पार्थ पवार यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांची नाराजी का? थेट दोन निर्णयात..
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वाद चव्हाट्यावर आला. पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी थेट अमित शाह यांची भेट घेतली. याचे फोटोही पुढे आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांनी आता थेट आपली नाराजी जाहीर केली. त्यांच्या निशाण्यावर पार्थ पवार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी थेट अमित शाह यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. या भेटीचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाली. ज्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांची मनातील खदखद पुढे आली. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सूत्रे आपल्या हातात घेतली. मात्र, नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पक्षाचे नेते पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीवर आणि एकतर्फी निर्णयांवर पक्षातील नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मुंबई अध्यक्षपदी आमदार झिशान सिद्दीकी यांची तर राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी उमेश पाटील यांची निवड करताना विश्वासात घेतले नसल्याचे वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. कोणालाही विश्वासात न घेता ही नावे जाही केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
पार्थ पवार एकतर्फीच निर्णय घेत असल्याने पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. हेच नाही तर यापूर्वीही पक्षातील युवक अध्यक्ष आणि युवती अध्यक्षांच्या निवडीवेळीही निर्णय होणे अपेक्षित होते, पण पार्थ पवार यांनी तसे केले नाही. पार्थ पवार यांच्याकडून विश्वासात न घेता निर्णय घेतले जात असल्याचे म्हणत पार्थ पवार यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली. मात्र, या बैठकीत पक्षाच्या अध्यक्षा आणि पार्थ पवार दोघेही उपस्थित नव्हते.
या बैठकीत नेते आपल्या बैठकीत ठाम होते. संघटनात्मक निर्णय घेताना अनुभवी नेत्यांशी चर्चा करून किंवा नेत्यांसोबत समन्वय साधूनच होतील, असे आश्वासन पार्थ पवार आणि जया पवार यांच्याकडून देण्यात आल्याचे सांगितले जाते. या बैठकीत दोन प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. सर्वात महत्वाचे म्हणजे राज्य सरकारमधील महत्वाचे अर्थखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे लवकरात लवकर घ्यावे.
हेच नाही तर दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्रीकरण नको, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अमित साह यांच्याकडे मांडली. अजित पवार यांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अर्थखाते आपल्याकडे ठेवले. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा कारभार आपल्याकडे घेऊन काही महिने झाली आहेत. मात्र, अर्थखाते अजूनही फडणवीस यांच्याकडेच आहे. याकरिता आता राष्ट्रवादीचे नेते आग्रही होताना दिसत आहेत.