Nagpur, Chandrapur, Amravati, Akola Election Results 2026 LIVE: विदर्भात कोणाची सत्ता येणार, मुख्यमंत्र्यांच्या नागपूरचा गड कोण राखणार?
Nagpur, Chandrapur, Amravati, Akola Election Results 2026 LIVE Counting in Marathi: महाराष्ट्रात 29 महापालिकांसाठी आज मतदान गुरावारी पार पडलं आहे. तर आज निकाल जाहिर होणार आहे. अशात विदर्भाच्या पट्ट्यात कोणाता पक्ष मोठा ठरणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर नागपूर, चंद्रपूर, अमरावती, अकोला या शहरातील निकाल काय लागतो हे या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या...
LIVE NEWS & UPDATES
-
Mumbai Municipal Election Results 2026 : नागपूर महानगर पालिकेच्या कंट्रोल रुम मधून संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर ठेवलं जातं आहे लक्ष
नागपूर महानगर पालिकेच्या कंट्रोल रुम मधून संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर लक्ष ठेवलं जातं आहे. महापालिका कर्मचारी आणि पोलीस विभागम लक्ष ठेवत आहे. नागपुरात 261 ठिकाणचे आतील आणि बाहेरील सीसीटीव्हीचे एक्सेस कंट्रोल रूममध्ये देण्यात आले आहेत. पोलीस आणि महापालिका कर्मचारी लक्ष ठेवत आहेत. 10 ही झोन मधील कुठल्या संवेदनशील मतदान केंद्रात काय सुरू याची माहिती देत आहे. कुठेही काही गोंधळ झाल्यास किंवा अनुचित प्रकार घडल्यास याची माहिती मिळावी यासाठी ठेवलं जातं आहे…
-
Mumbai Municipal Election Results 2026 : नागपूर, चंद्रपूर, अमरावती, अकोला मध्ये कोणाचा पक्ष ठरणार मोठा?
शुक्रवारी म्हणजे 16 जानेवारी 2025 रोजी अनेक उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर काही तासांत चित्र स्पष्ट होईल आणि नागपूर, चंद्रपूर, अमरावती, अकोला मध्ये कोणाचा पक्ष ठरणार मोठा? हे कळेल. अशात सर्वांचं लक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या नागपूरकडे लागलं आहे.
-
महाराष्ट्रात 29 महापालिकांसाठी बुधवारी मतदान पार पडलं आहे. या 29 महापालिकांमध्ये 15 हजार 931 उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. मुंबईसह 29 महानगरपालिकांमध्ये एकूण 2 हजार 869 जागा आहेत. तर एकूण 3 कोटी 48 हजार मतदार आहेत. अशात पुढच्या पाच वर्षांसाठी कोणता उमेदवार किती मतांनी विजयी होईल आज समोर येईल. विदर्भात कोणता पक्ष मोठा ठरेल हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात गेल्या तीन टर्म पासून भाजपचं वर्चस्व आहे. त्यामुळे आता कोणाची सत्ता येणार लवकरच कळेल. तर चंद्रपूर महापालिकेत एकूण 17 प्रभाग आहे. या प्रभागांमधून एकूण 66 उमेदवार निवडून द्यायचे आहेत. त्यामुळे येथे देखील कोणता पक्ष मोठा ठरतो पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अकोल्यातील आकडे देखील महत्त्वाचे ठरणार आहेत. अकोला महापालिका ही बहुचर्चित महापालिका आहे. या महापालिकेतील सत्तेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असते. अकोला महापालिकेत एकूण 20 प्रभागातून 80 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. तर कोणत्या पक्षाचे किती उमेदवार बाजी मारून आपला गड राखतील हे या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या…
Published On - Jan 16,2026 6:07 AM

