Jalgaon : गुढीपाडव्यानिमित्त सुवर्णनगरीत सोन्याची मोठी उलाढाल, खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी सोने (gold) खरेदी करणे शुभ मानले जाते. याच पार्श्वभूमीवर राज्याची सुवर्णनगरी असलेल्या जळगावमध्ये (Jalgaon) मोठी उलाढाल पहायला मिळत आहे.

Jalgaon : गुढीपाडव्यानिमित्त सुवर्णनगरीत सोन्याची मोठी उलाढाल, खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
| Edited By: | Updated on: Apr 02, 2022 | 8:34 AM

जळगाव : गुढीपाडवा (Gudhipadva) हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण आहे. याच दिवशी हिंदू नवीन वर्षाला प्रारंभ होतो. तसेच गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी सोने (gold) खरेदी करणे शुभ मानले जाते. याच पार्श्वभूमीवर राज्याची सुवर्णनगरी असलेल्या जळगावमध्ये (Jalgaon) मोठी उलाढाल पहायला मिळत आहे, गेले दोन वर्ष कोरोनामुळे ग्राहकांचा गुढीपाडव्याचा मुहूर्त टळला होता व त्यामुळे सुवर्ण नगरीतील व्यवहार ठप्प होते. मात्र यावर्षी कोरोना निर्बंध हटवण्यात आल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे. गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर सोन्याला मागणी वाढल्याने काहीप्रमाणात सोन्याच्या भाव वधारल्याचे दिसून येत आहे.

सोन्याच्या दरात वाढ

आज राज्याची सुवर्णनगरी असलेल्या जळगावमध्ये 24 कॅरट सोन्याचे भाव 51 हजार 225  प्रति ग्रॅम आहे. तर चांदी भाव 68 हजार 807 रुपये प्रति किलो आहे. सोन्याचा भाव जरी वधारला असला तरी देखील गुढीपाडवा असल्याने ग्राहक मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत असल्याचे पहायला मिळत आहे. आज सराफा बाजारात मोठी उलाढा होण्याची अपेक्षा सराफा व्यावसायिकांना आहे.

राज्याती प्रमुख शहरांचे दर

राजधानी मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 48,100 इतका आहे. तर 24 कॅरट सोन्याचा दर 52,470  इतका आहे. पुण्यात 22 कॅरट सोन्याचा दर 48,180 तर 24 कॅरट सोन्याचा दर 52,550 आहे. जळगावमध्ये 24 कॅरट सोन्याचा दर 51 हजार 225  प्रति ग्रॅम आहे. नागपूरमध्ये 2 2कॅरट सोन्याचा दर प्रति ग्रॅम  48,180 तर 24 कॅरट सोन्याचा दर 52,550 इतका आहे.

संबंधित बातम्या

इंधन दरवाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी भारत रशियाकडून कच्च्या तेलाची आयात सुरूच ठेवणार; अर्थमंत्री निर्मला सितारमण यांचे स्पष्टीकरण

Emergency in SriLanka: श्रीलंकेत नागरिक रस्त्यावर, आंदोलनाला हिंसक वळण; सरकारकडून आणीबाणीची घोषणा

Petrol,Diesel Price Hike : इंधनाच्या किमतीमध्ये आज पुन्हा वाढ; जाणून घ्या आपल्या शहरातील दर