जळगाव सराफा बाजारात चांदी लकाकली, सोन्यात मोठी तेजी, काय आहेत किंमती?

Jalgaon Gold And Silver Price Today : जळगावच्या सराफा बाजारात चांदीने विक्रम केला आहे. चांदी येथे लाखाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. तर सोन्याने येथे यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. आता चांदीने विक्रमी झेप घेतली आहे.

| Updated on: Feb 15, 2025 | 2:08 PM
1 / 5
जळगावातील सराफ बाजारात दोन दिवसांपूर्वी घसरण झालेल्या चांदीच्या भावात दोन दिवसात तीन हजार ३०० रुपयांची वाढ होऊन शुक्रवारी ती थेट ९८ हजार ३०० रुपये प्रति किलोवर पोहचली आहे. चांदीने नवीन विक्रम केला आहे.

2 / 5
चांदीच्या भावामध्ये घसरण होऊन दोन दिवसांपूर्वी ती ९५ हजार रुपयांवर होती. गुरुवारी त्यात दोन हजार रुपयांची तर शुक्रवारी एक हजार ३०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी ९८ हजार ३०० रुपये प्रति किलोवर पोहचली आहे.

3 / 5
सोन्या चांदीच्या दागिन्यांची खरेदी हे सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेले असून दर कमी व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे

4 / 5
त्या भावात सोन्या चांदीच्या दागिन्यांची खरेदी करण्याकडे वऱ्हाडी मंडळींचा कल असल्याचा पाहायला मिळत आहे..

5 / 5
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA)  24 कॅरेट सोने 85,998,  23 कॅरेट 85,654,  22 कॅरेट सोने 78,774रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 64,499 रुपये, 14 कॅरेट सोने 50,309 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 97,953 रुपये इतका झाला.