VIDEO | कोल्हापूरच्या पाटील भावांचा नादच खुळा, बहिणीच्या पाठवणीसाठी स्वतः रिक्षा सजवली

| Updated on: Jun 02, 2021 | 11:33 AM

कोल्हापुरातल्या फुलेवाडी येथील रिंगरोड परिसरात राहणाऱ्या आशुतोष चाबूक पाटील आणि अक्षय चाबूक पाटील या दोघा भावांनी ही रिक्षा सजवली (Kolhapur Brothers Decorate Rickshaw )

VIDEO | कोल्हापूरच्या पाटील भावांचा नादच खुळा, बहिणीच्या पाठवणीसाठी स्वतः रिक्षा सजवली
बहिणीच्या पाठवणीसाठी सजवलेली रिक्षा
Follow us on

भूषण पाटील, टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर : हौसेला मोल नसतं, असं म्हटलं जातं, याचं उदाहरण नुकतंच कोल्हापुरात समोर आलं आहे. लॉकडाऊनमध्ये लग्न झालेल्या आपल्या बहिणीची पाठवणी करण्यासाठी भावांनी मोठी मेहनत घेतली. फुला-पानांनी सजवलेल्या रिक्षातून कोल्हापूरच्या भावड्यांनी बहिणीला सासरी सोडलं. (Kolhapur Brothers Decorate Rickshaw by flowers to send Sister to in laws)

बहिणीच्या पाठवणीसाठी स्वतः रिक्षा सजवली

नवविवाहितेला सासरपर्यंत सोडण्यासाठी रिक्षा फुलांनी सजवण्यात आली होती. ही रिक्षा रस्त्याने जाणाऱ्या सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत होती. सध्या या रिक्षाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. भावांनी मेहनत घेऊन सजवलेली रिक्षा पाहून बहीणही हरखून गेली. भावांचं प्रेम पाहून ताईच्या डोळ्यातही नकळत अश्रू तरळले.

बहिणीची हातकणंगलेला पाठवणी

कोल्हापुरातल्या फुलेवाडी येथील रिंगरोड परिसरात राहणाऱ्या आशुतोष चाबूक पाटील आणि अक्षय चाबूक पाटील या दोघा भावांनी ही रिक्षा सजवली. आपल्या बहिणीला हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ येथे सासरला सोडण्यासाठी त्यांनी ही रिक्षा सजवली. तब्बल तीन तास वेळ खर्च करुन फुलं आणि पानांच्या साहाय्याने ही रिक्षा सजवण्यात आली होती, सध्या या रिक्षाचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला असून पाटील भावंडं चर्चेचा विषय ठरली आहेत.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

एका तासात थाळी संपवा, बुलेट जिंका, पुण्यातील हॉटेलची सुसाट ऑफर

इचलकरंजीत ‘अप्सरा’ आल्या, रिक्षा-स्प्लेंडर बाईक्सची अनोखी सौंदर्य स्पर्धा

(Kolhapur Brothers Decorate Rickshaw by flowers to send Sister to in laws)