AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! एक मोठी चूक झालीच, 6 बडंखोर खासदार होणार अपात्र? ठाकरेंनी फिरवला गेम, आता थेट…

शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी नुकताच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला असून, शिवसेना ठाकरे गटाने आज लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली आहे.

मोठी बातमी! एक मोठी चूक झालीच, 6 बडंखोर खासदार होणार अपात्र? ठाकरेंनी फिरवला गेम, आता थेट...
uddhav thackerayImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 24, 2026 | 6:42 PM
Share

शिवसेना ठाकरे गटात काही दिवसांपूर्वीच मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं, शिवसेना ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. जेव्हा एखाद्या पक्षातून दोन तृतियांश खासदार एकाचवेळी बाहेर पडतात, तेव्हा अशा खासदारांचा दुसऱ्या पक्षातील प्रवेश ग्राह्य धरला जातो, त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होत नाही,  तसेच त्यांना लोकसभा अध्यक्षांकडून स्वतंत्र गटाची देखील मान्यता मिळते. शिवसेना ठाकरे गटातून दोन तृतियांश खासदार एकाचवेळी बाहेर पडले, तसेच आम्ही सर्व संविधानातील तरतुदीचे पालन करून आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच हा पक्षप्रवेश घडवून आणला आहे, ऑपरेशन टायगर सक्सेसफूल झालं आहे, असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता.

मात्र आता शिवसेना ठाकरे गटाचे मुख्य प्रतोद अनिल देसाई यांनी केलेल्या दाव्यामुळे प्रकरणात मोठं ट्विस्ट आलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज लोकसभेचे शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते अरविंद सावंत आणि प्रतोत अनिल देसाई यांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. यावेळी त्यांनी लोकसभा अध्यक्षांसोबत जवळपास 35 मिनिटं चर्चा केली. या चर्चेनंतर अनिल देसाई यांच्याकडून मोठा दावा करण्यात आला आहे.

नेमकं काय म्हणाले अनिल देसाई? 

शिवसेना ठाकरे गट हा मुळ पक्ष आहे. दोन तृतियांश जरी त्यांचा आकडा असला त्यावरून जरी त्यांनी वेगळ्या गटाचा दावा केला असला तरी संविधानातील शेड्यूल 10 मध्ये जे प्रोव्हिजन आहे, त्यामध्ये जी मुळ ओरिजनल पार्टी आहे, ती जर एखाद्या पक्षात विलीन होत असेल तर त्या विलिनीकरणाला एकूण खासदारांपैकी दोन तृतियांश खासदारांचा पाठिंबा असला पाहिजे. मात्र इथे मुळ पक्ष म्हणजे शिवसेना ठाकरे गट हा कोणत्याही पक्षात विलीन झाला नाही, आमचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यामुळे अशा पद्धतीने या खासदारांना पक्षातून बाहेर पडता येत नाही. या खासदारांनी संविधानातील तरतुंदीचं उल्लंघन केलं आहे, त्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी आता न्यायिक भूमिका घ्यावी अशी विनंती त्यांना यावेळी आम्ही केल्याची माहिती देसाई दिली आहे.

दरम्यान लोकसभा अध्यक्षांनी देखील  संविधानातील शेड्यूल 10 मध्ये जी प्रोव्हिजन आहे, तिची नोंद घेतली आहे, असा दावा देखील देसाई यांनी केला आहे. जे बंडखोर खासदार आहेत, त्यांनी  शिवसेना ठाकरे गटाचं जे अधिकृत चिन्ह आहे, जे निवडणूक आयोगाने दिलं आहे, मशाल या चिन्हावर ते निवडणून आले होते, आणि ते निवडून आल्यानंतर एक प्रक्रिया असते, ज्याची लोकसभेच्या सभागृहात नोंद होते. तेव्हा ती पार्लमेंटरी पार्टी म्हणून ओळखली जाते. तिच्या नोंदीमध्ये हे सर्व सभासद आहेत. त्यामुळे यांना घटनेचे संविधानाचे सर्व नियम लागू आहेत, हे सर्व शिवसेना ठाकरे पक्षाचे सदस्य आहेत, आणि आमची पार्टी कोणत्याही पक्षात विलिन झालेली नाही, त्यामुळे हा नियम त्यांना लागू होत नाही, असा दावाही यावेळी देसाई यांनी केला आहे, त्यामुळे आता लोकसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?