AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli : Live मॅचमध्येच विराट बनला ‘अंपायर’, गुजरातविरुद्धच्या मॅचमध्ये जे केलं सगळे पहातच राहिले..

Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 34 व्या मॅचमध्ये गुजरात टायटन्सला 5 विकेट्सनी हरवलं. विराट कोहली या विजयचा शिल्पकार ठरला, ज्याने शानदार खेळी करत 44 बॉलध्ये 81धावा केल्या. मात्र याच खेळीदरम्यान विराट अचानक अंपायरही बनला होता. तुम्ही पाहिला का तो क्षण ?

Virat Kohli : Live मॅचमध्येच विराट बनला ‘अंपायर’, गुजरातविरुद्धच्या मॅचमध्ये जे केलं सगळे पहातच राहिले..
विराट कोहलीची 81 धावांची शानदार खेळीImage Credit source: PTI
| Updated on: Apr 25, 2026 | 7:25 AM
Share

Virat Kohli Orange Cap : विराट कोहली जर मैदानात टिकला तर धावांचा पाऊस पडणार हे निश्चित. असंच काहीसं कालच्या गुजरात टायटन्सविरुद्धच्या मॅटमध्ये घडलं. गुजरातविरुद्धच्या मॅचमध्ये विराटने तूफान फलंदाजी करून 44 बॉलध्ये 81 धावा फटकावल्या. प्लेअर ऑफ द मॅचही तो ठरला आणि ऑरेंज कॅपवरही त्याने पुन्हा ताबा मिळवला. विराट कोहलीने 7 सामन्यांमध्ये 328 धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत 3 अर्धशतके झळकावली असून त्याची सरासरी 54.66 आहे. अशा प्रकारे विराटने 323 धावा करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्माला मागे टाकले आहे. मात्र, कालच्या सामन्यात फक्त विराटची खेळी हेच आकर्ण नव्हतं, तर गुजरातविरुद्ध फलंदाजी करतानाच त्याने असं काही केलं की सगळे प्रेक्षकही आश्चर्यचकित झाले. गुजरातविरुद्ध खेळताना, बॅटिंग करताना विराट कोहली हा अंपायरही बनला होता, हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही तो क्षण पाहिलात का ?

विराट बनला अंपायर

कालच्या सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध अर्धशतक झळकावल्यानंतर विराट कोहली आणखी धोकादायक बनला. त्याने 14 व्या षटकात जेसन होल्डरच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर आणखी एक षटकार मारला. त्याने होल्डरच्या गोलंदाजीवर मारलेला षटकार नेमका बाऊंड्री लाईनजवळ जाऊन पडला. त्यामुळे मैदानातील अंपायर हे थर्ड अंपायरचा सल्ला घेणार, त्यापूर्वीच, विराटने स्वतःच निर्णय दिला षटकार गेल्याचे सांगितलंय, ज्यामुळे एकच हशा पिकला. विशेष म्हणजे त्याचे हावभाव आणि डिसीजन पाहून अंपायरलाही हसू आवरलं नाही. अखेर थर्जड अंपायरनेदेखील विराटचा निर्णय कायम ठेवत सिक्सचा निर्णय दिला.

पुढल्याच बॉलवर आऊट

पण पुढच्याच चेंडूवर विराटचा हृदयभंग झाला. त्याचं कारण म्हणजे या मॅचमध्ये त्याने सहज शतक झळकावले असते, पण होल्डरने पुढच्याच चेंडूवर त्याला बोल्ड (आऊट) केलं. स्वतःच्या या खेळीवर विराट कोहली खूप नाराज झाला आणि रागाच्या भरातच तो मैदानाबाहेर निघून गेला. मात्र, त्याच्या खेळीने आरसीबीचा विजय निश्चित केला आणि अखेरीस संघाने पाच गडी राखून विजय मिळवला.

विराटचा रेकॉर्ड

विराट कोहलीने विक्रम न प्रस्थापित करता एखादा सामना खेळणं हे आता दुर्मिळ आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध मारलेला षटकार हा त्याचा 300 वा आयपीएल षटकार ठरला. त्याने आयपीएलमध्ये 800 चौकारांचा टप्पाही गाठला. आयपीएलमध्ये 1,100 पेक्षा जास्त चौकार मारणारा तो एकमेव खेळाडू आहे.

विजयानंतर काय म्हणाला विराट ?

काल गुजरातविरुद्धच्या सामन्यात विजय मिळाल्यानंतर विराटने प्रतिक्रिया दिली. हा सामना जिंकण्यासाठी फक्त एका चांगल्या भागीदारीची गरज होती. माझ्यामुळे नव्हे, तर देवदत्त पडिक्कलच्या खेळीमुळे फरक पडला, असंही विराट म्हणाला. मला फक्त सामन्यात टिकून राहायचे होते. पडिक्कलसोबतच्या माझ्या भागीदारीने सामन्याचे चित्रच पालटले असंही त्याने नमूद केलं.

Follow Us
तृणमूल काँग्रेसला धक्क्यावर धक्का; CIDची धाड, TMC खासदाराचा राजीनामा
तृणमूल काँग्रेसला धक्क्यावर धक्का; CIDची धाड, TMC खासदाराचा राजीनामा तर, आणखी नेते सोडणार पक्ष?
जळगावात महायुती विरुद्ध महायुती? रेश्मा काळेंचा बंडखोर पवित्रा कायम
Jalgaon | जळगावात महायुती विरुद्ध महायुती? रेश्मा काळेंचा बंडखोर पवित्रा कायम
मुंबई ते दिल्ली प्रवासाआधीच विमानात बिघाड होताच... प्रवासाबाबत सुनेत्र
मुंबई ते दिल्ली प्रवासाआधीच विमानात बिघाड होताच... प्रवासाबाबत सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?
राज्य थरथरलं! अनेक वर्ष चालला काळा कारभार, अल्पवयीन मुलीवर दोघं...भाजप
राज्य थरथरलं! अनेक वर्ष चालला काळा कारभार, अल्पवयीन मुलीवर दोघं... भाजप नगरसेविकेच्या भावाचं हादरवणारं कांड
गोकुळ गीते यांचं बंड आता थंड होण्याची दाट शक्यता?
Gokul Gite Nashik | नाशिकच्या राजकारणात गेमचेंजर घडामोड; गोकुळ गीते यांचं बंड आता थंड होण्याची दाट शक्यता
पाणी सोडलं नाही म्हणून थेट वस्तीवर हल्ला! बुलढाण्यात तुफान राडा
Buldhana News | पाणी सोडलं नाही म्हणून थेट वस्तीवर हल्ला! बुलढाण्यात तुफान राडा, 15 जण जखमी
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं; सापळा रचला अन् धडक कारवाई
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं; सापळा रचला अन् धडक कारवाई, चक्क 6 लाख...
पंढरपुरात राजकीय भूकंप! तीर्थक्षेत्र आघाडीचे 9 नगरसेवक भाजपच्या तंबूत
Pandharpur | पंढरपुरात राजकीय भूकंप! तीर्थक्षेत्र आघाडीचे 9 नगरसेवक भाजपच्या तंबूत
अखंडित काँग्रेस उभी राहणार? शरद पवार यांना पुढाकार घेण्याचं राऊतांचं
अखंडित काँग्रेस उभी राहणार? शरद पवार यांना पुढाकार घेण्याचं राऊतांचं आवाहन; देशात मोठ्या उलथापालथी होणार?
पंडित नेहरुंचा कार्यकाळ बारा नाहीतर सोळा वर्षांचा... संजय राऊतांनी
पंडित नेहरुंचा कार्यकाळ 12 नाहीतर 16 वर्षांचा... संजय राऊतांनी मांडलं गणित, काय म्हणाले?