
महाराष्ट्रात 29 महापालिकांसाठी बुधवारी मतदान पार पडलं आहे. या 29 महापालिकांमध्ये 15 हजार 931 उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. मुंबईसह 29 महानगरपालिकांमध्ये एकूण 2 हजार 869 जागा आहेत. तर एकूण 3 कोटी 48 हजार मतदार आहेत. अशात पुढच्या पाच वर्षांसाठी कोणता उमेदवार किती मतांनी विजयी होईल आज समोर येईल. विदर्भात कोणता पक्ष मोठा ठरेल हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात गेल्या तीन टर्म पासून भाजपचं वर्चस्व आहे. त्यामुळे आता कोणाची सत्ता येणार लवकरच कळेल. नागपुरात भाजपने अर्धशकत गाठलं आहे.. तर अनेक ठिकाणी भाजप पक्ष आघाडीवर आहे. त्यामुळे येथे देखील कोणता पक्ष मोठा ठरतो पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अकोल्यातील आकडे देखील महत्त्वाचे ठरणार आहेत. अकोला महापालिका ही बहुचर्चित महापालिका आहे. या महापालिकेतील सत्तेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असते. अकोला महापालिकेत एकूण 20 प्रभागातून 80 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. तर कोणत्या पक्षाचे किती उमेदवार बाजी मारून आपला गड राखतील हे या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या…
अमरावतीत आमदार रवी राणा यांच्या निवासस्थानासमोर मोठा जल्लोष सुरू झाला आहे. रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांकडूनही जल्लोष केला जातोय. रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेला आतापर्यंत 12 जागा तर भाजपाला आतापर्यंत 25 जागा मिळाल्या आहेत.
अमरावती : मेगा प्लॅनिंग करूनही अमरावती महानगरपालिकेमध्ये भाजपला पाहिजे तेवढे यश मिळाली नाही. भाजप 25 जागांवरच थांबण्याची शक्यता आहे. मागच्या निवडणुकीमध्ये भाजपाला एक हाती सत्ता मिळत 45 उमेदवार निवडून आणले होते.
अमरावती : अमरावती महानगरपालिकेमध्ये आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. जवळपास दहा जागांवर आमदार रवी रानांचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी आमदार रवी रानांचा स्वाभिमान पक्ष किंगमेकर ठरणार आहे.
चंद्रपुरात भाजपशी युती असलेल्या शिवसेना शिंदे गटाने आतापर्यंत एकच जागा जिंकली आहे. एकूण 66 जागा असलेल्या चंद्रपूर मनपामध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटादरम्यान युती झाली होती. यात शिंदे गटाला आठ जागा सोडण्यात आल्या होत्या. शिंदे गटाला सोडण्यात आलेल्या काही जागांवर मात्र भाजपनेच आपले उमेदवार उतरवले होते. यातील केवळ डिलन शैलेश केळझरकर यांना प्रभाग 2 -ब या जागेवरून विजय प्राप्त करता आला आहे.
काँग्रेसचे वर्तमान शहराध्यक्ष संतोष लहामगे आणि माजी शहराध्यक्ष रामू तिवारी या दोघांचा धक्कादायक पराभव… खासदार प्रतिभा धानोरकर यांना मोठा धक्का… भाजप उमेदवार प्रज्वलंत कडू यांनी रामू तिवारी यांचा केला पराभव तर काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार नंदू नागरकर यांनी संतोष लहामगे यांचा केला पराभव… या प्रभागात काँग्रेस 2 भाजप 1 आणि अपक्ष एका ठिकाणी विजयी…
रॉबिन यांच्या विरोधात भाजप बंडखोर अजय सरकार यांचा पराभव झालाय. या जागेसाठी आ. मुनगंटीवार विरुद्ध आ. जोरगेवार गटात मोठा संघर्ष झाला होता. अजय सरकार यांच्या विरोधात 23 हुन अधिक गुन्हे असल्याने जोरगेवार गटाने त्यांचे तिकीट कापले होते. यात आ. जोरगेवार गटाने बाजी मारली आहे. स्वतः पालकमंत्री डॉ. उईके, आ. बंटी भांगडीया, आ. जोरगेवार ठाण यांनी जागा प्रतिष्ठेची केली होती.
ऐतिहासिक विजयाबद्दल माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी सर्व विजयी उमेदवारांचे औक्षण करून मनःपूर्वक अभिनंदन केले.
नागपूरमध्ये भाजप आघाडीवर आहे. तर प्रभाग 3 मध्ये एम आय एमचे तीन उमेदवार आघाडीवर आहेत. तर प्रभाग सहामध्ये मुस्लिम लीगचे चारही उमेदवार आघाडीवर आहेत. प्रभाग 10 मधून काँग्रेसचे अरुण डवरे तिसऱ्या फेरीत 1448 मतांनी पुढे आहेत.
चंद्रपूरच्या प्रभाग 3 मध्ये काँग्रेसचे 3 तर भाजपचा फक्त 1 उमेदवार विजयी झाला आहे.
भाजप, ठाकरेंची शिवसेना प्रतिनिधी आणि पोलिसांची बाचाबाची झाल्याची माहिती समोर येत आहे. आमरावतीमध्ये भाजप 18 जागांवर आघाडीवर आहेत. तर राष्ट्रवादी 5 आणि काँग्रेसचे 4 उमेदवार आघाडीवर आहेत. शिवसेनेचे 2 उमेदवार आघाडीवर आहेत. ठाकरे गटाचे एक उमेदवार आघाडीवर असून मनसेने अद्याप खातं देखील खोललेलं नाही.
विदर्भात मुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीसांना 2 मोठे धक्के बसले आहेत. फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती पराभूत झाले आहेत. तर तुषार भारतीय यांना देखील पराभव स्वीकारावा लागला आहे…
नागपूरमध्ये भाजप पक्षाने गड राखला आहे.. 151 मधील 94 जागी भाजप आघाडीवर आहे. भाजप पाठोपाठ काँग्रेसचे 31 उमेदवार आघाडीवर आहेत. शिवसेनेचे 2 उमेदवार आघाडीवर आहेत. तर राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे 1 उमेदवार आघाडीवर आहेत. मनसेनेतर खातं देखील उघडलेलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती पराभूत झाले आहेत.
चंद्रपूर याठिकाणी भाजपचे 3 उमेदवार विजयी झाले आहे. याठिकाणी भाजपचे 8 आघाडीवर आहेत. काँग्रेसचे 9 उमेदवर आघाडीवर आहेत. ठाकरे आणि इतर पक्षाचे 4 उमेदवर आघाडीवर आहेत. शिवसेनेचे 2 उमेदवर आघाडीवर आहेत. राष्ट्रवादीचे १ उमेदवर आघाडीवर आहेत.
अमरावती महानगरपालिका प्रभाग क्रमांक 19 साईनगर मध्ये भाजपचे तुषार भारतीय पिछाडीवर आहेत. तर युवा स्वाभिमांनचे सचिन भेंडे जवळपास 550 मतांनी आघाडीवर आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या नागपुरात भाजप यशाच्या दिशेने वाटचाल करत आहे. नागपूरमध्ये भाजप अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे… भाजपचे 74 उमेदवार आघाडीवर आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती आघाडीवर आहेत… अमरावती येथे भाजप 9 जागांवर आघाडीवर आहेत. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे 6 उमेदवार आघाडीवर आहेत. शिवसेनेचे 2 उमेदवार आघाडीवर आहेत. ठाकरे गटाचे एक उमेदवार आघाडीवर असून मनसेने अद्याप खातं देखील खोललेलं नाही.
अकोल्यामध्ये भाजपचे 34 उमेदवार आघाडीवर आहेत. त्यानंतर काँग्रेस आणि इतर पक्षाचे 15 उमेदवार आघाडीवर आहेत. तर शिवसेनेचे 4 उमेदवार आघाडीवर आहेत. ठाकरे गटाचे 4 उमेदवार आघाडीवर असून मनसे अद्याप अकोल्यात खातं देखील उघडू शकलेलं नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या नागपुरात भाजप यशाच्या दिशेने वाटचाल करत आहे. नागपूरमध्ये भाजप अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे… भाजपचे 49 उमेदवार आघाडीवर आहेत. तर शिवसेने, मनसे आणि ठाकरे गटाने अद्याप स्वतःचं खातं देखील खोललेलं नाही. तर काँग्रेसचे सहा उमेदवार आघाडीवर आहेत.
नागपुरात भाजपचे 35 उमेदवार आघाडीवर आहेत… अकोल्यात भाजपचे 20 उमेदवार आघाडीवर आहेत… चंद्रपूर याठिकाणी भाजपचे 4 उमेदवार आघाडीवर आहेत… तर अमरावतीमध्ये भाजपचे 8 उमेदवार आघाडीवर आहेत.
अकोल्यात भाजपचे 10 उमेदवार आघाडीवर आहेत… तर राष्ट्रवादीचे 3 उमेदवार आघाडीवर आहेत… तर अकोल्यात ठाकरे गटाने खातं खोललं आहे… ठाकरे गटाचे 1 उमेदवार आघाडीवर आहेत.
लातूनमधील देखील सुरवातीचे आकडे समोर आले आहेत. लातूरमध्ये भाजपचे 4 उमेदवार आघाडीवर आहेत, शिवसेना, मनसे आणि ठाकरे गटाने अद्याप स्वतःचं खातं देखील खोललेलं नाही. तर काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे 3 उमेदवार आघाडीवर आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात भाजपचे 16 उमेदवार आघाडीवर आहे. शिवसेने, मनसे आणि ठाकरे गटाने अद्याप स्वतःचं खातं देखील खोललेलं नाही. तर काँग्रेसचे दोन उमेदवार आघाडीवर आहेत…
नागपुरात थोड्याच वेळात मत मोजणीला सुरुवात होईल. झोन 10 मधील स्ट्रॉंग रूम थोड्याच वेळात उघडली जातील. आधी टपाली मतमोजणी नंतर ईव्हीम मधील मतमोजणी होणार… नागपुरात 10 झोन मधील 38 प्रभागात आज मतमोजणी होणार आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेच 66 प्रभाग आहेत. तर गेल्या 2 ते 3 वर्षांपासून राज्यातील सर्वच महानगरपालिका प्रशासनाच्या भरवश्यावर सुरु होत्या. अशा 15 जानेवारी रोजी झालेल्या मतदानानंतर कोणता पक्ष मोठा ठरणार पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर चंद्रपूर याठिकाणी कोणत्या पक्षाच्या उमेदवारांचं पारडं होणार जड? हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अकोला महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी 10 वाजता सुरू होईल. अकोला महानगरपालिकेची स्थापना 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला झाली. महानगरपालिका 80 निवडणूक जागांमध्ये विभागलेले आहे, ज्यामध्ये यावेळी विक्रमी 643 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
नागपूर येथे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमधील फुटीनंतर राजकीय परिस्थिती चर्चेत राहिली. नागपूर महानगरपालिकेत १५१ प्रभाग आहे. तर 2026 ची निवडणूक पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि शहरी विकास यामुळे चर्चेत आहे. या निवडणुकीत नागपूर महानगपालिकेत नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नागपूर महानगर पालिकेच्या कंट्रोल रुम मधून संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर लक्ष ठेवलं जातं आहे. महापालिका कर्मचारी आणि पोलीस विभागम लक्ष ठेवत आहे. नागपुरात 261 ठिकाणचे आतील आणि बाहेरील सीसीटीव्हीचे एक्सेस कंट्रोल रूममध्ये देण्यात आले आहेत. पोलीस आणि महापालिका कर्मचारी लक्ष ठेवत आहेत. 10 ही झोन मधील कुठल्या संवेदनशील मतदान केंद्रात काय सुरू याची माहिती देत आहे. कुठेही काही गोंधळ झाल्यास किंवा अनुचित प्रकार घडल्यास याची माहिती मिळावी यासाठी ठेवलं जातं आहे…
शुक्रवारी म्हणजे 16 जानेवारी 2025 रोजी अनेक उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर काही तासांत चित्र स्पष्ट होईल आणि नागपूर, चंद्रपूर, अमरावती, अकोला मध्ये कोणाचा पक्ष ठरणार मोठा? हे कळेल. अशात सर्वांचं लक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या नागपूरकडे लागलं आहे.