AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NCP | सस्पेन्स संपला! राष्ट्रवादीकडून झिशान सिद्धीकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब, चर्चांना पूर्णविराम

NCP | सस्पेन्स संपला! राष्ट्रवादीकडून झिशान सिद्धीकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब, चर्चांना पूर्णविराम

| Updated on: Apr 30, 2026 | 10:31 AM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेसाठी उमेदवार जाहीर करण्यात आला असून, झिशान सिद्धीकी यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती आणि अनेक दिग्गज नेत्यांची नावेही रेसमध्ये होती. त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

या पार्श्वभूमीवर काल सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध इच्छुक उमेदवारांवर चर्चा करण्यात आली. अखेर सखोल विचारविनिमयानंतर झिशान सिद्धीकी यांच्या नावावर एकमत झाले आणि आज अधिकृतपणे त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. विधान परिषदेसाठी झिशान सिद्धीकी यांचे नाव सुरुवातीपासूनच चर्चेत होते. मात्र, काही अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्यांची नावेही समोर येत असल्याने अंतिम निर्णयाबाबत सस्पेन्स कायम होता. रात्री उशिरापर्यंत बैठका आणि चर्चा सुरू होत्या. अखेर पक्षाने झिशान सिद्धीकी यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली.
बाबा सिद्धीकी यांच्या निधनानंतर झिशान सिद्धीकी यांना पक्षात मोठी जबाबदारी मिळू शकते, अशी चर्चा आधीपासूनच होती. त्यानुसार आता त्यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. कमी वयातच त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आल्याने पक्षातील नव्या पिढीला संधी दिल्याचेही मानले जात आहे.
दरम्यान, पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा झिशान सिद्धीकी यांच्या नावाला पाठिंबा असल्याची माहितीही समोर आली आहे. अनेक इच्छुक उमेदवार असूनही अखेर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्पष्ट संदेश दिल्याचे मानले जात आहे.

Published on: Apr 30, 2026 10:31 AM
Follow Us