मला भडकवू नका, नाहीतर येणे जाणे बंद करून टाकेन, महापौर भयंकरच भडकल्या; नेमकं काय घडलं?

कल्याण-डोंबिवलीत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. आंबिवलीतील नाले-गटारांवरील अतिक्रमणामुळे पाणी साचले. पाहणी दौऱ्यात महापौर हर्षाली थविल संतापल्या. त्यांनी अतिक्रमण तात्काळ हटवण्याचे आणि अडथळे निर्माण करणाऱ्यांना दंड लावण्याचे कठोर आदेश दिले. 'मला भडकवू नका, नाहीतर येणे जाणे बंद करेन' असा इशारा देत, पालिका आता कठोर कारवाई करणार आहे.

मला भडकवू नका, नाहीतर येणे जाणे बंद करून टाकेन, महापौर भयंकरच भडकल्या; नेमकं काय घडलं?
कल्याण-डोंबिवलीच्या महापौर संतापल्या
| Updated on: Jul 11, 2026 | 2:42 PM

सलग पाच दिवस कल्याण-डोंबिवली परिसराला पावसाने झोडपलं. पावसाने रौद्ररुप धारण केल्याने या परिसरातील सखल भागात प्रचंड पाणी साचलं होतं. त्यामुळे वाहतुकीचीही समस्या निर्माण झाली होती. तसेच लोकांची एकच तारांबळ उडाली होती. अंबिवलीत तर गटार आणि नाल्यांवर अतिक्रमण झाल्याने पाणी जायला जागाच राहिली नाही. त्यामुळे हा परिसर जलमय झाला आहे. लोकांच्या चुकीमुळे त्यांच्या घरात पाणी शिरल्याची वेळ आली आहे. या भागाची पाहणी करत असताना इराणी महिलांशी महापौर हर्षाली थविल यांची चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. यावेळी महापौरांचा रौद्रावतार पाहून इराणी महिलाही घाबरल्या. तसेच या अतिक्रमणावर त्वरीत कारवाई करण्याचे आदेशच महापौरांनी सोडले.

कल्याण-डोंबिवलीत दोन ते तीन दिवसांच्या मुसळधार पावसानंतर अनेक भाग जलमय झाले आहेत. विशेषतः आंबिवली परिसरातील इराणी वस्तीत गटार आणि नाल्यांवरील अतिक्रमणामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याचे समोर आले. याची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या महापौर हर्षली थविल यांनी अतिक्रमणधारकांना चांगलेच खडसावले. यावेळी काही इराणी महिलांशी वाद झाल्यानंतर महापौरांचा संताप अनावर झाला असून त्यांनी नालेसफाईसाठी अडथळा येणाऱ्या गटार आणि नाल्यांवर करण्यात आलेली अनधिकृत बांधकामे, शेड तात्काळ “स्वतःहून काढून टाका, अन्यथा महापालिका कारवाई करेल,” असा इशारा दिला. यावरून काही इराणी महिलांनी वाद घातला व त्यानंतरच महापौर संतापल्या अधिकाऱ्यांना तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत.

Loading...

महापौर संतापल्या

मुसळधार पावसामुळे आंबिवली आणि टिटवाळा परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले. पाण्याचा निचरा न होण्यामागे गटार आणि नाल्यांवरील अतिक्रमण हे प्रमुख कारण असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापौर हर्षाली थविल यांनी आंबिवलीतील इराणी वस्तीची पाहणी केली. पाहणीदरम्यान गटार आणि नाल्यांवर करण्यात आलेली अनधिकृत बांधकामे, शेड आणि अन्य अडथळे पाहून महापौर संतापल्या. अतिक्रमण तात्काळ हटवण्याच्या सूचना देताना त्यांनी संबंधितांना “स्वतःहून सर्व काढून टाका, अन्यथा महापालिका कारवाई करेल,” असा स्पष्ट इशारा दिला.

दंड लावा

यावेळी काही या परिसरातील काही इराणी महिलांनी महापौरांशी वाद घालण्याचा प्रयत्न केल्यानंतर वातावरण तापले. “मला भडकवू नका नाहीतर तुमचा येणं जाणं देखील बंद करेल, नियम सर्वांसाठी सारखे आहेत, असे सुनावत नालेसफाईसाठी अडथळे करतात त्यांना 10 हजार, 20-20 हजार रुपये दंड लावा, असे सांगत अतिक्रमण हटवण्याची कारवाई तातडीने सुरू करण्याचे महापौरांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले. पावसाळ्यात नागरिकांना पूरस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी नाल्यांवरील सर्व अतिक्रमणे हटवली जाणार असल्याचेही महापौरांनी स्पष्ट केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us