Jio चा 98 दिवसांचा भन्नाट प्लॅन, दररोज 2GB डेटा आणि ‘हे’ खास फायदे

 रिलायन्स जिओचा हा प्लॅन दररोज डेटा, कॉलिंग, एसएमएस आणि इतर अनेक अतिरिक्त फायदे देतो. जर तुम्ही जिओचे प्रीपेड वापरकर्ते असाल तर हा प्लॅन तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. चला तर मग या प्लॅनची किंमत जाणून घेऊयात.

Jio चा 98 दिवसांचा भन्नाट प्लॅन, दररोज 2GB डेटा आणि हे खास फायदे
jio recharge plan
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 20, 2026 | 4:35 PM

भारतातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे रिचार्ज प्लॅन ऑफर सादर करतात. अशातच Jio ने सुद्धा 999 रूपयांचा प्लॅन वापरकर्त्यांसाठी सादर केलेला आहे. 98 दिवसांच्या वैधतेसह या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज डेटा आणि इतर काही फायदे मिळतात. मात्र दूसरीकडे Airtel कंपनीचा 979 रूपयांचा प्लॅन ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. किंमत, वैधता, डेटा आणि अतिरिक्त फायदे पाहता तुमच्यासाठी कोणता प्लॅन अधिक फायदेशीर ठरतो? चला दोन्ही प्लॅनचे फायदे जाणून घेऊयात.

जिओच्या 999 रूपयांच्या प्लॅनसोबत मिळतात हे फायदे

कंपनीच्या वेबसाइटवरील माहितीनुसार जिओच्या 999 रूपयाच्या या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. या प्लॅनची ​​वैधता 98 दिवसांची असून, यामध्ये एकूण 196 जीबी डेटा मिळतो. डेटा व्यतिरिक्त तुम्हाला अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मेसेजेस देखील मिळतात.

अतिरिक्त फायदे

या जिओ प्रीपेड प्लॅनमध्ये जिओ हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शनचा समावेश आहे. याव्यतिरिक्त कंपनी 50 जीबी क्लाउड स्टोरेजचा ॲक्सेस देते. इतकेच नाही, तर रिलायन्स जिओ प्रीपेड वापरकर्त्यांना 35 हजार 100 रूपये किमतीचा गूगल जेमिनी एआय प्रो चा लाभही मिळतो. 5000 जीबी गूगल एआय क्लाउड स्टोरेजमध्ये नॅनो बनाना बेनिफिटसह अनेक फायदे मिळतात.

जर तुमच्याकडे 5G फोन असेल आणि तुम्ही कंपनीच्या 5G नेटवर्क असलेल्या क्षेत्रात राहत असाल तर तुमचा डेटा संपल्यानंतरही तुम्ही अमर्यादित 5G डेटाचा आनंद घेऊ शकता. जर तुमच्याकडे 5G फोन नसेल किंवा तुम्ही 5G नेटवर्क क्षेत्रात राहत नसाल तर वेग 64kbps पर्यंत कमी होईल.

एअरटेलच्या 979 रूपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला मिळतील हे फायदे

जिओच्या प्लॅनशी स्पर्धा करण्यासाठी एअरटेलने प्रीपेड वापरकर्त्यांसाठी 979 रुपयांचा प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा, कॉलिंग आणि 100 एसएमएस मिळतात. 84 दिवसांच्या वैधतेसह, तुम्हाला एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले सबस्क्रिप्शनद्वारे सोनी लिव्ह आणि 18 ओटीटी ॲप्सचा मोफत ॲक्सेस देखील मिळेल. याव्यतिरिक्त या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5जी डेटा, ॲडोबी एक्सप्रेस प्रीमियम, स्पॅम कॉल आणि एसएमएस अलर्ट्स आणि मोफत हॅलोट्यून्स मिळतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us