Malshej Ghat | माळशेज घाटात निसर्गाचं रौद्र रुप, तिथे जाण्याआधी एकदा हा VIDEO बघा

Malshej Ghat | पावसाळ्यात पिकनिक प्रेमींमध्ये काही खास स्पॉट फेमस आहेत. माळशेज घाट त्यापैकीच एक. कल्याण-अहमदनगर मार्गावरुन प्रवास करताना माळशेज घाट लागतो.

Malshej Ghat | माळशेज घाटात निसर्गाचं रौद्र रुप, तिथे जाण्याआधी एकदा हा VIDEO बघा
Malshej Ghat
Image Credit source: twitter
| Updated on: Jul 21, 2023 | 10:55 AM

मुंबई : पावसाळा सुरु झाला की, सर्वसामान्यांना वेध लागतात ते पावसाळी पिकनिकचे. जुलै महिन्यापासून निर्सगप्रेमी पर्यटकांची पावल आपसूकच घाट, डोंगर माथ्याच्या दिशेने वळू लागतात. पावसाळ्यात निर्सगाच सौंदर्य अधिक खुलून येतं. चहूबाजूला, अगदी नजर जाईल तिथपर्यंत हिरवाईने निसर्ग बहरलेला असतो. अशावेळी तरुणाईची पावलं डोंगररांगा, धबधब्यांकडे नाही वळली, तरच नवल. मुंबईकर-पुणेकर पावसाळ्यात कर्जत, खोपोलीला मोठ्या संख्येने येतात.

वीकेंएण्डला इथे पर्यटकांनची तुडूंब गर्दी असते. पावसाळ्यात कर्जत-खोपोलीच्या डोंगर रागांमध्ये अनेक धबधबे प्रवाहित होतात. पाऊस, गारवा, हिरवाई आणि पांढर शुभ्र धबधब्याच फेसाळ पाणी मन मोहरुन टाकतं.

मुंबईकरांची विशेष पसंती

पावसाळ्यात पिकनिक प्रेमींमध्ये काही खास स्पॉट फेमस आहेत. माळशेज घाट त्यापैकीच एक. कल्याण-अहमदनगर मार्गावरुन प्रवास करताना माळशेज घाट लागतो. दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतून इथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात. संपूर्ण माळशेज घाटात पावासळ्यात अनेक धबधबे प्रवाहित होता. त्याशिवाय घाटात दाट धुकं असतं. त्यामुळे पर्यटकांची माळशेज घाटाला विशेष पसंती आहे.

धोका काय?

मुंबई, कल्याण, डोंबिवलीहून येणारे पर्यटक घाटात गाडी थांबवून धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेतात. माळशेज घाटाच सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करत असलं, तरी इथे दरडी कोसळण्याचा मोठा धोका आहे. यापूर्वी इथे दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अलीकडे प्रशासनाने काही निर्बंध घातले आहेत.


व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

माळशेज घाटातला असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. माळशेज घाटात दरड कोसळल्याचा हा व्हिडिओ आहे. यावेळी माळशेज घाटाच रौद्ररुप पाहायला मिळालं. हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. पर्यटकांना रोखण्यासाठी पोलिसांची तैनाती करण्यात आली होती.

त्यामुळे पावसाळी पिकनिकसाठी माळशेज घाटात जाणाऱ्या पर्यटकांनी काळजी घेण्याची गरज आहे. माळशेज घाट निर्सग संपन्न आहे. पण पावसाळ्यात तिथे धोकेही कमी नाहीत.