
ठाणे : प्रभाग रचनेनुसार कल्याण-डोंबिवलीत प्रथमच बहुसदस्य प्रभाग पध्दती जाहीर करण्यात आली आहे. यामुळे एकाच प्रभागात तीन नगरसेवक असणार आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेत मागील 24 वर्षापासून शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या (Kalyan Dombivali Municipal Corporation) निवडणुकीत पुन्हा तिकीट मिळवण्यासाठी विद्यमान नगरसेवकांनी लॉबींग सुरु केली आहे.
राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले आहे. यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना भाजपची सत्ता असली तरी यंदा एकनाथ शिंदे गट आणि भाजपची युती होऊ शकते. कल्याण डोंबिवली महापालिकेतील अनेक नगरसेवक शिंदे गटीत सामील झाले आहेत. यामुळे कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिंदे गटाचा प्रभाव दिसू शकतो.
| पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
|---|---|---|
| शिवसेना | ||
| भाजप | ||
| काँग्रेस | ||
| राष्ट्रवादी | ||
| मनसे | ||
| इतर आणि अपक्ष |
नवीन प्रभाग रचनेनुसार एका प्रभागातून तीन नगरसेवक निवडले जाणार आहेत. त्यानुसार प्रभाग क्रमांक 20 मध्ये आता प्रभाग क्रमांक 20 अ, प्रभाग क्रमांक 20 ब आणि प्रभाग क्रमांक 20 क असे तीन प्रभाग असणार आहेत. यापैकी प्रभाग क्रमांक 20 अ हा अनूसुचीत जातीच्या महिला उमेदवारासाठी आरक्षित करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 20 ब हा सर्वसाधारण महिला उमेद्वाराकरीता आरक्षित करण्यात आला आहे. तर प्रभाग क्रमांक 21 क सर्वसाधारण खुल्या गटासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 20 मध्ये भाजपचे वरुण पाटील नगरसेवका आहेत. यामुळे त्या प्रभाग क्रमांक 20 क या खुल्या गटामधून तिकीट मिळवण्याचा ते प्रयत्न करु शकतात.
| पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
|---|---|---|
| शिवसेना | ||
| भाजप | ||
| काँग्रेस | ||
| राष्ट्रवादी | ||
| मनसे | ||
| इतर आणि अपक्ष |
प्रभाग क्रमांक 20 हा कोळसेवाडी, चिकणीपाडा असा विस्तारीत आहे. म्हसोबा चौक, तिसगांव नाका, “जे” प्रभागक्षेत्र कार्यालय, पोटे मैदान, दादासाहेब गायकवाड क्रिडांगण, चिकणीपाडा, स्वामी समर्थ मठ, शिवाजीनगर रस्ता, जुनी जनता सहकारी बँक रस्ता गणेश मंदिर, दुर्गामाता मंदिर, कोळसेवाडी, काटेमानिवली रस्ता, म्हसोबा चौक रस्ता ही प्रभागातील महत्वाची ठिकाणे आहेत. प्रभाग क्रमांक 20 ची एकूण लोकसंख्या 31586 इतकी आहे. अनुसूचित जातीचे 4939 मतदार आहेत. तर 1504 मतदार हे अनुसूचित जमातीचे आहेत.
| पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
|---|---|---|
| शिवसेना | ||
| भाजप | ||
| काँग्रेस | ||
| राष्ट्रवादी | ||
| मनसे | ||
| इतर आणि अपक्ष |
उत्तर- मध्य रेल्वे गोडावून पासुन पुढे मध्ये रेल्वे हद्दीने कोळसेवाडी रिक्क्षा स्टॅन्ड पर्यंत.
पूर्व – मध्य रेल्वे कोळसेवाडी रिक्क्षा स्टॅन्ड पासुन पुढे काटेमानिवली रस्त्याने नाना पावशे चौक पर्यंत. पुढे उजव्या बाजुने बाळाराम फायबर नेट ऑफिस वगळुन विनायक चौक पर्यंत. पुढे चाळीच्या गल्लीमधून एस. जी. गायकवाड बिल्डींग सह, शिवाजीनगर रस्त्याने अॅक्सीस बँक ए.टी.एम. वगळुन आर्शिवाद कलेक्शन सह, गटार/नाला ने चाळी मधुन पुढे ईश्वरी निवास चाळ, राजहंस कॉलनी चाळ, राजा कॉलनी चाळ, कल्पतरू चाळी सह. पुढे नुतन विद्यामंदिरसह “ड” वार्ड पाण्या च्या टाकी पुना लिंक रस्त्या पर्यंत.
दक्षिण – “ड” वार्ड पाण्याच्या टाकी पासुन पुढे पुना लिंक रस्त्याने मिरा अपार्टमेंट सह तिसगांव नाका पुना लिंक रस्त्यापर्यंत.
पश्चिम – पुना लिंक रोड, तिसगांव नाक्या पासुन पुढे म्हसोबा चौक रस्त्याने पुढे प्रकाश अपार्टमेंट म्हसोबा चौक