
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
ठाणे महानगरपालिका कोरोना संसर्ग संख्या अपडेट :
# आज 1,427 जणांना कोरोनाची बाधा, आजपर्यंत कोरोना संसर्ग झालेले एकूण संख्या 82,125 इतकी आहे
# आज पर्यंत कोरोना संसर्गावर मात करून पूर्णपणे बरे झालेले 69,572 इतके रुग्ण आहेत ( बरं होण्याचं प्रमाण 85% इतकं आहे )
# 11,150 रुग्णांवर सध्या कोरोनाचे उपचार सुरु आहेत
# आज 790 रुग्ण कोरोनातून झाले बरे
# आज 5 जणांचा मुत्यू झाला, आतापर्यंत एकूण कोरोनामुळे 1,403 जणांचा मृत्यू झाला आहे
बुलडाणा : बेकायदेशीररित्या सैलानी बाबांचा संदल काढल्याप्रकरणी 1011 लोकांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल, संदल मिरवणूक ला परवानगी नसताना जमविली हजारो लोकांची गर्दी, 11 मुजावर सह 1000 लोकांवर रायपूर पोलिसांत गुन्हा दाखल, मुजावर यांनी गर्दी जमवून कोरोना नियमाचे उल्लंघन केलें, तसेच जीविताला धोका पोहचेल असे कृत्य केलें
नांदेड: माजी मंत्री गंगाधरराव कुंटुरकर यांचे निधन, उपचारा दरम्यान झाले औरंगाबादला निधन, 80 वर्षाचे होते कुंटुरकर, माजी मंत्री,खासदार, आमदार अशी पदे त्यांनी भूषवली होती, काही महिन्यांपूर्वी त्यांनी केला होता भाजपमध्ये प्रवेश, एक वजनदार नेते म्हणून जिल्ह्यात होती ओळख.
छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यात मोठी चकमक
या चकमकीत पाच जवान शहीद झालेले आहेत
15 ते 20 जवान गंभीर जखमी आहेत
चार तास चाललेल्या या चकमकीत तीन नक्षलवादी ठार
प्रमाणात नक्षलवादी असल्याने पोलीस मोठ्या संख्येत गंभीर जखमी
बिजापूर जिल्ह्यातील जूनगड च्या जंगलात चकमक झाली –
दुपारी दोन वाजता सुरू झालेली चकमक साडेपाच वाजता संपुष्टात आली
सीआरपीएफ व छत्तीसगड पोलिसांचे दोन तुकड्या घटनास्थळी उपस्थित होत्या
जखमी जवानांना घटनास्थळापासून हेलिकॉप्टरने जगदलपूर येथे पोहोचविण्यात येत आहे
अमरावती : मेळघाट दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर प्रधान मुख्य वनसरंक्षक श्रीनिवास रेड्डी यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
जिल्हा सरकारी वकील परिक्षित गणोरकर यांची माहिती
विरार – अर्नाळा किल्ल्यात हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर छापा
– नालासोपारा विभागाचे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत जाधव यांची धाडसी कारवाई
– या कारवाहित 8 हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त , 50 ड्रम, 30 क्विंटल गूळ जप्त
– 12 हजार लिटर रसायन, 1500 लिटर हातभट्टीची दारू नष्ट
– एक हातभट्टी चालक ताब्यात तर इतर फरार
याबाबत 6 जणांवर दारुबंदी कायद्या अंतर्गत अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकिसाठी आज 11 जणांनी आपले उमेदवारी अर्ज घेतले माघारी
19 उमेदवार अजूनही निवडणूक रिंगणात कायम
माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, माऊली हळनवर यांनी आपले अर्ज घेतले माघारी
पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी 38 उमेदवारी अर्ज झाले होते दाखल
त्यापैकी छाननीत 8 अर्ज अवैध ठरले होते
वैध 30 अर्जापैकी 11 जणांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत
तर 19 उमेदवार निवडणूक रिंगणात कायम
सिद्धेश्वर अवताडे यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिल्याने भाजपला मोठा धक्का
अपक्ष शैला गोडसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन पाटील यांचे अर्ज राहिल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना फटका बसण्याची शक्यता
गडचिरोली जिल्ह्यातील खोब्रामेंढा जंगलात झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांच्या डीवायएसएम भास्कर हिचामी याच्यासह चार नक्षलवादी ठार झाले होते. याच्या निषेधार्थ नक्षलवाद्यांनी बंद पुकारला आहे. येत्या 12 एप्रिलला हा बंद असेल. त्यासाठी नक्षलवाद्यांनी एक प्रेसनोट जीरी केली असून यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप नक्षलवाद्यांनी केला आहे.
ठाणे : स्वत:ला ठाणे क्राईम ब्रांचचे पोलिस अधिकारी असल्याचे सांगून एका व्यापाऱ्याला लुटणाऱ्या दोन भामट्यांना महात्मा फुले चौक पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे अटक केली आहे. या भामट्यांनी कल्याण पश्चिमेतील साधना हॉटेल परिसरातील एका जनरल स्टोअर्समध्ये घूसून मारहाण केली. यावेळी त्यांनी स्टोअरच्या मालकाकडून रोकड, मोबाईल आणि दुकानातील काही वस्तू चोरल्या होत्या. पोलिसांनी या आरोपींना अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
ठाणे : पत्नीसोबत अनैतिक संबंधाच्या संशयावरुन टिटवाळ्य़ात विलास जाधव नावाच्या व्यक्तीने या परिसरात राहणाऱ्या उमेश वाघे या तरुणाची धारधार शस्त्रने वार करुन हत्या केली. घटनेनंतर अवघ्या दोन तासातच टिटवाळा पोलिसांनी आरोपी विलास उर्फ बुटा जाधव याला अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
बाळे परिसरात श्रीकृष्ण मंदिराजवळ आग
अग्निशामन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
दोन ते तीन एकर परिसरात लागली आग
संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना कोरोनाची लागण…
– दोन दिवसांपासून ताप, सर्दी खोकल्याची लक्षणं
– वर्षा राऊत यांना फोर्टीस रुग्णालयात केलं दाखल…
– संजय राऊत यांनाही करावी लागणार कोवीड टेस्ट…
– त्यांच्यात सध्या कोणतीच लक्षणं नाहीत
संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना कोरोनाची लागण…
– दोन दिवसांपासून ताप, सर्दी खोकल्याची लक्षणं होती…
– वर्षा राऊत यांना फोर्टीस रुग्णालयात केलं दाखल…
– संजय राऊत यांनाही करावी लागणार कोव्हिड टेस्ट…
– त्यांच्यात सध्या कोणतीच लक्षणं नाहीत..
वर्षा बंगल्यावर एकामागोमाग एक कोरोनाची लागण
मुख्यमंत्री कार्यालयातल्या एका कर्मचा-याला कोरोनाची लागण
रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनाही झाली होती कोरोनाची लागण
रश्मी ठाकरे एच एन रुग्णालयात दाखल आहेत तर आदित्य ठाकरे दुसरी चाचणी निगेटिव्ह येण्याची वाट बघत आहे
जितेंद्र आव्हाड शदर पवार यांच्या भेटीसाठी ब्रिच कॅंडी रुग्णालयात पोहोचले आहेत. शरद पवार यांच्या नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ते ब्रीच कॅन्डी रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणाखाली आहेत.
जितेंद्र आव्हाड यांना विस्मरणाचा रोग झाला आहे कारण महाराष्ट्र हा एकमेव राज्य आहे ज्याने कोरोना काळात लॉकडाउन केल्यानंतर ही नागरिकांना कोणतीही मदत केली नाही… केंद्र सरकारने तर वीस लाख कोटींचा पॅकेज दिला होता, मात्र महाराष्ट्र राज्याने एक पैसाही नागरिकांना मदतीसाठी दिलेला नाही…
काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे भाषण केले, मला तर समजतच नाही की ते का केले, कारण त्यामध्ये कुठल्याही उपाययोजना नव्हत्या, कुठलेही निर्णय नव्हते… तज्ञांशी बोलू दोन दिवसानंतर सांगू असेच मुद्दे त्यांनी मांडले. लॉकडाऊन करताना त्याकाळात काळात नागरिकांना कशा पद्धतीने मदत केली जाईल हे सांगणे गरजेचे आहे…
पंततप्रधान मोदींनी देशात लॉकडाऊन केला होता तर प्रत्येक घटकातील नागरिकांची काळजी घेतली होती त्यांच्यासाठी काही न काही उपाययोजना केल्या होत्या प्रत्येक नागरिकांच्या घरी अन्नधान्य पोहोचेल अशी व्यवस्था केली होती खात्यात पैसे जाईल असे नियोजन केले होते.राज्य सरकार ने पॅकेज न देता फक्त लोकांची वीज कापली लोकांना त्रास दिला…
पुणे – पुणे जिल्हा माहिती कार्यालयातील सात जण कोरोनाबाधित
आज सकाळी जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे कोरोनामुळे निधन
सरग यांच्या पत्नी आणि मुलगाही कोरोना बाधित
सिंदेवाही तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात ग्रामस्थाचा मृत्यू, श्रीधर आत्राम -55 रा. सिरकाडा असे मयताचे नाव, सिंदेवाही तालुक्यातील शिवणी जंगलात मोहफूल वेचण्यासाठी गेला असतानाची घटना, वनपथकाने घटनास्थळी पोचत पंचनामा कारवाई केली सुरू, वाघ हल्ल्याच्या घटनेने परिसरातील गावांमध्ये दहशत
मेळघाट दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण
अखेर दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास वरिष्ठ आयपीएस अधिकारी प्रज्ञा सरवदे यांच्याकडे.
प्रज्ञा सरवदे या अपर पोलीस महासंचालक गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मुंबई.
३० एप्रिल पर्यंत सरकारला करणार चौकशी अहवाल करणार सादर.
महिला IPS अधिकाऱ्यांकडून तपास करण्याची होत होती मागणी
नागपूर महापालिकेला आता सरकारी अनुदानाचा आसरा
महापालिके चे उत्पनाचे स्रोत झाले कमी
महापालिकेच्या उत्पनाच्या स्रोतातून येणारा महसूल झाला कमी
कोरोना मुळे महापालिकेची कर वसुली झाली कमी
आता राज्य आणि केंद्रा कडून येणाऱ्या निधीवर भिस्त
त्यामुळे महापालिकेच्या विकास कामा ना फटका बसण्याची शक्यता
आधीच महापालिका ची आर्थिक स्थिती बिकट त्यात आणखी अडचणी ची भर पडण्याची शक्यता
नागपुरात जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीत दोन हत्येच्या घटना घडल्या
भर दिवसा जितू गगराणी नावाच्या युवकाची हत्या करण्यात करण्यात आली
दारू च्या अवैध धंद्या बद्दल मृतक पोलिसांना माहिती देत असल्या च्या कारण वरून हत्या झाल्याची माहिती पुढे येत आहे
तर दुसरी घटना त्याच पोलीस स्टेशन हद्दीत बाप लेका ने मिळून एक युवकाची हत्या केली
पियुष भैसरे असे मृतकांचे नाव यात दोन्ही आरोपी ना अटक करण्यात आली
एकाच पोलीस स्टेशन हद्दीत दोन खुनाच्या घटना घडल्याने परिसरात भीती च वातावरण
राष्ट्रीय पंचायत पुरस्कारात महाराष्ट्राचा वाजला डंका
१६ ग्रामपंचायतींच्या विविध गटांमध्ये पुरस्कार
केंद्र शासनाचे राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर झाले असून यामध्ये राज्यातील सातारा, गडहिंग्लज (कोल्हापूर),राहता ( अहमदनगर) या पंचायत समित्यांसह राज्याच्या विविध भागांतील १६ ग्रामपंचायतींनी विवध गटांमध्ये पुरस्कार मिळवून उत्तुंग कामगिरी केली आहे
औरंगाबाद शहरात कोरोना चाचण्यांचा वेग वाढवण्यासाठी तब्बल अडीच लाख अँटिजेन किटची खरेदी
औरंगाबाद महापालिकेच्या वतीने ही खरेदी
सध्या शहरात दिवसाकाठी चार ते साडेचार हजार कोरोना टेस्ट केल्या जात आहेत.
तर येत्या काळात दिवसाकाठी दहा हजार कोरोना चाचण्या करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे.
त्यासाठी मोठ्या प्रमाणात अँटिजेन किट खरेदी करण्यात आले आहेत.
मुलाचे लग्न अगदी पाच दिवसांवर आले असताना आई वडिलांच्या रस्ता अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संजय छानवाल आणि मीना छानवाल असं या दाम्पत्याचं नाव आहे. धुळे सोलापूर महामार्गावर करोडी जवळ भरधाव ट्रक ने दुचाकीला चिरडल्यानंतर या दाम्पत्याच्या शरीराचा अक्षरशः चुराडा झाला होता. हा अपघात पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शीनाही भोवळ येऊ लागली होती इतका भीषण हा अपघात होता. अपघातानंतर ड्रॉइव्हर आणि क्लिनर पळून गेले आहेत. खुलताबाद पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे.
पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक, आज दुपारी दोन वाजता मंत्री जयंत पाटील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार, प्रचाराचा नारळ फुटणार
राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पाश्वभूमीवर 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आणि दिव्यांग व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस घरोघरी जाऊन द्यावी अशी मागणी केली जात आहे. नुकतंच याबाबत एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. लवकरच या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीत आमदार प्रकाश आबिटकर यांचा विरोधी राजश्री शाहू आघाडीला पाठिंबा
आबिटकर यांच्याकडून काल निर्णय
आबिटकर यांच्या निर्णयामुळॆ राजश्री शाहू आघाडी भक्कम
पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून विश्वास व्यक्त
मुंबई : सामान्य जनतेला तुम्हाला दिलासा देता येत नसेल तर देऊ नका, पण त्यांच्यावर व्याजदर कपातीचा दांडपट्टा तरी चालू नका. पुन्हा हा निर्णय नजरचुकीने जाहीर झाल्याचे केंद्रीय अर्थमंत्री म्हणतात. हा तर ‘धक्कादायक विनोद’ म्हणावा लागेल. एवढा मोठा निर्णय हि नजरचूक कशी असू शकते? असा सवाल शिवसेनेनं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांना विचारला आहे.
तीदेखील प. बंगालच्या राज्यातील निवडणूक सत्ताधारी पक्षाने, प्रमुख्याने पंतप्रधान ,गृहमंत्र्यांनी प्रतीष्टेची केलीली असताना? अर्थमंत्री मॅडम, तुम्ही ‘नजरचूक’ दुरुस्ती केली हे ठीक, पण जो ‘बुंद से गई’… त्याचे काय? पुन्हा निवडणूक संपल्यावर अर्थमंत्रांची ‘नजरचुक’ जनतेच्या ‘खिश्यावर’ असे होणारच नाही याची खात्री काय? असेही शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.