Ganeshotsav 2020 | कोकणात गणेशोत्सवादरम्यान 24 तास वीज पुरवठा : उर्जामंत्री

गणेशोत्सवाच्या काळात कोकणात वीज कपात केली जाणार नाही, उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी याबाबतची माहिती (Konkan Ganeshotsav 24 hrs Electricity supply) दिली.

Ganeshotsav 2020 | कोकणात गणेशोत्सवादरम्यान 24 तास वीज पुरवठा : उर्जामंत्री

मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात कोकणात वीज कपात केली जाणार नाही. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गासह कोकणात 24 तास वीज पुरवठा करण्यात येणार आहे. नुकतंच उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी याबाबतचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. (Konkan Ganeshotsav 24 hrs Electricity supply)

आज महावितरणच्या फोर्ट जवळील कार्यालयात नितीन राऊत आणि खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत कोयना प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत बैठक पार पडली. तसेच कोकण विभागातील विजेच्या कामांसंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

कोकणात गणेशोत्सव मोठ्या स्वरुपात साजरा केला जातो. या कालावधीत रायगडप्रमाणे रत्नागिरी या ठिकाणी वीज कपात न करता 24 तास वीज पुरवठा करण्यात यावा, असे निर्देश त्यांनी दिले आहे.

तसेच रोहा येथे २२ केव्ही स्विचींग उपकेंद्र करण्यासंदर्भात 2 हजार 800 चौरस मीटरची जागा उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच श्रीवर्धन तालुक्यात अति उच्चदाब (ईएचव्ही) उपकेंद्र उभारल्यास दिघी बंदरासाठी ते फायदेशीर ठरू शकेल, असेही ते म्हणाले.

रोहा तालुक्यामध्ये आरएसजे पोल्सची आवश्यकता आहे. तळा तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहता सुरळीत वीज पुरवठ्यासाठी भौगोलिकदृष्ट्या मोठया शाखा कार्यालयाची विभागणी दोन शाखांमध्ये करण्यात यावी, असे नितीन राऊत यांनी सांगितले. (Konkan Ganeshotsav 24 hrs Electricity supply)

संबंधित बातम्या :

पुण्यातील गणेशोत्सवाची नियमावली ठरली, बाप्पाच्या मिरवणुकीसह ‘या’ गोष्टींना मनाई

Ganeshotsava | गणेशोत्सवात ढोल-ताशाचा गजरही बंद, पथकांची आर्थिक घडी विस्कटण्याची चिंता

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *