Bus Accident : दोन बस एकमेकांवर धडकल्या, भीषण अपघात, सांगलीच्या घाटात भयंकर घडलं; 2 जण ठार, 20 जण जखमी
Sangli Accident : सांगलीच्या खानापूर तालुक्यातल्या रेणावी येथे 2 एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये दोन ते तीन जण ठार झाले असून 15 ते 20 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सांगलीच्या खानापूर तालुक्यातल्या रेणावी येथे 2 एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये दोन ते तीन जण ठार झाले असून 15 ते 20 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रेणावी येथील घाटामध्ये बसेसची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला आहे. विटा येथून येणारी आणि विजापूरहून मेढा या ठिकाणी जाणाऱ्या बसेसचा समोरासमोर भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर जखमींना तातडीने रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. यामधील काही जणांची प्रकृती ही चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
भीषण अपघातात एसटी बसेसचा चक्काचूर
समोर आलेल्या माहितानुसार, रेणावी येथील घाटात झालेला हा अपघात इतका भीषण होता की, एसटी बसचा चक्काचूर झाला आहे. या भीषण अपघातात 2 ते 3 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या भीषण अपघातात 15 ते 20 प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती वर्तवली जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात
रत्नागिरीच्या खेड तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर भरणे शिंदेवाडी येथे भीषण अपघात झाला. पेट्रोल पंपावर जाण्यासाठी महामार्ग ओलांडणाऱ्या दुचाकीला मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या GJ 15 CQ 1300 क्रमांकाच्या भरधाव कारने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार राजेश मोहिते, रा. हेदली, यांच्यासह त्यांच्यासोबत प्रवास करणारी महिला गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात इतका भीषण होती की दुचाकी आणि कारचे अनेक पार्ट्स महामार्गावर विखुरले होते. अपघातानंतर कार महामार्गालगतच्या कठड्याला जाऊन धडकली. कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले असून चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.
परभणीत पिकअपचा अपघात
परभणीवरून पाथरीला जाणाऱ्या महामार्गावर भरधाव जाणाऱ्या पिकअपने रस्त्याच्या कडेला असलेल्या डिव्हायडर धडक दिली. या घटनेनंतर पिकअप चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. पिकअप वरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. घटनेनंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती, मात्र राज्य वाहतूक पोलिसांनी घटना स्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली.