AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचं सर्वात मोठं टेन्शन दूर, आदिती तटकरेंकडून योजनेबाबत नवी मोठी अपडेट

ज्या कुटुंबांंचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे, आता या योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली असून, मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचं सर्वात मोठं टेन्शन दूर, आदिती तटकरेंकडून योजनेबाबत नवी मोठी अपडेट
लाडकी बहीण योजना Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 27, 2025 | 4:55 PM
Share

ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा गरीब कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. ही एक राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी ही योजना सुरू करण्यात आली होती, या योजनेचा मोठा लाभ महायुतीला झाल्याचं पहायला मिळालं. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं.  दरम्यान जर राज्यात पुन्हा आमचं सरकार आलं तर आम्ही लाडकी बहीण योजनेच्या सन्मान निधीत वाढ करू असं अश्वासन देखील त्यावेळी महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आलं होतं, मात्र त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

दरम्यान आता या योजनेबाबत मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे या योजनेसाठी योजना सुरू करताना काही अटी घालण्यात आल्या होत्या, मात्र आता पात्र नसलेल्या महिला देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या योजनेसाठी सरकारकडून केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. दरम्यान मध्यंतरी माध्यमांमधून एक बातमी समोर आली होती. ती म्हणजे केवायसीच्या प्राथमिक छाननीमध्ये 51 लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत, अशी ही बातमी होती,  मात्र आदिती तटकरे यांनी या बातमीचं खंडण केलं आहे.

‘काही प्रसार माध्यमांवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत प्रसारित होत असलेली बातमी वस्तुस्थितीला धरून नाही. “प्राथमिक छाननीत 52 लाख लाभार्थी महिला अपात्र” अशा मथळ्याखाली आलेल्या या बातम्या निराधार आहेत,  या योजनेत पारदर्शकता येण्यासाठी व योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी राबवण्यात येणारी e-Kyc प्रक्रिया अजूनही सुरू आहे, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.  आदिती तटकरे यांच्या या खुलाशानंतर  आता या योजनेसाठी 52 लाख लाभार्थी महिला अपात्र ठरल्या नसल्याचं समोर आलं आहे, यामुळे लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...