Maharashtra News LIVE Update | पुण्यात दिवसभरात 218 पॅाझिटिव्ह रुग्णांची वाढ, एकूण मृत्यू 8847

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | पुण्यात दिवसभरात 218 पॅाझिटिव्ह रुग्णांची वाढ, एकूण मृत्यू 8847

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 15 Aug 2021 19:11 PM (IST)

  पुण्यात दिवसभरात 218 पॅाझिटिव्ह रुग्णांची वाढ, एकूण मृत्यू 8847

  पुणे कोरोना अपडेट

  दिवसभरात 218 पॅाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

  – दिवसभरात 244  रुग्णांना डिस्चार्ज.

  – पुण्यात करोनाबाधीत 10 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 6 .

  – 204 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

  – पुण्यात एकूण पॅाझिटिव्ह रूग्णसंख्या 490446

  – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2098

  – एकूण मृत्यू -8847

  -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 479501

 • 15 Aug 2021 18:31 PM (IST)

  केंद्रातील बाकीचे भाषण करतात, नितीन गडकरी काम करतात, बच्चू कडू यांचे वक्तव्य

  बुलडाणा : केंद्रातील बाकीचे भाषण करतात, नितीन गडकरी काम करतात

  मंत्री बच्चू कडू यांचे वक्तव्य

  तरी दोन्ही व्यक्तिमत्व आमच्यासाठी आदरणीय आहेत

  सत्यता तपासून गडकरींच्या पत्राबाबत उद्धवजी निर्णय घेतील

  राज्यमंत्री बच्चू कडू यांची माहिती

 • 15 Aug 2021 17:58 PM (IST)

  नागपुराततर 16 जणांनी केली कोरोनावर मात, एक नव्या रुग्णाची नोंद

  नागपूर कोरोना अपडेट –

  नागपुरात आज फक्त 1 कोरोना रुग्णांची नोंद

  शून्य मृत्यू

  तर 16 जणांनी केली कोरोनावर मात

  एकूण रुग्ण संख्या – 492969

  एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 482743

  एकूण मृत्यू संख्या – 10118

 • 15 Aug 2021 17:45 PM (IST)

  सर्वांनी एकत्र येऊन महापुरावर तोडगा काढायला हवा – दीपाली सय्यद

  कोल्हापूर : देवदूतांचा सन्मान टीव्ही ९ मराठीन केला त्याचं अंभिनंदन- दीपाली सय्यद

  खरे हिरो चित्रपटसृष्टीत नाही तर टीव्ही ९ मराठीच्या कार्यक्रमात बसले आहेत

  सर्वांनी एकत्र येऊन महापुरावर तोडगा काढायला हवा

  17 दिवस कुणी पोहोचलं नाही तिथं टीव्ही  9 चे प्रतिनिधी पोहोचले त्यांचं कौतुक

  दोन तास मी चालत तिथे गेले होते

  राज ठाकरेंनीदेखील दौरे करायला पाहिजे

  देवदूताला सलाम- दीपाली सय्यद

 • 15 Aug 2021 17:36 PM (IST)

  सर्व विद्यापीठात डिझास्टर मॅनेजमे़ंट कोर्स ठेवावा अशा सूचना देणार, देवदूत सन्मान 2021 मध्ये उदय सामंत यांची घोषणा

  कोल्हापूर : या कार्यक्रमाचं कौतुक शब्दात होऊ शकतं नाही – उदय सांमत उच्च तंत्र शिक्षण

  प्रशासन जिथं पोहोचलं नाही तिथं या देवदूतानं लोकांचा जीव वाचवला

  सर्व विद्यापिठात डीझास्टर मँनेजमे़ट कोर्स ठेवावा अशा सूचना देणार आहे

  कोल्हापूर महाविद्यालयात डीझाटर मॅनेजमेंट कोर्स आहे

  कोल्हापूरातील विद्यापिठात या कोर्सचं कोऑर्डिनेशन शुभांगी घराळे करतील

  सर्व पक्षीय नेते या कार्यक्रमाला आहेत हे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे

  टीव्ही ९ च्या अशा प्रत्येक कार्यक्रमात सरकार सहभागी असेल

  उदय सामंत यांचं प्रतिपादन

 • 15 Aug 2021 17:28 PM (IST)

  चिपळूण फरशी येथील मुख्य पाईपलाईन फुटली

  रत्नागिरी- चिपळूण फरशी येथील मुख्य पाईपलाईन फुटली

  30 वर्षापुर्वीची पाण्याची पाईपलाईन फुटली आहे

  या पाईपलाईन मधून लोटे midc तसेच आजूबाजूच्या 12 गावांना पाणीपुरवठा केला जातो

  सध्या पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे

 • 15 Aug 2021 17:19 PM (IST)

  मनमाड शहर परिसरात पावसाचे आगमन, तब्बल 20 दिवसानंतर पावसाचे पुनरागमन

  नाशिक :  मनमाड शहर परिसरात पावसाचे आगमन

  अर्ध्या तासा पासून होतोय चांगला पाऊस

  तब्बल 20 दिवसानंतर पावसाचे झाले पुनरागमन

  पावसामुळे करपू लागलेल्या पिकांना मिळणार जीवदान

  हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना मिळाला दिलासा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI