VIDEO | संचारबंदीत शेकडो लोकांना जमवून बैलांना नाचवलं, नोटांचीही उधळण

कल्याणंमधील चिंचपाडा गावात असाच एक गंभीर प्रकार समोर आला आहे. येथे हळदी समारंभात शेकडो लोकांना जमवून बैलांना नाचवण्यात आले आहे. (kalyan chinchpada corona law curfew haldi function)

  • अमजद खान, टीव्ही 9 मराठी, कल्याण
  • Published On - 18:23 PM, 17 Apr 2021
VIDEO | संचारबंदीत शेकडो लोकांना जमवून बैलांना नाचवलं, नोटांचीही उधळण
KALYAN HALDI FUNCTION

ठाणे : देशात तसेच राज्यात कोरोनाचा स्फोट झाला आहे. राज्यात रोज हजारोच्या संख्येने नवे कोरोनाग्रस्त आढळत आहेत. रुग्ण वाढण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे राज्यात आरोग्य व्यवस्था तोकडी पडू लागली आहे. या सर्व बाबींचा विचार करुन राज्य सरकारने सर्व राज्यात संचारबंदी लागू केली आहे. मात्र, या संचारबंदीचे अनेक ठिकाणी उल्लंघन होताना दिसत आहे. नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधक नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. कल्याणंमधील चिंचपाडा गावात असाच एक गंभीर प्रकार समोर आला आहे. येथे हळदी समारंभात शेकडो लोकांना जमवून बैलांना नाचवण्यात आले आहे. (kalyan chinchpada village people violate Corona law and curfew gathered hundreds of people in Haldi function)

 लोकांना जमवून हळदी समारंभ

राज्यात सध्या संचारबंदी लागू आहे. त्यामुळे मानवी हालचालींवर अनेक निर्बंध आलेले आहेत. फक्त 25 लोकांच्या अउपस्थितीत लग्न समारंभ आयोजित करण्यास परवानगी आहे. मात्र कल्याण डोंबिवलीत संचारबंदी आहे की नाही असा सवाल उपस्थित होत आहे. या परिसरात कुठे आठवडी बाजार सुरु आहेत. तर कुठे बारमध्ये बसून लोक सर्रासपणे मद्यपान करत आहेत. अशाच प्रकारची एक घटना चिंचपाडा गावात समोर आली आहे. येथे मोठ्या जल्लोषात हळदी सभारंभ आयोजित करण्यात आलाय. या हळदी सभारंभात बैल नाचवण्यात आले आहेत. तसेच या बैलावरपैशाची उधळपट्टीसुद्धा करण्यात आलीये.

पाहा व्हिडीओ :

प्रकार समोर येताच गुन्हा दाखल

या हळदी सभारंभात शेकडो लोक उपस्थित होते. कल्याण पूर्व भागातील चिंचापाडा गावात हा कार्यक्रम होता. या गावातील रहिवासी प्रकाश म्हात्रे यांच्या मुलगा वैभव याचा हळदी कार्यक्रम होता. हा प्रकार समोर आल्यानंतर लोकांनी तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या समारंभावर आक्षेप घेतला आहे. तसेच प्रभाग अधिकारी दीपक शिंदे यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांना कोरोना आणि कायद्याची भिती राहिली नाही का ?, असा प्रश्न विचारला जातोय.

इतर बातम्या :

‘देश जळतोय अन् ‘आधुनिक निरो’ प्रचारात मग्न’; कोरोना, औषध टंचाईवरुन काँग्रेसचा मोदींवर निशाणा

रेमडेसिवीरच्या नावाने पॅरासिटामोलच्या गोळ्यांचे पाणी, 35 हजारांना बनावट इंजेक्शची विक्री, बारामतीत टोळीचा पर्दाफाश

Tesla ने त्वरित भारतात उत्पादन सुरु करावं, अन्यथा… नितीन गडकरींचा सल्लावजा इशारा

(kalyan chinchpada village people violate Corona law and curfew gathered hundreds of people in Haldi function)