AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिवाळ्यात घरगुती तूपाच्या या 5 टिप्स तुम्हाला ‘या’ समस्यांपासून वाचवतील

हवामान बदलताच शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी अनेक घरगुती उपायांचा वापर करण्यास सुरुवात करतो. तसेच हिवाळ्यात तुमच्या आहारात घरगुती तुपाचा वापर नक्की करा. तुम्हाला माहित आहे का, हिवाळ्याच्या दिवसात होणाऱ्या सर्दीच्या समस्येपासून घरगुती तूप तुम्हाला कसे बरे करू शकते. चला जाणून घेऊयात

हिवाळ्यात घरगुती तूपाच्या या 5 टिप्स तुम्हाला 'या' समस्यांपासून वाचवतील
| Edited By: Mayuri Sajerao | Updated on: Dec 15, 2024 | 8:15 PM
Share

डिसेंबर महिना सुरू होताच हवामानातील गारवाही झपाट्याने वाढला आहे. तसेच अनेक डोंगराळ भागात बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. अशावेळी शरीराला उबदार ठेवण्यासाठी उबदार कपडे घालतो. त्याचबरोबर शरीर आतून उबदार ठेवण्यासाठी आहारात निरोगी पदार्थांचाही समावेश करणे गरजेचे आहे. आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात असलेले घरगुती देशी तूप हे एक सुपरफूड आहे जे खाल्ल्याने फायदा तर होतोच, पण अनेक वेगवेगळ्या समस्यांपासून देशी तूपच्या या टिप्स तुम्हाला आराम देऊ शकतात.

देशी तूप हे एक असे फॅट आहे जे पोषक तत्वांनी देखील समृद्ध आहे. यात व्हिटॅमिन ए, डी आणि ई असते. याशिवाय देशी तूपातील ओमेगा ३ फॅटी अॅसिड चयापचय वाढविण्यास मदत करते. याच्या सेवनाने जळजळ कमी होते आणि शरीर आतून उबदार राहते. सध्या जाणून घेऊया हिवाळ्यात घरगुती देशी तूप तुमच्यासाठी कसे उपयुक्त ठरू शकते.

घसा खवखवण्यापासून आराम मिळवण्यासाठी देशी तूप उपयुक्त

हिवाळ्यात थंड वातावरणामुळे अनेकांना खोकला आणि घसा खवखवणे ही सर्वात सामान्य समस्या सतावत असते. यापासून आराम मिळवण्यासाठी एक चमचा घरगुती देशी तुपात अर्धा चमचा सुका आल्याची पावडर, काळी मिरी पावडर मिसळून कोमट पाण्यासोबत घ्या. यामुळे तुम्हाला खूप दिलासा मिळेल.

देशी तूप त्वचेला मॉइश्चरायझ करते

घरगुती तूपात जीवनसत्त्वे आणि फॅटी ॲसिड असतात जे आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते . वातावरणात थंड वारे वाहताच अनेकांना कोरड्या त्वचेच्या समस्या जाणवू लागतात. यासाठी देशी तूप थेट त्वचेवर लावता येते किंवा तुम्ही प्लेटमध्ये तूप घेऊन त्यात थोडे पाणी घालून फेटल्यास तुपाला छानसा क्रीम सारखे तयार होईल. हे थेट तुमच्या त्वचेवर लावल्याने कोरड्या त्वचेची समस्यापासून सुटका मिळते. तुम्हाला हवे असल्यास या तुपात सुगंधासाठी एसेंशिअल ऑईलचे दोन ते तीन थेंब घालू शकता.

सांधे आणि स्नायूंच्या दुखण्यापासून आराम

घरगुती देशी तुपात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. तुम्ही जर हिवाळाच्या दिवसात आहारात तुपाचे केल्यास तुमच्या हाडांना आणि स्नायूंना फायदा होतो. तसेच थंडीत अनेकजणांना सांधे आणि स्नायूं आखडतात ही समस्या कमी करण्यासाठी एक चमचा तुपात आल्याची पावडर आणि ओवा घाला. गरम करून कोमट झाल्यावर हात पायांना लावा आणि मसाज करा.

सायनस समस्यांपासून आराम मिळतो

ज्यांना सायनस आहे त्यांना हिवाळ्यात खूप त्रासहोत असतो, कारण थंडीमुळे ही समस्या उद्भवते.सायनस समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कोमट देशी तूपाचे दोन थेंब नाकात घाला. यामुळे डोकेदुखीपासूनही आराम मिळतो.

देशी तूपामुळे झोपेची समस्या दूर होईल

हिवाळ्यात वातावरणात योग्य सूर्यप्रकाश नसल्याने अनेकांना उदास वाटणे, मूड खराब होणे, वाढलेला ताण अशा समस्यांमुळे झोपेचा त्रास होऊ लागतो. अशावेळी कोमट देशी तुपाने पायाच्या तळव्यावर मालिश केल्याने बराच आराम मिळतो. याशिवाय देशी तूप दुधासोबत घेता येते. मात्र ज्यांची पचनक्रिया कमकुवत आहे त्यांनी ते टाळावे. अशा प्रकारे देशी तूप आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....