लॉजवर न्यायचा, अश्लील व्हिडीओ काढायचा, त्यानंतर 15 मुलींना… नराधमाविरोधात अख्खा गाव उलथला; गाव बंद करत संताप

कोल्हापूरच्या पुलाची शिरोली गावात राहणाऱ्या शाहिद सनदे या तरुणाने अनेक तरुणींना लॉजवर नेऊन नको ते कृत्य केले. त्यानंतर तरुणींसोबतचे अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड केले होते. हे व्हिडीओ पाठवून तो तरुणींना ब्लॅकमेल करत असल्याचे समोर आले.

लॉजवर न्यायचा, अश्लील व्हिडीओ काढायचा, त्यानंतर 15 मुलींना... नराधमाविरोधात अख्खा गाव उलथला; गाव बंद करत संताप
कोल्हापूर
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 28, 2026 | 2:07 PM

गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचार होत असल्याच्या घटना सतत कानावर येत आहेत. आता आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. कोल्हापूरात एक इसाम महिलांना लॉजवर घेऊन जायचा, त्यांचे अश्लीव व्हिडीओ रेकॉर्ड करायचा. या व्हिडीओंच्या आधारे त्याने 15 मुलींना धमकी दिली होती. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. आता या घटनेचा अख्ख्या गावाने निषेध केला आहे.

नेमकं काय घडलं?

कोल्हापूरच्या पुलाची शिरोली गावात राहणाऱ्या शाहिद सनदे या तरुणाने अनेक तरुणींना लॉजवर नेऊन नको ते कृत्य केले. त्यानंतर तरुणींसोबतचे अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड केले होते. हे व्हिडीओ पाठवून तो तरुणींना ब्लॅकमेल करत असल्याचे समोर आले. याप्रकरणी शाहीद सनदे आणि त्याचा मित्र शाहरुख देसाई याच्यावर हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शाहिद सनदे याला अटक केली असून त्याचा साथीदार शाहरुख देसाई याचा शोध सुरू आहे. तसेच दोघांनी 15 मुलींचे व्हिडीओ शूट केल्याची माहिती समोर आली होती.

गावच ठेवण्यात आले बंद

पुलाची शिरोली गावकऱ्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. आज गाव बंद ठेवून संबंधित तरुणाच्या कुटुंबावर कारवाई करण्याची मागणी केली. सकल हिंदू समाजाच्या वतीने शिरोली गावच्या प्रवेशद्वारापासून ग्रामपंचायतीपर्यंत मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र, कोणतीही परवानगी न घेतल्याने पोलिसांनी हा मोर्चा काढू दिला नाही. आज गावकऱ्यांनी दिवसभर गाव कडकडीत बंद ठेवले होते. शिरोली ग्रामपंचायत बाहेर सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी व महिला सदस्यांनी जोरदार निदर्शने करण्यात आली आरोपींना फाशीची शिक्षा करण्याची मागणी केली. पोलिसांनी या प्रकरणातील तपासाची माहिती गावकऱ्यांना दिल्यानंतर गावकऱ्यांनी देखील मोर्चा न काढता या घटनेचा निषेध केला. यावेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये काहीशी शाब्दिक बाचाबाची देखील झाली. गावामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच आंदोलकांना नोटीसी बजावली आहे.

भाजपचे आमदार अमल महाडिक यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन गावकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे एसआयटी स्थापन करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते देखील यावेळी आंदोलनामध्ये सहभागी झाले. गावकऱ्यांनी पोलीस आणि आमदार अमल महाडिक यांच्याकडे ग्रामपंचायतच्या मागणीचे निवेदन दिले.

Follow Us