Ganeshotsav | कोकणवासियांचे रेल्वेने गावी येण्याचे स्वप्न भंगले, कोकण रेल्वेबाबत अद्याप निर्णय नाही!

चाकरमान्यांना आर्थिक भुर्दंडासह प्रवासाचा मनस्ताप सहन करून गावी यावं लागत आहे. (Konkan Railway train Not running for Ganeshotsav)

Ganeshotsav | कोकणवासियांचे रेल्वेने गावी येण्याचे स्वप्न भंगले, कोकण रेल्वेबाबत अद्याप निर्णय नाही!
Follow us
| Updated on: Aug 14, 2020 | 12:11 AM

सिंधुदुर्ग : कोकण आणि गणेशोत्सवाचे वेगळेचं नाते आहे. दरवर्षी हजारो चाकरमानी गणपती उत्सवासाठी हमखास गावी येतात ते सुदधा त्यांच्या हक्काच्या कोकण रेल्वेने. यंदा मात्र कोकणवासियांचे कोकण रेल्वेने गावी येणं हे केवळ स्वप्नचं ठरले आहे. त्यामुळे चाकरमान्यांना आर्थिक भुर्दंडासह प्रवासाचा मनस्ताप सहन करून गावी यावं लागत आहे. (Konkan Railway train Not running for Ganeshotsav)

कोकणात रेल्वेने गावी येण्याचे स्वप्न कोकण रेल्वेच्या उभारणीमुळे सत्यात उतरले आहे . यंदा कोरोनाचे विघ्न दूर कर हे साकडे बाप्पाला घालण्यासाठी कोकणवासी गावी येण्यासाठी सज्ज झाला होता. लॉकडाऊन असले तरी नियम अटी पाळून जलद आणि स्वस्त प्रवासासाठी अनेक जण रेल्वेने गावी येण्याची स्वप्न पाहत होतो.

राज्य सरकारने 7 ऑगस्टला रेल्वे प्रशासनाला गणपती स्पेशल रेल्वे सोडण्याची विनंती केली होती. कोकण रेल्वेसह मध्य आणि पश्चिम रेल्वेने आराखडा बनवून रेल्वे बोर्डाकडे पाठवला होता. रेल्वे बोर्डाच्या होकारामुळे रेल्वेने 11 ऑगस्टपासून गणपती स्पेशल गाड्या सोडण्याची तयारी देखील केली. प्रवाशांची आरोग्य तपासणी, नोंदणी आणि शिस्तबद्ध प्रवास याची पूर्ण तयारी कोकण रेल्वेकडून जलदरित्या करण्यात आली. मात्र 10 ऑगस्टपर्यंत याबाबत कोणत्याही अंतिम सूचना महाराष्ट्र सरकारने न दिल्यामुळे गणपती स्पेशल गाड्या तूर्त यार्डातच आहेत, अशी प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी दिली आहे.

मर्यादित आणि संथगतीचा एसटी प्रवास, खासगी कार किंवा बस गाडीतून प्रवास याशिवाय कोणताच पर्याय कोकणवासियांसाठी नाही. लॉकडाऊनच्या काळात अनेकजण आर्थिक मंदीने त्रस्त आहेत. त्यात कोकणवासियांसमोर हा प्रवासाचा भरमसाठ खर्च कंबरडे मोडणारा ठरतो आहे, असे अनेक चाकरमान्यांचे मत आहे.

दरवर्षी चाकरमानी पूर्ण कुटुंबासह गणपतीला गावी यायचे. मात्र आता कुटुंबासह गावी यायचं झालं तर हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत. परप्रांतीय लोकांसाठी रेल्वे आणि एसटी गाड्या सोडणाऱ्या महाराष्ट्र शासनाने गणेशभक्त कोकणवासियांना मात्र वाऱ्यावर सोडल्याची भावना कोकणवासी व्यक्त करत आहेत. (Konkan Railway train Not running for Ganeshotsav)

संबंधित बातम्या : 

एसटी सेवा, सार्वजनिक बससेवा सुरु करा, वंचितचं राज्यभर ‘डफली बजाव’ आंदोलन

Ganeshotsav 2020 | कोकणात गणेशोत्सवादरम्यान 24 तास वीज पुरवठा : उर्जामंत्री

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.