Ketan Agarwal Murder Case : He Is Caring and ..सियाच्या तोंडून कौतुक ऐकून केतन प्रचंड खुश, साखरपुड्याचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

केतन अग्रवाल हत्या प्रकरणामुळे पुणे हादरले आहे. लोहगडावरून ढकलून त्याची हत्या झाल्याचा आरोप त्याची होणारी पत्नी सिया आणि मित्र चेतनवर आहे. या घटनेनंतर केतन आणि सियाच्या साखरपुड्याचा जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ आता चर्चेचा विषय बनला आहे.

Ketan Agarwal Murder Case :  He Is Caring and ..सियाच्या तोंडून कौतुक ऐकून केतन प्रचंड खुश, साखरपुड्याचा तो व्हिडीओ व्हायरल
केतन अग्रवाल-सिया यांच्या साखरपुड्याचा व्हिडीओ चर्चेत
| Updated on: Jul 20, 2026 | 3:05 PM

पुण्यातील नामांकित व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याचा लोहगडावरून पडून मृत्यू होऊन 1 महीना उलटून गेलाय. 18 जून रोजी तो भावी पत्नी सियाबरोबर फिरायला लोहगडावर गेला आणि शेकडो फूट दरीत कोसळून त्याचा मृत्यू झाला. मात्र आधी अपघात वाटणाऱ्या या प्रकरणाने ताही दिवसांनी वेगळंच वळण घेतलं. केतनची होणारी पत्नी सिया आणि तिचा मित्र चेतन चौधरी, या दोघांनीच प्लानिंग करून संगनमताने केतनची हत्या केली. त्यांनीच
त्याला लोहगडावरून खाली ढकलल्याचं समोर आल्याने प्रचंड खळबळ माजली. याप्रकरणी पोलिसांन सिया आणि चेतनला अटक केली. त्याची कसून चौकशी करत, तपास याप्रकरणात पुरावे गोळा करण्याचं काम पोलिस करत आहेत. सिया आणि चेतन सध्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत असून त्यांच्या जबाबातून रोज नवनवी धक्कादायक माहिती समोर येत आहे.

याचदरम्यान सोशल मीडियावर केतन आणि सियाचे काही व्हिडीओ, फोटो समोर आले होते. आता त्यात आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. फेब्रुवारी महिन्यात सिया-केतन अग्रवालचा साखरपुडा झाला. त्याच समारंभाचा एका व्हिडीओ, त्याची छोटीशी क्लिप समोर आली असून यामध्ये सिया ही केतनचं कौतुक करताना दिसली. होणाऱ्या पत्नीकडून स्तुती ऐकून केतनच्या चेहऱ्यावर सुंदर हास्य होतं, तो खूप खुश होता, हे त्यात स्पष्ट दिसून आलं. हा व्हिडीओ प्रचंड चर्चेत असून सोशल मीडियावरही खूप व्हायरल झाला आहे.

तुला केतनची सगळ्यात जास्त कोणती गोष्ट आवडते ?

केतन अग्रवाल हत्याकांडानंतर आता त्याच्या साखरपुड्यातील एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सिया आणि केतन स्टेजवर हातात हात घालून उभे असल्याचे दिसतंय. ब्लॅक टक्सिडो घातलेला केतन आणि सुंदर शरारा घालून हसतमुखाने उभी असलेली सिया, अशी जोडी स्टेजच्या मध्यभागी असून एक महिला अँकर त्यांच्याशी गप्पा मारत, एकमेकांबद्दल त्यांन विचारते. बोलता बोलता त्या अँकरने सियाला एक प्रश्न विचारला.

“होणारा नवरा म्हणून केतनमध्ये तुला सर्वात आवडणारी गोष्ट कोणती? ज्यामुळे तुला वाटतं की तो तुझा ‘हिरो नंबर वन’ आहे?” असा प्रश्न सियाला तिने विचारला. ते ऐकून सिया हसली, हसतच तिने केतनकडे पाहिलं आणि पुढे म्हणाली, . “He is very caring and kind” (तो खूप काळजी घेणारा आणि दयाळू आहे,) असं म्हणत सियाने उपस्थित सर्वांसमोरच केतनचं भरभरून कौतुक केलं. तिचं बोलणं ऐकून सगळेच खुश झाले, पण होणाऱ्या पत्नीकडून आपलं कौतुक ऐकून केतनतर खूपच खुश होता. त्याच्या चेहऱ्यावरच्या आनंदातून, त्याच्या हास्यातून ते स्पष्ट झळकतं होतं. सियाचं उत्तर ऐकून अनेकांनी टाळ्या वाजवल्या, तिला चिअर केलं. त्या दोघांचा साखरपुड्यातील हा व्हिडीओ आता समोर आला असून ती क्लिप चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र, या आनंदी क्षणांनंतर घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे हा व्हिडिओ आता अधिकच चर्चेत आला आहे.

काय आहे केतन अग्रवाल हत्याकांड ?

पुण्यातील उद्योजक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल आणि सिया गोयल या दोघांचं लग्न ठरलं होतं. फेब्रुवारीत त्यांचा साखरपुडा झाला. 19 जूनला सियाचा वाढदिवस होता, त्याच्या आदल्या दिवशी 18 जून रोजी सिया आणि केतनचा लोहगडावर फिरायला गेले होते, मात्र तेथील दरीत पडून केतनचा मृत्यू झाला. सुरूवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचा बनाव आरोपींना रचला होता. मात्र केतनच्या बहिणीला सर्वात प्रथम सियावर संशय आला. त्यानंतर अग्रवाल कुटुंबियांनी ही शंका पोलिसांसमोर बोलून दाखवल्यावर या प्रकरणाला अगदी वेगळं वळण लागलं आणि पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर अखेर हा अपघाताचा बनाव उघड झाला आणि सिया व तिचा मित्र चेतन यांनीच केतनला मारल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं, सध्या ते दोघे न्यायालयीन कोठडीत असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

 

Follow Us