे अशा पद्धतीने रियाला ट्रोल करत आहेत, धमक्या देत आहेत, त्यांना अखिलेश यादव यांनी चांगलंच सुनावलं आहे.  ‘जीने एक हाती अन्यायाचा प्रतिकार केला तिच्यावर धमक्यांचा परिणाम होईल असे काही मूर्ख लोक समजत आहेत. परंतु संपूर्ण देश रियाच्या पाठीशी उभा आहे, धन्यवाद रिया’ असं ट्विट अखिलेश यादव यांनी केलं आहे.

22 जुलै 2026 रोजी मुंबईत झालेल्या आंदोलनामध्ये रिया आहिर सहभागी झाली होती, यावेळी तीने पोलिसांची व्हॅन रोखली, या आंदोलनातील तिचे फोटो आणि व्हिडीओ चांगलेच व्हायरल झाले होते.


Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?