कराडच्या मुलाचे धक्कादायक दावे, आता ज्ञानेश्वरी मुंडेंनी सगळं समोर आणलं, म्हणाल्या मग पोलिसांना फोन….

आम्ही महादेव मुंडेंना ओळखत नव्हतो असं सुशील कराडने म्हटलं होतं. त्यानंतर आता महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी दिलेल्या उत्तरामुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे.

कराडच्या मुलाचे धक्कादायक दावे, आता ज्ञानेश्वरी मुंडेंनी सगळं समोर आणलं, म्हणाल्या मग पोलिसांना फोन....
Mahadev Munde murder case
| Updated on: Aug 04, 2025 | 4:32 PM

महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा हात असल्याचा आरोप बाळा बांगर यांनी केला होता. तसेच वाल्मिक कराडची मुलंही या हत्येत सहभागी होते असा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला होता. मात्र वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडने हे सर्व आरोप फेटाळले होते. आम्ही महादेव मुंडेंना ओळखत नव्हतो असं सुशील कराडने म्हटलं होतं. त्यानंतर आता महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी दिलेल्या उत्तरामुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे.

सुशील कराड काय म्हणाले होते?

सुशील कराड यांनी म्हटले होते की, ‘महादेव मुंडे हत्या प्रकरणात होत असलेले आरोप खोटे आहेत. महादेव मुंडेंना आम्ही कधीही ओळखत नव्हतो. ना मी त्यांना कधी पाहिलं होतं, ना माझ्या भावाने त्यांना कधी पाहिलं होतं, ना माझ्या वडिलांनी त्यांना कधी पाहिलं होतं.’

पोलिसांना फोन का केला?

यावर बोलताना ज्ञानेश्वरी मुंडेंनी म्हटले की, ‘तुम्ही जर महादेव मुंडे ला ओळखत नव्हता तर पोलिसांना का कॉल केले. मी पहिल्यापासून सानप यांच्या सीडीआरची मागणी करत आहे. तसच भास्कर केंद्रे या यांचेही सीडीआर काढण्यात यावे ही माझी मागणी आहे. ठाकूर यांच्यासहित डीवायएसपी कविता नेहरकर यांचाही सीडीआर काढण्यात यावा. डीवायएसपी चोरमले पीआय यांच्यासमोर मला गोविंद यलमाटे म्हणाले की, ‘मला बंगल्याहून फोन आला तपास थांबवा. ओळख नव्हती तर मग तपास थांबविला.’ असा सवाल ज्ञानेश्वरी मुंडेंनी सुशील कराडला विचारला आहे.

पुढे बोलताना ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या की, मी माझ्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती, त्यांनी काय करावं ते त्यांनी ठरवावे. सुप्रिया ताईंनी देशासमोर मागणी केली आहे की या प्रकरणात सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे. जेव्हा मी आणि माझा भाऊ हॉस्पिटलमध्ये होतो, तेव्हा माझ्या वडिलांकडे एक व्यक्ती आला त्यांनी सांगितलं, ताईच्या नावाने मी फ्लॅट करतो मीडिया ट्रायल बंद करा.

या व्यक्तीचे नाव मी पंकज कुमावत साहेबांना सांगणार आहे. सुशील भैया आणि मी व माझे वडील व मध्यस्थी व्यक्ती आम्ही सोबत बसून तपास करणार आहोत या मध्यस्थीचा काही प्लॅन होता का? हे पाहू. मुख्यमंत्र्यांना आम्ही नाव सांगितले आहे. यांची एवढी दहशत आहे की हे मध्यस्थीला पण काहीही करू शकतात.

परळी येथे एपीआय असलेले दहिफळे यांचे प्रमोशन शिरसाळा येथे झाले त्यावेळी खुद्द गोट्या गित्तेने त्यांचा सत्कार केला होता. जे खरोखर आरोपी आहेत त्यांनाच कडक शासन झालं पाहिजे. जेव्हा मी या प्रकरणात खोलात गेले तेव्हा मला आरोपीचे नाव निष्पन्न झाले. पोलीस अधिकारी सकपाळ यांनी या आरोपीचे नंबर माझ्या भावाकडे दिले होते असंही मुंडे यांनी म्हटलं होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us