AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Physics Rules : रिकाम्या खोलीत आवाज का घुमतो बरं? जाणून घ्या वैज्ञानिक कारण…

Physics Behind Echo Sound : आपण जेव्हा एखाद्या रिकाम्या घरात काही बोलतो, तेव्हा आवाज भिंतींना धडकून पुन्हा तुमच्या कानांपर्यंत परत येतो. मात्र असे का होते? यामागील विज्ञान काय आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.

Physics Rules : रिकाम्या खोलीत आवाज का घुमतो बरं? जाणून घ्या वैज्ञानिक कारण...
Echo SoundImage Credit source: Google
| Updated on: Mar 14, 2026 | 7:25 PM
Share

तुम्ही अनेकदा अनुभवले असेल की, आपण जेव्हा एखाद्या नव्या आणि पूर्णपणे रिकाम्या घरात काही बोलता, तेव्हा तुमचा आवाज भिंतींना धडकून पुन्हा तुमच्या कानांपर्यंत परत येतो. कधी कधी असे वाटते की जणू खोलीच्या बाजूला लपलेली व्यक्ती तुमच्या आवाजाची नक्कल करत आहे. लहानपणी तुम्हाला हा अनुभव जादूसारखा वाटत असेल, पण विज्ञानाच्या भाषेत याला ‘इको’ म्हणजेच प्रतिध्वनी असे म्हणतात. हा भौतिकशास्त्रातील अतिशय सोपा आणि सुंदर नियम आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ध्वनी म्हणजे आवाज प्रकाश किंवा चेंडूसारखाच वागतो. जसे तुम्ही भिंतीवर चेंडू फेकला तर तो उडून पुन्हा तुमच्याकडे येतो, त्याचप्रमाणे आपला आवाजही लहरींच्या स्वरूपात प्रवास करतो. त्यामुळे आवाज समोर भिंत किंवा इतर अडथळा आला की तो त्यावर आदळून परत येतो. मात्र तुम्हाला प्रश्न पडला असेल की, प्रतिध्वनी फक्त रिकाम्या खोल्यांमध्येच का ऐकू येतो? भरलेल्या खोलीत आवाज का ऐकू येत नाही? याची उत्तरे आपण आज जाणून घेणार आहोत

आवाज भिंतीवरून परत का येतो?

भौतिकशास्त्राचा एक सोपा नियम आहे, ज्याला परावर्तन असे म्हणतात. जेव्हा ध्वनीच्या लहरी एखाद्या कठीण पृष्ठभागावर म्हणजे काँक्रीटच्या भींतीवर आदळतो तेव्हा त्या पूर्णपणे शोषल्या न जाता परत परावर्तित होतात. यालाच प्रतिध्वनी किंवा इको म्हणतात. जसा आरशावरून प्रकाश परत येतो, तसाच कठोर भिंतीवरून आवाज परत येतो.

17.2 मीटरचे अंतर

तुम्ही हे अनुभवले असेल की, प्रत्येक खोलीत प्रतिध्वनी का ऐकू येत नाही. विज्ञानाच्या मते स्पष्ट प्रतिध्वनी ऐकण्यासाठी आपल्यामध्ये आणि भिंतीमध्ये किमान 17.2 मीटर अंतर असणे आवश्यक आहे. कारण आपला मेंदू दोन आवाजांमधील फरक तेव्हाच ओळखू शकतो जेव्हा त्यांच्या मध्ये किमान 0.1 सेकंद अंतर असते. जर खोली लहान असेल तर आवाज इतक्या पटकन परत येतो की मेंदू मूळ आवाज आणि त्याची प्रतिध्वनी यांच्यात फरक समजू शकत नाही.

रिकामी खोली विरुद्ध भरलेली खोली

रिकाम्या खोलीत भिंती सपाट आणि कठीण असतात. त्या आवाजाला चेंडूसारखा उडवून परत पाठवतात. भरलेल्या खोलीत सोफ्याचे कुशन, पडदे, कपडे आणि इतर वस्तू ध्वनी शोषक म्हणून काम करतात. या वस्तू ध्वनीलहरी स्वतःमध्ये शोषून घेतात, त्यामुळे त्या भिंतीवरून आवाज परत येत नाहीत. त्यामुळे प्रतिध्वनी पुन्हा ऐकू येण्यासाठी खोली रिकामी असणे आवश्यक आहे.

Follow Us
खरातच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू, फॉरेन्सिक
खरातच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू, फॉरेन्सिक.
लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल, म्हणाल
लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल, म्हणाल.
Amravati Case | मित्राला मुलींचे घाणेरडे व्हिडीओ पाठवायचा नंतर... आरोप
Amravati Case | मित्राला मुलींचे घाणेरडे व्हिडीओ पाठवायचा नंतर... आरोप.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर, मुख्य आरोपी....
संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर, मुख्य आरोपी.....
नाशिक IT प्रकरण, फरार निदा खान या ठिकाणी लपल्याचा दावा, जामीन अर्ज दाख
नाशिक IT प्रकरण, फरार निदा खान या ठिकाणी लपल्याचा दावा, जामीन अर्ज दाख.
उन्हाचा तडाखा वाढला, अहिल्यानगरमध्ये तापमान 41 अंशावर
उन्हाचा तडाखा वाढला, अहिल्यानगरमध्ये तापमान 41 अंशावर.
नाशिक धर्मांतरण प्रकरणी अमित ठाकरे आक्रमक; म्हणाले, मी असतो तर...
नाशिक धर्मांतरण प्रकरणी अमित ठाकरे आक्रमक; म्हणाले, मी असतो तर....
TV9 चॅम्पियनशिप सीझन 2 साठी काऊंटडाऊन सुरू!
TV9 चॅम्पियनशिप सीझन 2 साठी काऊंटडाऊन सुरू!.
खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन
खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन.
राहुरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वीच राष्ट्रवादीला मोठा धक्का
राहुरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वीच राष्ट्रवादीला मोठा धक्का.