Video: अती शहाणा त्याचा हळदीत ‘बैल’ रिकामा, बाप लेकाविरोधात अखेर गुन्हा दाखल

| Updated on: Apr 18, 2021 | 12:39 PM

कल्याणच्या एका हळदी कार्यक्रमात चक्क बैल नाचवले आणि त्यासाठी मोठी गर्दीही जमली.(Kalyan chinchpada Haldi function)

Video: अती शहाणा त्याचा हळदीत बैल रिकामा, बाप लेकाविरोधात अखेर गुन्हा दाखल
kalyan haldi function
Follow us on

कल्याण : कल्याण-ठाणे-डोंबिवलीत कोरोनाचा एवढा मोठा स्फोट झालाय की ना बेड मिळतायत ना ऑक्सिजन तरीही लोक मात्र स्वत:च्याच मस्तीत असल्याचं दिसतं आहे. कल्याणच्या एका हळदी कार्यक्रमात चक्क बैल नाचवले आणि त्यासाठी मोठी गर्दीही जमली. (Kalyan chinchpada village Haldi function bull Dance violate Corona law and curfew)

नेमकं काय झालं?

कल्याण पुर्वला चिचापाडा नावाचं गाव आहे. इथले रहीवाशी आहेत प्रकाश म्हात्रे. त्यांचा मुलगा आहे वैभव म्हात्रे. वैभवच्या हळदीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात पाहुण्यारावळ्यांची गर्दी जमली होती. ती कमी म्हणून की काय, काही उत्साही मंडळी पोरांनी या गर्दीत बैल घुसवले. म्हणजे हळदीच्या कार्यक्रमात बैल आणून नाचवले. त्यातही मंडळींनी बैलावर पैसे उधळले. नोटांचा अक्षरश: पाऊस पाडला. लोकांकडे पैसे नाहीत, जगायचं कसं हा मोठा प्रश्न आहे आणि म्हात्रेंच्या या हळदी कार्यक्रमात मात्र बैलावर पैशांचा पाऊस पाडला. इतर मंडळी बघत बसली. काही व्हिडीओ या हळदी कार्यक्रमाचे व्हायरल झाले. त्यानंतर हे सगळं प्रकरण उघड झालं. प्रशासकीय यंत्रणाही जागी झाली. प्रभाग अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला. त्यानुसार होऊ घातलेला नवरदेव आणि त्याच्या वडीलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(Kalyan chinchpada village Haldi function bull Dance violate Corona law and curfew)

संबंधित बातम्या : 

VIDEO | संचारबंदीत शेकडो लोकांना जमवून बैलांना नाचवलं, नोटांचीही उधळण

मध्यरात्री भर रस्त्यात कॅब थांबवली, गाडीत बसताच चाकूचा धाक, मोबाईल-पैसे हिसकावले, सुदैवाने पोलिसांची एन्ट्री