Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मोठी गुडन्यूज, योजनेला एक वर्ष पूर्ण, फडणवीसांकडून आता मोठी घोषणा

लडकी बहीण योजनेला एक वर्ष पूर्ण झालं आहे, गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू करण्यात आली होती, आता या योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मोठी गुडन्यूज, योजनेला एक वर्ष पूर्ण, फडणवीसांकडून आता मोठी घोषणा
लाडकी बहीण योजना
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 01, 2025 | 3:00 PM

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला आता एक वर्ष पूर्ण झालं आहे. विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी ही योजना सुरू करण्यात आली होती. ही योजना महिलावर्गामध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. ही योजना सुरू केल्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं होतं. महायुतीचा तब्बल 232 जागांवर विजय झाला, तर महाविकास आघाडीला मात्र अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावं लागलं. दरम्यान महायुतीच्या या यशामध्ये महिला मतदारांचा वाटा सर्वाधिक होता, असं देखील बोललं जातं. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी आम्ही लाडकी बहीण योजनेच्या सन्मान निधीमध्ये वाढ करून लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ अशी घोषणा देखील महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती, मात्र त्याबाबत अद्याप अजून कोणताही निर्णय झालेला नाही.

दरम्यान सध्या या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला सरकारकडून दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. सरकारची ही एक महत्त्वांकाक्षी योजना आहे. दरम्यान आता या योजनेला एक वर्ष पूर्ण झालं असून, या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे, ते अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड येथे बोलत होते.

विरोधकांकडून सातत्यानं लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा आरोप होत आहे, या आरोपाला उत्तर देताना आता देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, येत्या पाच डिसेंबरला आमच्या सरकारला एक वर्ष पूर्ण होईल, अनेक जण म्हणाले हे निवडूण आले की लाडकी बहीण योजना बंद होईल. मात्र सरकारला आता एक वर्ष पूर्ण होत आहे, तरी देखील ही योजना बंद झालेली नाही, ही योजना सुरूच राहणार आहे. आता आम्हाला लखपती दीदी करायची आहे, अशी घोषणा यावेळी फडणवीस यांनी केली आहे. दरम्यान यापूर्वी देखील एका सभेत बोलताना आम्हाला आणखी 50 लाख दीदींना लखपती करायचे आहे, असं ते म्हणाले होते.