AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुस्लिम लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी लवकरच कायदा? बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ, म्हणाले मी ऑफिशियली सांगतोय की…

Muslim Population Law: देशात मुस्लिम जास्त मुलं पैदा करतायेत आणि हिंदूच्या टॅक्समधून त्यांना रेशनची सुविधा मिळत आहेत. मुसलमानांची लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी लवकरच कायदा आणणार हे मी ऑफिशियली सांगत आहे.

मुस्लिम लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी लवकरच कायदा? बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ, म्हणाले मी ऑफिशियली सांगतोय की...
प्रवीण तोगडिया, व्हीएचपीImage Credit source: एजन्सी
| Updated on: Apr 11, 2026 | 8:46 AM
Share

Dr. Pravin Togadia Statements: मुस्लिमांची लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी देशात लवकरच कायदा आणणार असल्याचे वक्तव्य विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडियांनी केले. त्यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा वाट पेटण्याची शक्यता आहे. आपण हे काही हवेत बोलत नसल्याचे संकेत देत त्यांनी मी हे ऑफिशियली सांगत असल्याचा दावा तोगडिया यांनी केला. त्यांनी भोंदूबाबा खरातच्या मुद्दावरही मोठे भाष्य केले. तोगडिया गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यातील विविध शहरांचे दौरे करत आहेत. लातूर येथील दौऱ्या दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केले.

हनुमान चालीसा केंद्र

आता देशातील प्रत्येक गावात हनुमान चालीसा केंद्र स्थापित करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. प्रवीण तोगडिया यांनी दिली. या माध्यमातून गरीब लोकांना मदत करण्यात येणार आहे. प्रत्येक हिंदू त्यासाठी एक मुठ्ठ धान्य घेऊन येईल. शनिवारी या केंद्राच्या माध्यमातून हिंदू जनजागरण आणि एकजुटतेवर भर देणार असल्याचे तोगडिया म्हणाले. तर हिंदू हेल्पलाईनच्या माध्यमातून हिंदूंचे संरक्षण करण्यात येणार आहे. याठिकाणी रक्तदाब, शुगर आणि इतर आवश्यक आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. याठिकाणी रोजगाराची माहिती सुद्धा देण्यात येणार आहे. तर हिंदूंनी हिंदूच्याच दुकानातून खरेदी करावी यासाठी व्हीएचपी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.

खरातप्रकरणात तोगडियांचे मत काय?

भोंदू अशोक खरातप्रकरणी तोगडिया यांनी थेट वक्तव्य करणे टाळले. हिंदू हा चतुर आहे. त्याला भोंदू आणि खऱ्या साधुची माहिती आहे. हिंदू बुद्धिमान असल्याने खरा कोण आणि खोटा कोण याची ओळख तो पटवेल असे उत्तर त्यांनी दिले. यापूर्वी सुद्धा हिंदूंनी अशा फसव्या लोकांना ओळखले होते असे तोगडिया यांनी सांगितले.

मुस्लिम लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा

भारतात मुसलमान हे जास्त मुलं पैदा करत आहेत. हिंदूंच्या टॅक्सवर त्यांना राशन मिळत आहे. आम्ही कायदा करून मुस्लिम लोकसंख्या नियंत्रणात आणू. ज्याप्रकारे प्रवीण तोगडिया यांनी डंके की चोटपर राम मंदिर करून दाखवलं. तसेच मुस्लिम लोकसंख्या नियंत्रण कायदाही अस्तित्वात येईल. लवकरच असा कायदा होईल. एकदम पक्के आहे. ऑफिशियली सांगत आहे की मुसलमानांची वाढती लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी कायदा आणणार आहे. देशात नागरिकांना कायदा करण्याचा अधिकार आहे. माझे भाऊच सत्तेत आहेत. मी लोकांमधून आवाज उठवेल. ते संसदेत आवाज उठवतील, असे प्रवीण तोगडिया म्हणाले.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक