AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Smat Final : मुंबईने उंचावली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी, सूर्यांश शेडगे-अर्थव अंकोलेकर जोडीची निर्णायक खेळी, मध्य प्रदेशचा 5 विकेट्सने धुव्वा

Atharva Ankolekar and Suryansh Shedge : मुंबईने दुसऱ्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा खिताब जिंकला आहे. मुंबईने अंतिम सामन्यात मध्य प्रदेशचा 5 विकेट्सने धुव्वा उडवला.

Smat Final : मुंबईने उंचावली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी, सूर्यांश शेडगे-अर्थव अंकोलेकर जोडीची निर्णायक खेळी,  मध्य प्रदेशचा 5 विकेट्सने धुव्वा
suryansh shedge and atharva ankolekar smat final 2024
| Updated on: Dec 15, 2024 | 8:43 PM
Share

श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात मुंबईने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 जिंकली आहे. मुंबईने बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशवर विकेट्सने विजय मिळवला आहे. मध्य प्रदेशने मुंबईला विजयासाठी 175 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईने हे आव्हान 5 विकेट्स गमावून 17.5 ओव्हमरमध्ये पूर्ण केलं. सूर्यांश शेडगे आणि अर्थव अंकोलेकर या जोडीने निर्णायक क्षणी स्फोटक खेळी करत मुंबईला विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली. मुंबईची सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. मुंबईने याआधी 2022-2023 या हंगामात अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात हा खिताब जिंकला होता.

मुंबईची बॅटिंग

मुंबईच्या टॉप आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाजांनी चांगली बॅटिंग केली. मुंबईचे फलंदाज चांगल्या सुरुवातीनंतरही ठराविक अंतराने बाद झाले.  त्यापैकी अजिंक्य रहाणे आणि सूर्यकुमार यादव या दोघांचा अपवाद वदळता एकालाही मोठी खेळी साकारता आली नाही.  पृ्थ्वी शॉ 10, कॅप्टन श्रेयस अय्यर 16 आणि शिवम दुबेने 9 धावा केल्या. तर अजिंक्य रहाणे याने 37 तर सूर्यकुमार यादवने 48 धावांची खेळी केली. त्यामुळे मुंबईची स्थिती 14.4 ओव्हरमध्ये 5 बाद 129 अशी झाली.

त्यामुळे मुंबई कुठेतरी अडचणीत सापडली होती. मात्र तेव्हा सूर्यांश शेडगे आणि अर्थव अंकोलेकर या जोडीने विस्फोटक बॅटिंग केली. दोघांनी संधी मिळेल तेव्हा चौफेर फटकेबाजी केली आणि मुंबईला विजयी केलं. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 51 धावांची नाबाद विजयी भागीदारी साकारली. सूर्यांशने 15 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 3 फोरसह नॉट आऊट 36 रन्स केल्या. तर अर्थवने 6 बॉलमध्ये 2 सिक्ससह नॉट आऊट 16 रन्स केल्या.

मुंबईच डोमेस्टिक क्रिकेटचा किंग

मुंबई प्लेइंग इलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, तनुष कोटियन, रॉयस्टन डायस आणि अथर्व अंकोलेकर.

मध्य प्रदेश प्लेइंग इलेव्हन : रजत पाटीदार (कर्णधार), अर्पित गौड, हर्ष गवळी (विकेटकीपर), सुभ्रांशु सेनापती, हरप्रीत सिंग भाटिया, व्यंकटेश अय्यर, त्रिपुरेश सिंग, राहुल बाथम, शिवम शुक्ला, कुमार कार्तिकेय आणि आवेश खान.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...