AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ola-Ather ला टक्कर देण्यासाठी भारतात लवकरच येणार अजून एक परदेशी इलेक्ट्रीक स्कूटर कंपनी, जाणून घ्या कधी होणार लॉन्च

भारतीय ग्राहक वर्ग ध्यानात घेऊन ही स्कूटर बनवण्यात आली आहे. फक्त एका खास वर्गापर्यंत ही स्कूटर मर्यादीत राहू नये यासाठी कंपनी फॅमिली यूज, दर दिवसाचं डेली रुटीनचं काम सोपं बनवणं त्या दृष्टीने वेगवेगळे ऑप्शन सादर करु शकते.

Ola-Ather ला टक्कर देण्यासाठी भारतात लवकरच येणार अजून एक परदेशी इलेक्ट्रीक स्कूटर कंपनी, जाणून घ्या कधी होणार लॉन्च
vinfast
| Updated on: Nov 24, 2026 | 4:41 PM
Share

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे बरेच लोक इलेक्ट्रिक स्कूटरचा पर्याय स्वीकारत आहेत. म्हणून मागच्या काही काळात भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी प्रचंड वाढली आहे. भारतातील वाढती मागणी लक्षात घेऊन अनेक परदेशी कंपन्या सुद्धा भारतीय बाजारपेठेत एन्ट्री करण्याच्या तयारीत आहेत. वियतनामची ऑटोमोबाइल कंपनी VinFast ने पुढच्यावर्षी 2027 च्या सुरुवातीला भारतात आपली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याची तयारी केली आहे. येणाऱ्या काळात दरवर्षी 10 लाख इलेक्ट्रिक टू-व्हीलर बनवण्याची क्षमता विकसित करण्याची VinFast ची प्लानिंग आहे. तामिळनाडू येथील आपल्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांट मध्ये पुढच्या प्रोडक्शन लाइनची तयारी सुरु आहे.

VinFast सुरुवातीलाच मोठी गुंतवणूक करणार नाही. VinFast आशिया CEO तपन घोष यांच्यानुसार, भारतीय बाजारपेठेत कसा प्रतिसाद मिळतोय ते पाहतील. त्यानंतर मागणीच्या हिशोबाने प्रोडक्शन क्षमता वाढवली जाईल. कोणते-कोणते मॉडल लॉन्च होणार? आणि किती यूनिट्स बनवणार ते कंपनीने सांगितलेलं नाही.

VinFast ची खासियत काय?

VinFast सुरुवातीला भारतात इलेक्ट्रिक स्कूटरचे दोन मॉडेल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. इंडिया 2W बिजनेस CEO अनुराग सक्सेना यांच्यानुसार, भारतीय ग्राहकांच्या गरजा ध्यानात घेऊन या स्कूटर्स बनवण्यात आल्या आहेत. याची साइज, स्पेस आणि फिचर्स वियतनाममध्ये विकल्या जाणाऱ्या मॉडल्स सारख्या नसतील. भारतीय ग्राहक वर्ग ध्यानात घेऊन ही स्कूटर बनवण्यात आली आहे. फक्त एका खास वर्गापर्यंत ही स्कूटर मर्यादीत राहू नये यासाठी कंपनी फॅमिली यूज, दर दिवसाचं डेली रुटीनचं काम सोपं बनवणं त्या दृष्टीने वेगवेगळे ऑप्शन सादर करु शकते.

कंपनीची प्लानिंग काय?

इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याआधी कंपनी आपलं डीलरशिप नेटवर्क भारतात मजबूत करण्याच्या प्लानिंगमध्ये आहे. VinFast ने आतापर्यंत 15 राज्यात 34 शहरात 50 पेक्षा जास्त डीलर्ससोबत पार्टनरशिप केली आहे. 100 शहरात 300 डीलर पर्यंत पोहोचण्याची कंपनीची प्लानिंग आहे. त्या शिवाय कंपनी बॅटरी स्वॅपिंग आणि चार्जिंगशी संबंधित सुविधेवरही काम करत आहे. चार्जिंगची समस्या आणि बॅटरी ओनरशिपची समस्या दूर करणं हा त्यामागे हेतू आहे.

Follow Us
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून शेखर निकम आक्रमक
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचं विधान...
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचा मोठा निर्णय, म्हणाले...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपद देण्याची तयारी
संदीप देशपांडेंच्या व्हिडिओवर सचिन अहिर आक्रमक; मांसाहार बंदीवरही...
संदीप देशपांडेंच्या व्हिडिओवर सचिन अहिर आक्रमक; मांसाहार बंदीवरही सरकारला घरचा आहेर!
देवराम लांडे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; राज ठाकरेंच्या उल्लेखाने..
देवराम लांडे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; राज ठाकरेंच्या उल्लेखाने मनसे आक्रमक
पंजाबच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! भाजप-अकाली दलाची युती, मुख्यमंत्रीपद
पंजाबच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! भाजप-अकाली दलाची युती, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?
रोहित पवार त्यांच्याच पक्षातच एकटे पडले; प्रताप सरनाईकांचा खोचक टोला
Pratap Sarnaik on Rohit Pawar : रोहित पवार त्यांच्याच पक्षातच एकटे पडले; प्रताप सरनाईकांचा खोचक टोला
ठाकरे गटाचे नेते शिंदेंच्या बैठकीत, उदय सामंतांच्या सूचक विधानाने...
ठाकरे गटाचे नेते शिंदेंच्या बैठकीत, उदय सामंतांच्या सूचक विधानाने चर्चांना उधाण!
आठवडाभरात कांद्याचे दर क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; लासलगावमध्ये...
Onion Price Crash : आठवडाभरात कांद्याचे दर क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; लासलगावमध्ये शेतकऱ्यांची चिंता वाढली
मुंबईत पुस्तकांचा महासोहळा! 650 स्टॉल्सवर लाखो पुस्तके...
मुंबईत पुस्तकांचा महासोहळा! 650 स्टॉल्सवर लाखो पुस्तके, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन