जालना जिल्ह्यातलं धरण फुटण्याची भीती, ताडपत्रीची ठिगळं लावून अतिप्रसंग रोखण्याचा प्रयत्न

कोकणातील धरणफुटीची घटना ताजी असतानाच जालना जिल्ह्यातील भोकरदनमधील शेलूद धरण फुटण्याची भिती व्यक्त केली जात आहे. यामुळे प्रशासनाने धरणाला ताडपत्रीची ठिगळं लावून अतिप्रसंग रोखण्याचा केविलवाणा प्रयत्न प्रशासनाने केला आहे.

जालना जिल्ह्यातलं धरण फुटण्याची भीती, ताडपत्रीची ठिगळं लावून अतिप्रसंग रोखण्याचा प्रयत्न

जालना : कोकणातील धरणफुटीची घटना ताजी असतानाच जालना जिल्ह्यातील भोकरदनमधील शेलूद धरण फुटण्याची भिती व्यक्त केली जात आहे. यामुळे प्रशासनाने धरणाला ताडपत्रीची ठिगळं लावून अतिप्रसंग रोखण्याचा केविलवाणा प्रयत्न प्रशासनाने केला आहे. मात्र यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

गेल्या काही दिवसापासून जालन्यात मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे जालन्यातील अनेक धरणं ओव्हर फ्लो झाली आहेत. भोकरदन तालुक्यातही शेलूद धरणही ओव्हर फ्लो झाल्याने त्यातून पाणी बाहेर येत आहे.

या भितीमुळे स्थानिक नागरिकांनी शेलूद धरण फुटण्याची भीती स्थानिक व्यक्त केली आहे. मात्र त्यानंतर प्रशासनाने खबरदारी म्हणून धरण क्षेत्रात ताडपत्री लावल्या आहेत. ताडपत्री लावल्याने स्थानिक नागरिक चांगलेच संतप्त झाले आहे. तसेच जिल्हा प्रशासनाच्या या हास्यास्पद प्रयत्नावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

तसेच काही दिवसांपूर्वी भोकरदन तालुक्यात मुसळधार पावसामुळे धामणा धरणाच्या सांडव्याला मोठे तडे गेल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर स्थानिक प्रशासनने धरण फुटण्याची भीती व्यक्त केली जात असता, नागरिकांना तात्काळ त्या ठिकाणाहून हलवण्यात आलं होतं.

कोकणात तिवरे धरण फुटलं

कोकणातील तुफान पावसाने चिपळूण तालुक्यातील तिवरे-खडपोली धरण फुटलं. चक्क धरण फुटल्याने पाण्याच्या मोठ्या प्रवाहाने 24 जण वाहून नेले. आतापर्यंत 16 जणांचे मृतदेह हाती आले होते, तर बेपत्ता गावकऱ्यांचा शोध घेतला जात होता. या दुर्घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास झालेल्या दुर्घटनेने थरकाप उडाला. धरण फुटल्यामुळे तिवरे बेंडवाडीतील 13 घरं वाहून गेली. तर आजूबाजूच्या गावात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली. 

संबंधित बातम्या :

जालना जिल्ह्यातलं धरण फुटण्याची भीती, गावकऱ्यांचं स्थलांतर, NDRF अलर्टवर

शाहू महाराजांनी बांधलेलं राधानगरी धरण, 100 वर्षांनंतरही ना गळती, ना धोका

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *