AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena News: ‘मुंबईहून सुरतकडे निघालेली पहिली गाडी माझी…’ गुवाहाटी रिटर्न नेत्याने A टू Z स्टोरी सांगितली!

"नितीन देशमुख हा माणूस राम नाम सत्य होण्यासारखा नाही. नितीन देशमुख पण ताकतवान आहे. साहेब एवढेच म्हणाले तू गुवाहाटीपर्यंत चल, मी तुला तेथून विमान देऊ शकतो. शिरसाट साहेबांच्या विधानात काय तथ्य नाही, असे म्हणत त्यांच्या विधानाला कैलास पाटील यांनीही फार महत्त्व देऊ नये, असा सल्लाही शहाजी बापू पाटील यांनी दिला आहे.

Shivsena News: 'मुंबईहून सुरतकडे निघालेली पहिली गाडी माझी...' गुवाहाटी रिटर्न नेत्याने A टू Z स्टोरी सांगितली!
Shivsena News
| Updated on: Nov 24, 2026 | 4:45 PM
Share

रवींद्र देसाई, प्रतिनिधी:  एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली, त्यावेळी सुरतहून परतणाऱ्या एका आमदाराचे राम नाम सत्य होणार होते, असा सर्वात मोठा खळबळजनक दावा शिवसेना नेते मंत्री संजय शिरसाट यांनी केला होता.  संजय शिरसाट यांच्या या विधानानंतर ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील तसेच नितीन देशमुख यांनी आम्हालाच संपवण्याचा कट होता, असा गंभीर आरोप केला. यावरुनच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते, गुवाहाटीच्या बंडात सर्वात गाजलेले काय झाडी, काय डोंगर फेम माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे.

काय म्हणाले शहाजी बापू पाटील?

“या बंडावेळी राम नाम सत्य सारखी कोणतीही परिस्थिती मला तिथे दिसून आली नाही. वेगवेगळ्या टप्यात वेगवेगळी लोक तिकडे गेले. मी पहिल्या टप्प्यात होतो. स्पष्ट सांगायचं म्हटलं तर मुंबई सोडून सुरतकडे निघालेली पहिली गाडी माझी होती. पाठीमाग येणाऱ्यांचं काय घडलं मला माहित नाही. राम नाम सत्य असं कोणतंही नव्हतं, मुळात तिकडे जाताना सगळ्यात निराश कोण होतं तर शिंदे साहेब होते. आमदाराच्या दबावापोटी हा निर्णय घ्यावा लागला अन्यथा आमदारांचा गट रागाच्या भरातच दुसऱ्या पक्षात गेला असता, ” असा गौप्यस्फोट शहाजी बापू पाटील यांनी सांगितला.

“प्रवासाला लागल्यानंतर आणि गावाकडे कळल्यानंतर माघारी फिरावे अशी अवस्था काही मित्रांची होती. ज्यांनी परत फिरण्याची इच्छा व्यक्त केली त्यांना शिंदे साहेबांनी तातडीने तू तुझ्या घराकडे जा असे म्हणत परवानगी दिली. उलट नितीन देशमुख यांना स्पेशल विमान करून नागपूरला पाठवले. त्यांनी त्यांच्या घरच्यांना फोन केला नितीन आनंदीत आहे व्यवस्थित आहे, मी त्याला पाठवून देतो असे सांगितले. शिंदे साहेबांचा आग्रह माझ्याकडे या असा कोणालाही नव्हता,” असंही शहाजी बापू पाटील यावेळी म्हणाले.

दरम्यान,  “नितीन देशमुख हा माणूस राम नाम सत्य होण्यासारखा नाही. नितीन देशमुख पण ताकतवान आहे. साहेब एवढेच म्हणाले तू गुवाहाटीपर्यंत चल, मी तुला तेथून विमान देऊ शकतो. शिरसाट साहेबांच्या विधानात काय तथ्य नाही, असे म्हणत त्यांच्या विधानाला कैलास पाटील यांनीही फार महत्त्व देऊ नये. एखाद्या शब्दावरून लांबवत बसणं हे राज्याच्या हिताचं नाही. ह्या दोघांच्या हिताचे नाही जनतेच्या हिताच नाही, मुळात दुष्काळावर दोघांनी बोलावे,” असा सल्लाही यावेळी शहाजी बापू पाटील यांनी दिला आहे.

Follow Us
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून शेखर निकम आक्रमक
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचं विधान...
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचा मोठा निर्णय, म्हणाले...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपद देण्याची तयारी
संदीप देशपांडेंच्या व्हिडिओवर सचिन अहिर आक्रमक; मांसाहार बंदीवरही...
संदीप देशपांडेंच्या व्हिडिओवर सचिन अहिर आक्रमक; मांसाहार बंदीवरही सरकारला घरचा आहेर!
देवराम लांडे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; राज ठाकरेंच्या उल्लेखाने..
देवराम लांडे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; राज ठाकरेंच्या उल्लेखाने मनसे आक्रमक
पंजाबच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! भाजप-अकाली दलाची युती, मुख्यमंत्रीपद
पंजाबच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! भाजप-अकाली दलाची युती, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?
रोहित पवार त्यांच्याच पक्षातच एकटे पडले; प्रताप सरनाईकांचा खोचक टोला
Pratap Sarnaik on Rohit Pawar : रोहित पवार त्यांच्याच पक्षातच एकटे पडले; प्रताप सरनाईकांचा खोचक टोला
ठाकरे गटाचे नेते शिंदेंच्या बैठकीत, उदय सामंतांच्या सूचक विधानाने...
ठाकरे गटाचे नेते शिंदेंच्या बैठकीत, उदय सामंतांच्या सूचक विधानाने चर्चांना उधाण!
आठवडाभरात कांद्याचे दर क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; लासलगावमध्ये...
Onion Price Crash : आठवडाभरात कांद्याचे दर क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; लासलगावमध्ये शेतकऱ्यांची चिंता वाढली
मुंबईत पुस्तकांचा महासोहळा! 650 स्टॉल्सवर लाखो पुस्तके...
मुंबईत पुस्तकांचा महासोहळा! 650 स्टॉल्सवर लाखो पुस्तके, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन