Kankavli Assembly constituency : नितेश राणे यांना कोण टक्कर देणार?
कणकवली हा मतदारसंघ नेहमीच भाजपचा गड राहिला आहे. २० वर्षाहून अधिक काळ या मतदारसंघात भाजपने विजय मिळवला आहे. आता पुन्हा एकदा या मतदारसंघातून नितेश राणे निवडणूक लढवणार आहेत. भाजपच्या पहिल्याच यादीत त्यांचं नाव आले. काँग्रेसच्या तिकीटावर एकदा तर भाजपच्या तिकीटावर दुसऱ्यांदा ते निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर कोणाचं आव्हान असेल जाणून घ्या.
कणकवली विधानसभा मतदारसंघ २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेननंतर निर्माण झाला होता. कणकवली मतदारसंघात देवगड, वैभववाडी आणि कणकवली हे तालुके येतात. हा विधानसभा मतदारसंघ रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मोडतो. या मतदारसंघातून पहिल्यांदा भाजपचे प्रमोद जठार निवडून आले होते. त्यानंतर २०१४ आणि २०१९ मध्ये नितेश राणे यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला. २०१४ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. तर २०१९ मध्ये भाजपच्या तिकीटावर त्यांनी निवडणूक लढवली होती. यंदा पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक २०२४ साठी नितेश राणे यांनी भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
नितेश राणे यांनी २०१४ मध्ये पहिल्यांदा या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. नितेश राणे यांनी भाजपचे प्रमोद जठार यांचा पराभव केला होता. २०१९ च्या निवडणुकीत नितेश राणे यांनी शिवसेनेचे सतीश सावंत यांचा पराभवकेला होता. सलग दोन वेळा निवडणुका जिंकणारे नितेश राणे हॅट्ट्रिक साधणार का? याबाबत मतदारांमध्ये उत्सूकता आहे.
कणकवली विधानसभा मतदारसंघातून नितेश राणे हे महायुतीचे उमेदवार असणार आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून कोणता उमेदवार दिला जातो याकडे लक्ष असेल. पण महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे संदेश पारकर, सतीश सावंत, अतुल रावराणे, सुशांत नाईक हे इच्छुक आहेत.
मतदारसंघाचा इतिहास
कणकवली विधानसभेची जागा गेल्या २० वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे. या ठिकाणी शिवसेना पक्ष मजबूत असल्याने भाजपला देखील त्याचा फायदा झाला आहे. 1995 मध्ये या जागेवरून भाजपचे अप्पा गोगटे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 1999 च्या निवडणुकीत गोगटे पुन्हा विजयी झाले. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने अजित गोगटे यांना येथून उमेदवारी दिली आणि अजित यांनी देखील विजय मिळला होता. 2009 मध्ये भाजपचे प्रमोद जठार यांनी काँग्रेसचे रवींद्र फाटक यांचा 34 मतांनी पराभव करून ही जागा जिंकली होती.
२०१९ चा निकाल
उमेदवार | पक्ष | मतं |
नितेश राणे | भाजप | ८४५०४ |
सतीश सावंत | शिवसेना | ५६३८८ |
२०१४ चा निकाल
उमेदवार | पक्ष | मतं |
नितेश राणे | काँग्रेस | ७४७१५ |
प्रमोद जठार | भाजप | ४८७३६ |
२००९ चा निकाल
उमेदवार | पक्ष | मतं |
प्रमोद जठार | भाजप | ५७६५१ |
रवींद्र फाटक | काँग्रेस | ५७६१७ |