AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मातोश्रीबद्दल…, उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराचं खरमरीत पत्र, ठाण्यात वातावरण तापणार?

आता पत्रावरून ठाण्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे, आरोप -प्रत्यारोपाचं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळू शकतं.

मातोश्रीबद्दल..., उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराचं खरमरीत पत्र, ठाण्यात वातावरण तापणार?
| Updated on: Jul 31, 2025 | 10:14 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, ठाण्याचे माजी खासदार आणि ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी ठाण्याचे आताचे खासदार नरेश म्हस्के यांना खरमरीत पत्र लिहिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राजन विचारे आणि नरेश म्हस्के यांच्यामध्ये शाब्दिक चकमक सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. विचारे यांनी म्हस्के यांना टीका करताना बच्चा म्हटलं होतं, तर त्यावर म्हस्के यांनी प्रत्युत्तर देताना विचारे यांना आजोबा म्हटलं होतं.

तसेच विचारे यांच्या ऑपरेशन सिंदूर बद्दलच्या विधानावरून शिंदे गटाने ठाण्यात बॅनर लावले होते, ते बॅनर काढण्यावरून काल रात्री ठाकरे आणि शिंदेंच्या युवासेनेत बाचाबाची झाली होती. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांना एक पत्र लिहिलं आहे, या पत्रात विचारे यांनी मस्केंचा एकेरी उल्लेख केला आहे.

पत्रात नेमकं काय म्हटलं? 

काही वर्ष आधी स्वतः काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होता, मी तुम्हाला थांबवले, असं या पत्रात राजन विचारे यांनी नरेश मस्के यांना उद्देशून लिहिलं आहे.  तसेच पत्रात म्हस्के यांचा वाचाळवीर, उंदीर, टेंडर सेटर असा उल्लेख करण्यात आला आहे. ‘मातोश्री , उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्षाबद्दल बोलताना जरा जपून , सुसंकृत राजकारण करा , मला तुमचे पुस्तक उघडायला लाऊ नका नाहीतर भारी पडेल’ असा इशाराही या पत्रातून राजन विचारे यांनी म्हस्के यांना दिला आहे.

ठाण्यातील वातावरण तापणार? 

राजन विचारे यांनी हे पत्र आपल्या ट्विटर अकाऊंटवर देखील पोस्ट केलं आहे. “त्यांच्या वाचाळ टीकेवर राष्ट्रभक्ताचे हे प्रत्युत्तर” असं कॅप्शन या पत्राला विचारे यांनी दिलं आहे. दरम्यान आता विचारे यांच्या पत्राला मस्के काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या पत्रामुळे पुन्हा एकदा ठाण्याचं राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Follow Us
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?