कुणालचा हट्ट आयफोन नव्हताच, आजोबांचा हादरवणारा खुलासा, खवड्या डोंगरावर पोहोचण्याचं धक्कादायक कारण समोर..
कुणाल चांदगुडे याने इतका धक्कादायक निर्णय नक्की काय घेतला असा प्रश्न सर्वांनाच पडत आहे. यावर आता कुणाल याच्या आजोबांनी मोठा खुलासा केला. कुणालने खवड्या डोंगरावर जाण्याचा निर्णय का घेतला हे त्याच्या आजोबांनीच सांगितले.

अभ्यासात हुशार, अत्यंत शांत आणि मित्रांमध्ये मिळून मिसळून राहणारा कुणाल चांदगुडे याने खवड्या डोंगराहून उडी मारली. त्याला वाचवण्यासाठी गेलेले त्याचे वडिलही डोंगराहून खाली पडले. हे पाहून क्षणाचाही विचार कुणाल याची आई संगीता यांनी केला नाही. संगीता यांनीही थेट उडी घेतली. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. ज्यानंतर एकच खळबळ उडाली. 19 वर्षीय कुणाल अभ्यात अत्यंत हुशार होता. 10 वीमध्ये त्याला 92 टक्के मार्क पडले होते. कुणाल असे काही करेल, याचा कोणी साधा विचारही केला नव्हता. सुरूवातीला सांगितले गेले की, कुणालला आयफोन हवा होता, त्यामुळे तो खवड्या डोंगरावर पोहोचला. त्यावरून त्याच्यात आणि त्याच्या वडिलांमध्ये वाद झाले. कुणाल याला वाचवण्याचा प्रयत्न तिथे उपस्थित प्रत्येक व्यक्तीने केला. मात्र, या प्रयत्नांना यश मिळाले नाही.
एका कुटुंबातील तीन सदस्य गेल्याने सर्वजण हळहळताना दिसले. सुरूवातीला कुणालने हा निर्णय घेण्याचे कारण आयफोन सांगितले गेले. पण सत्य ते नाहीच. कुणालने हा निर्णय नक्की का घेतला हे चक्क कुणालच्या आजोबांनी सांगितले. कुणालचा एक हट्ट होता, तो हट्ट पूर्ण करण्यासाठीच तो तिथे पोहोचला होता. पण तो हट्ट आणि जिद्द आयफोन नक्कीच नव्हता.
संगीता यांचे वडील आणि कुणाल चांदगुडे याचे आजोबा म्हणाले की, आयफोन हा त्याचा हट्ट नव्हता. आई वडिलांनी एकत्र यावे, हा त्याचा हट्ट होता. माझा पप्पा माझ्याकडेच यावा, ही त्याची भावना होती. म्हणून तो तिथे थांबला होता. फक्त गेल्या दोन ते तीन दिवसांपासून त्याचा बाप त्याच्या आत्याने त्यांच्यापासून दूर केला होता. बापाला कनेक्ट करण्यासाठी तो तिथे उभा राहिला होता, हा अत्यंत मोठा खुलासा संगीता चांदगुडे यांच्या वडिलांनी केला.
कुणालची आई संगीता या देखील अनेक व्हिडओमध्ये ननंदेबद्दल बोलताना दिसल्या. मात्र, कुणालच्या आत्याने tv9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, चार महिन्यांपासून तो आम्हाला बोलत होता. आम्हाला बोलत असल्याने त्या लोकांनी त्याला घरातून हाकलून दिले होते. तो त्याच्या गाडीमध्येच राहत आणि तिथेच झोपत. एक महिन्यांपूर्वी तो शेवटचा आम्हाला भेटला होता.