Aditya Thackarey : सिंधुदुर्गात पर्यटन वाढवण्यासाठी प्रयत्नशील : पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे

Aditya Thackarey : सिंधुदुर्गात पर्यटन वाढवण्यासाठी प्रयत्नशील : पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे
सिंधुदुर्गात पर्यटन वाढवण्यासाठी प्रयत्नशील
Image Credit source: टीव्ही 9

मत्स्यालयाचा प्रस्ताव असून अनेक हॉटेलांचे देखील प्रस्ताव येत आहेत. लागणाऱ्या परवान्यांची संख्या ही 80 वरुन 10 वर आणली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले हे केवळ किल्ले नसून ती मंदिरे आहेत. पर्यटन आणि त्यांचे संवर्धन अशा दोन्हींबाबत काम सुरु आहे, अशी माहिती संतोष जिरगे यांनी दिली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Mar 28, 2022 | 7:40 PM

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गमध्ये पर्यटनवाढीला वाव आहे. त्यावर लक्ष्य केंद्रीत करुन पर्यटन (Tourism) वाढवणं आवश्यक आहे आणि तसं होत आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackarey) यांनी माध्यमांशी बोलताना दिली. पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मालवण जेट्टी बंधाऱ्याची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, सिंधुरत्न समृद्ध योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आदी उपस्थित होते. (Tourism Minister Aditya Thackeray inspects Malvan Jetty embankment)

मालवण नगरपरिषद क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या मत्स्यालय व जैवविविधता माहिती केंद्राचे सादरीकरण मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी केले. मत्स्यालयाचा प्रस्ताव असून अनेक हॉटेलांचे देखील प्रस्ताव येत आहेत. लागणाऱ्या परवान्यांची संख्या ही 80 वरुन 10 वर आणली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले हे केवळ किल्ले नसून ती मंदिरे आहेत. पर्यटन आणि त्यांचे संवर्धन अशा दोन्हींबाबत काम सुरु आहे, अशी माहिती संतोष जिरगे यांनी दिली.

आदित्य ठाकरेंनी कुणकेश्वर मंदिरात दर्शनही घेतले

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे सध्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी आज देवगडला कुणकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. शंकराची विधिवत पूजा करून खास मंदिरातील पुजाऱ्यांनी आदित्य ठाकरेंसाठी गाऱ्हाणे घातलं. कुणकेश्वर मंदिरात आलेल्या आदित्य ठाकरे यांचा मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून सत्कार देखील करण्यात आला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी कुणकेश्वर परिसराच्या विकासकामांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केला. कोकण आपण उगाचच राजकीय दौरे करत आलो. कोकण खरंच सुंदर आहे. इथे आपण सध्या फळांचा राजा हापूससाठी आल्याचं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं. (Tourism Minister Aditya Thackeray inspects Malvan Jetty embankment)

इतर बातम्या

‘टोमणे खूप झाले, आता कामाला लागा’! भाजप प्रवक्त्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : आमदारांना घरं देण्यावरुन शरद पवारांनी फटकारलं! ठाकरे सरकारला पर्यायही सुचवला

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें