AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘देश जळतोय अन् ‘आधुनिक निरो’ प्रचारात मग्न’; कोरोना, औषध टंचाईवरुन काँग्रेसचा मोदींवर निशाणा

मोदी सरकारने महाराष्ट्राला रेमेडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा न करण्याचा आदेश रेमेडेसिव्हीरची निर्यात करणाऱ्या कंपन्यांना दिला आहे, असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे. (sachin sawant narendra modi remdesivir corona patient)

'देश जळतोय अन् 'आधुनिक निरो' प्रचारात मग्न'; कोरोना, औषध टंचाईवरुन काँग्रेसचा मोदींवर निशाणा
h
| Updated on: Apr 17, 2021 | 5:31 PM
Share

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोज हजारोंच्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. रुग्ण वाढत असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडतोय. राज्यात सर्वच जिल्ह्यांत रेमेडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. त्यांनी मोदी सरकारने महाराष्ट्राला रेमेडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा न करण्याचा आदेश रेमेडेसिव्हीरची निर्यात करणाऱ्या कंपन्यांना दिला आहे. तसेच या आदेशाचे उल्लंघन केल्यास कंपन्यांचा परवाना रद्द करण्याची धमकीसुद्धा केंद्राने दिली आहे, असा गंभीर आरोप केला आहे. तसेच हे कृत्य अत्यंत क्रूर आणि भयंकर असून देश जळत असताना आधुनिक निरो निवडणूक प्रचारात मग्न आहे, असा घणाघाती शाब्दिक हल्लासुद्धा सचिन सावंत यांनी मोदींवर केला आहे. (Maharashtra Congress and Sachin Sawant criticizes Narendra Modi and Cenral Government on shortage of Remdesivir injection and increase in Corona patient said Modi is modern Nero)

केंद्रातील मंत्री ट्रोलच्या भूमिकेत

काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट करताना सावंत म्हणाले की, कोरोनाच्या संकटाचा मोदी सरकार राजकीय संधी म्हणून वापर करत आहे. मानवतेच्या समोर असलेल्या या संकटामध्ये केंद्र आणि राज्य सरकारांनी मिळून एकत्रितपणे मुकाबला करणे अपेक्षित असताना मोदी सरकार मात्र महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारची बदनामी कशी होईल यासाठी केंद्रातील मंत्री ट्रोलच्या भूमिकेत शिरले आहेत, असा आरोपसुद्धा सावंत यांनी केला आहे.

केंद्र सरकार रेमेडेसिव्हीर उत्पादक कंपन्यांवर दबाव टाकतंय

महाराष्ट्राला वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात केला जात नाही. यासोबतच लस आणि ऑक्सीजनच्या पुरवठ्यातही महाराष्ट्राला सापत्न वागणूक दिली जात आहे. आता तर महाराष्ट्राला रेमेडेसिव्हीर इंजेक्शनही मिळू नये म्हणून केंद्र सरकार रेमेडेसिव्हीर उत्पादक कंपन्यांवर दबाव टाकत आहे. यापेक्षा अमानवीय कोणतेही सरकार असू शकत नाही, असेसुद्धा सावंत यांनी म्हटले आहे. सोबतच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी या प्रकाराचा जाहीर निषेध करत असल्याचेसुद्धा सावंत यांनी सांगितले आहे.

हे तर आधूनिक निरो- सचिन सावंत

त्याचबरोबर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान कार्यालयाला फोन करून राज्याला ऑक्सिजन आणि रेमेडेसिव्हीरचा पुरवठा करण्याची मागणी केली. परंतु  पंतप्रधान पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत, असे कळवण्यात आले. यातूनच हे आधुनिक निरो देश जळत असताना निवडणूक प्रचारात मग्न आहेत, अशी घणाघाती टीकासुद्धा सावंत यांनी केली. तसेच केंद्र जर राज्याला रेमेडेसिव्हीरचा पुरवठा होऊ देणार नसेल तर महाराष्ट्र सरकारने या कंपन्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीसुद्धा सावंत यांनी केली.

इतर बातम्या :

रेमडेसिवीरच्या नावाने पॅरासिटामोलच्या गोळ्यांचे पाणी, 35 हजारांना बनावट इंजेक्शची विक्री, बारामतीत टोळीचा पर्दाफाश

कोरोनाची तिसरी लाट कधीही उसळेल, कायमस्वरुपी नियोजन करा, उद्धव ठाकरेंचं उद्योगांना आवाहन

“हॅलो, उद्धव बोलतोय, नंतर कॉल करा, मोदीजी निवडणुकीनंतर बोलतील”

(Maharashtra Congress and Sachin Sawant criticizes Narendra Modi and Cenral Government on shortage of Remdesivir injection and increase in Corona patient said Modi is modern Nero)

मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.