यंदा चांगभलच्या गजरात दणक्यात गुलाल उधळणार; निर्बंधशिवाय होणार कोल्हापूरची जोतिबाची यात्रा

यंदा चांगभलच्या गजरात दणक्यात गुलाल उधळणार; निर्बंधशिवाय होणार कोल्हापूरची जोतिबाची यात्रा
Jotiba Yatra Kohapur
Image Credit source: Twitter

कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित चैत्र यात्रा नियोजन आढावा बैठकीत कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून ही घोषणा करण्यात आली. पालकमंत्र्यांनी जोतिबाच्या डोंगरावरच्या यात्रेविषयी स्पष्ट निर्णय घेतल्यामुळे भाविकांच्या मनातील संभ्रम आता दूर झाला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: महादेव कांबळे

Mar 28, 2022 | 8:22 PM

जोतिबा : कोल्हापूर जिल्ह्यातील जोतिबाची यात्रेला (Jotiba Yatra) महाराष्ट्रासह इतर राज्यातून लाखो भाविक उपस्थिती लावत असतात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे यात्रेवर निर्बंध लावण्यात आले होते. तर आता मात्र तब्बल दोन दोन वर्षानंतर श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर यंदाची चैत्र पौर्णिमा यात्रा कोणत्याही निर्बंधाशिवाय (Without restrictions) होणार आहे. शासनाकडून यात्रेवरचं निर्बंध हटवण्यात आल्यामुळे यंदा जोतिबा डोंगरावर चांगभलच्या गजरात भाविक गुलाल उधळणार आहेत. जोतिबाची यात्रेला दोन वर्षांचा खंड पडला होता, त्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील (Guardian Minister Satej Patil) यांनी जिल्हा प्रशासनाची बैठक घेऊन यात्रेच्या तयारीबाबतचा सर्व विभागाकडून आढावा घेतला. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या सर्व विभागप्रमुखांना यात्रेत कोणतीही कमतरता राहू नये यासाठी प्रयत्नशील राहा अशा सूचना करण्यात आल्या.

कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित चैत्र यात्रा नियोजन आढावा बैठकीत कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून ही घोषणा करण्यात आली. पालकमंत्र्यांनी जोतिबाच्या डोंगरावरच्या यात्रेविषयी स्पष्ट निर्णय घेतल्यामुळे भाविकांच्या मनातील संभ्रम आता दूर झाला आहे. शासनाने यात्रेबाबतचा महत्वाचा निर्णय जाहीर केल्यामुळे यंदा जोतिबाच्या डोंगरावर चांगभलचा गजणार जोरात घुमणार आहे, आणि भाविकांचीही मोठी गर्दी होणार आहे.


चैत्र यात्रेवरचे निर्बंध हटवले

जगावर कोरोनाचे संकट ओढावल्यानंतर अनेक गोष्टींवर, कार्यक्रमांवर निर्बंध लादण्यात आले होते, त्यामध्ये धार्मिक कार्यक्रमांवर कडक निर्बंध लावण्यात आले होते, त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून जोतिबाच्या यात्रेची भाविक आतुरतेने वाट बघत होते. शासनाने जाहीर कार्यक्रमांना, यात्रा, जत्रांवर कडक निर्बंध लावण्यात आल्याने यंदाही जोतिबाची यात्रा होणार की नाही याबाबतच्या संभ्रमात जोतिबाचे भाविक होते. मात्र आता पालकमंत्र्यांनीच जिल्हा प्रशासनाची बैठक घेऊन यावर्षी चैत्र यात्रेवरील सर्व निर्बंध हटवल्याचे सांगितले.

भाविकांसाठी नियम शिथिल

जोतिबाच्या डोंगरावर चैत्र यात्रा मोठ्या उत्साहात होणार असली तरी कोरोनाबाबतचे नियम पाळण्यात येणार आहेत. यासाठी यात्रेत सहभागी होणारे व्यापारी, जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनाही कोविड लसीकरणाचे दोन डोस बंधनकारक असणार आहेत.तसेच जोतिबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मात्र सर्व नियम शिथिल करण्यात आले आहेत.

जोतिबाच्या डोंगरावर कमतरता राहणार नाही

कोरोनानंतर दोन वर्षानंतर जोतिबाची यात्रा होत असल्याने जिल्हा प्रशासनाच्या झालेल्या बैठकीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले की, जोतिबा डोंगरावर कोणतीही कमतरता राहणार नाही याची काळजी जिल्हा प्रशासनाने घ्यावी असे आदेश प्रत्येक विभागाला देण्यात आले आहेत.

जिल्हा प्रशासन यात्रेसाठी सज्ज

जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या बैठकीत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, जोतिबा ग्रामपंचायत, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ, एसटी महामंडळ आणि सर्व विभागातील अधिकाऱ्यांकडून करण्यात येत असलेला तयारीचा आढावा देण्यात आला. शाहूवाडी उपविभागीय अधिकारी अमित माळी, पन्हाळा तहसीलदार रमेश शेंडगे, देवस्थान समितीचे प्रभारी सचिव शिवराज नायकवडी, सरपंच राधा बुणे, उपसरपंच शिवाजीराव सांगळे, देवस्थान समिती समन्वयक दीपक म्हेत्तर यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, पुजारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Aditya Thackarey : सिंधुदुर्गात पर्यटन वाढवण्यासाठी प्रयत्नशील : पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे

‘पैगंबर बिल’ सारखे कायदे धार्मिक राजकारण खोदून काढतील;प्रकाश आंबेडकर यांचे मत;’वंचित’कडून वेबसाईटचे उद्धघाटन

‘टोमणे खूप झाले, आता कामाला लागा’! भाजप प्रवक्त्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें