आता या समाजाला SC मधून आरक्षण द्या, लक्ष्मण हाकेंच्या नव्या मागणीने राज्यात वातावरण तापलं

मोठी बातमी समोर येत आहे, आता लक्ष्मण हाके यांनी आरक्षणासंदर्भात नवी मागणी केली आहे, त्यामुळे राज्यात चांगलंच वातावरण तापलं आहे.

आता या समाजाला SC मधून आरक्षण द्या, लक्ष्मण हाकेंच्या नव्या मागणीने राज्यात वातावरण तापलं
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 21, 2025 | 8:21 PM

राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे, राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हैदराबाद गॅझेट लागू केलं आहे, मात्र या गॅझेटला ओबीसी समाजाकडून विरोध होत आहे. हैदराबाद गॅझेटनंतर राज्यात ओबीस विरूद्ध मराठा समाज असं चित्र पहायला मिळत आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण नको अशी भूमिका ओबीसी समाजाची आहे. तर दुसरीकडे हैदराबाद गॅझेटच्या आधारे आमचा समावेश हा एसटी प्रवर्गात करावा अशी मागणी बंजारा समाजानं केली आहे.

एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी बाजारा समाजानं आंदोलन सुरू केले आहे, तर बंजारा समाजाच्या या मागणीला आदिवासी समाजाकडून विरोध होत आहे. आदिवासी आणि बंजारा समाज आमने-सामने आले आहेत. तर दुसरीकडे जालन्यात धनगर समाजाचं देखील आंदोलन सुरू झालं आहे. धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश करावा अशी मागणी आहे.

हे सर्व वाद सुरू असतानाच आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या नव्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे, नाभिक, धोबी समाजाला एससीमधून आरक्षण द्या, अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली आहे. बलुत्या-आलुत्यामधील आमचा नाभिक समाज असेल, धोबी समाज असेल, बलुत्या -आलुत्या वाल्यांना एससी आरक्षण मिळावं. कारण देशातील अनेक राज्यांमध्ये ते एससीमध्ये येतात. आणि जर या सर्व गोष्टी कोणी एससी, एसटीमध्ये देणार असतील तर आम्हाला आनंद आहे, असं हाके यांनी म्हटलं आहे.

दरम्यान हाके यांच्या या मागणीनंतर संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत.  लक्ष्मण हाके यांनी एससी आरक्षणाकडे वाकड्या नजरेनं पाहू नये, वाकड्या नजरेनं पाहिलं तर डोळे काढून हातात देऊ असा इशारा पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी दिला आहे, तर आमच्या एससी समाजाला खवळू नका, नाहीतर पुन्हा भीमा कोरेगावचा इतिहास घडेल असा इशारा सचिन खरात यांनी दिला आहे. लक्ष्मण हाके यांच्या या मागणीनंतर आता हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.