जोतिबा यात्रेवर महामारीचं सावट, मानकरीच कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे यात्रा रद्द
जोतिबा यात्रेवर कोरोनाचं सावट, मानकरीच कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे यात्रा रद्द (Kolhapur Jyotiba Yatra cancelled Coronavirus )

कोल्हापूर : राज्याता कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याच कारणामुळे सोमवारी (26 एप्रिल) होणाऱ्या जोतिबा डोंगरावरच्या यात्रेवरसुद्धा (Jyotiba Yatra) कोरोनाचं (Coronavirus) सावट आलं आहे. जोतिबा यात्रेमधील मानकऱ्यांच्या केलेल्या तपासणीत तब्बल 5 मानकरी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे ही यात्रा रद्द करण्यात आलीये. तसेच जोतिबा डोंगरावरही अनेकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे. तसेच मानकरीच पॉझिटिव्ह आढळल्याने पारंपरिक विधीवरही सावट आल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर जोतिबा मंदिराकडे जाणारे सर्वच रस्ते बंद करण्यात आले आहेत. तसेच येथे माध्यम प्रतिनिधींनासुद्धा प्रवेश निषिद्ध करण्यात आलाय. (Kolhapur Jyotiba Yatra cancelled due to Coronavirus all ways have been shut down)
मानकरी पॉझिटिव्ह, यात्रेवर कोरोनाचं सावट
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोज नवे रुग्ण वाढत आहे. रुग्ण वाढत असल्यामुळे राज्यातील अनेक सण, समारंभ, यात्रा, जत्रा रद्द करण्यात आल्या आहेत. सध्या सर्व धार्मिक मोजक्या तसेच मानाच्या लोकांच्या अपस्थितीत पार पडत आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील जोतिबा यात्रासुद्धा आगदी मोजक्या लोकांच्या अपस्थितीत काही मानकऱ्यांच्या अपस्थितीतच पार पडणार होती. सोमवारी ही यात्रा असल्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाकडून मानकरी तसेच जोतिबा डोंगरावरील इतर लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी जोतिबा यात्रेदरम्यान पारंपरिक विधी करणाऱ्या मानकऱ्यांपैकी तब्बल 5 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे या यात्रेवर कोरोनाचं सावट आलं आहे. तसेच मानकऱ्यांसोबतच जोतिबा डोंगरावरील अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचेसुद्धा समोर आले आहे.
डोंगराकडे जाणारे सर्व रस्ते बंद
दरम्यान यात्रेसाठी ठरवण्यात आलेल्या मानकऱ्यांपैकी एकूण पाच जाणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे यंदाची जोतिबा यात्रा रद्द करण्यात आली आहे. तसेच यात्रेदरम्यान होणाऱ्या पारंपरिक विधीवरसुद्धा सावट आलं आहे. जोतिबा डोंगराच्या परिसरातील काही लोकांनासुद्धा कोरोनाची लागण झाल्यामुळे कोल्हापूर प्रशासनाने खबरदारी म्हणून जोतिबा डोंगराकडे जाणारे सर्व रस्ते बंद केले आहेत. तसेच, येथे माध्यमांच्या प्रतिनिधींनासुद्धा प्रवेश निषिद्ध करण्यात आला आहे.
इतर बातम्या :
आधार कार्ड हरवले, आता काय करावे? केवळ 50 रुपयांमध्ये चमकदार PVC कार्ड बनवा
(Kolhapur Jyotiba Yatra cancelled due to Coronavirus all ways have been shut down)